Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team YuvaDisha
“तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ देणे बाबत प्रशासनाचे कर्तव्य” : जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे जळगाव: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, जळगाव आणि ‘तृतीयपंथीयांसाठी स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजना जिल्हास्तरीय समिती, जळगाव’ यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथीय व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकदिवशीय जिल्हास्तरीय मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. मान्यवरांचे मार्गदर्शन व प्रमुख उपस्थिती या शिबिराचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा. श्री. रोहन घुगे (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, जळगाव यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की, “तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ देणे हे प्रशासनाचे…
जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी आयोजन जळगाव,दि. 3 (जिमाका )–प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सप्टेंबर महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर केलेला असेल आणि त्या अर्जासंदर्भात एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरून कोणतेही उत्तर प्राप्त झाले नसेल, अशा वैयक्तिक हितसंबंधाच्या तक्रारींसह संबंधित नागरिकांनी जिल्हास्तरीय लोकशाही दिनास उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी केले आहे.
५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी जळगाव, दि. 3 (जिमाका) –: राज्य सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्नित अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील ५,०१२ रिक्त पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली असून, भरती प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी शासन निर्णयाद्वारे सूचना जारी केल्या आहेत असे उच्च शिक्षण जळगाव विभागाचे सहसंचालक डॉ. पराग मसराम यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे. नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर जाहिरातीचा मसुदा संबंधित विद्यापीठाच्या मान्यतेसाठी सादर करणे, जाहिरातीत शैक्षणिक पात्रता व सामाजिक आणि समांतर आरक्षणाची अचूक माहिती नमूद करणे बंधनकारक आहे. विद्यापीठाची मान्यता मिळाल्यानंतरच जाहिरात प्रसिद्ध करता येणार असून,…
आदिवासी आश्रमशाळांतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद; बहुतांश मागण्या मान्य कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याचे आश्वासन; उपोषण मागे घेण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन मुंबई : आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थी आणि आंदोलनकर्त्यांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याचे, तसेच अनुदानित व शासकीय आश्रमशाळांमधील गैरसोयींची त्रयस्थ संस्थेमार्फत (थर्ड पार्टी ऑडिट) पाहणी करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली. पुणे, नाशिक आणि नागपूर येथील आदिवासी विद्यार्थी गेल्या १७ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी उपोषण आंदोलन करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पुण्यातील कार्यक्रमात आदिवासी…
*सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन* जळगाव, दि. २५ (जिमाका) : सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या, परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सन २०२६-२७ या वर्षासाठी ऑनलाइन अर्ज करावेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ आहे. सन २०२४-२५ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. यापूर्वी ही योजना जिल्हास्तरावर लागू होती. शासन निर्णय दि. २६ डिसेंबर २०२४ अन्वये ती तालुकास्तरावरही लागू करण्यात आली आहे. …
स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांनी मार्जिन मनी योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन. जळगाव, दिनांक 25 ऑगस्ट (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांना उद्योग व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत मार्जिन मनी देण्याची योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किमतीतील लाभार्थ्याच्या २५ टक्के हिस्स्यामधील जास्तीत जास्त १५ टक्के मार्जिन मनी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येते. लाभार्थ्याने १० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर आणि बँकेकडून स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर झाल्यानंतर उर्वरित १५ टक्के मार्जिन मनी शासनाकडून देण्यात येते. या योजनेचा लाभ…
ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे जळगाव : स्मार्ट मीटर बसवलेल्या ग्राहकांचा थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यावर वीजबिल न भरता परस्पर जोडणी घेणाऱ्या ग्राहकांविरोधात महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत शुक्रवारी ४ ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात दोन दिवसांत आणखी ४ प्रकरणांत गुन्हे दाखल झाले. लागोपाठ होणाऱ्या महावितरणच्या धडक कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे. जळगाव शहरातील येथील नाथवाडा येथील रहिवासी सरूबाई तुकाराम पाटील या ग्राहकाचा वीजपुरवठा थकबाकीसाठी स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट (आपोआप खंडित) केलेला होता. मात्र त्यानंतरही त्याने थकबाकी भरली नाही. महावितरणच्या पथकाने तपासणी केली असता या ग्राहकाने अनधिकृतपणे वीज जोडल्याचे…
धुळे | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघामार्फत आदिवासी विकास कर्मचारी संघटनेची नाशिक विभागातील प्रकल्पस्तरीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली. १८ ऑगस्ट २०२६ रोजी धुळे येथे केंद्रीय अध्यक्ष अरुण गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रीय अतिरिक्त महासचिव सुशील तायडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. नाशिक विभागातील एकूण सात प्रकल्प क्षेत्रांपैकी तळोदा, नंदुरबार, यावल, धुळे आणि राजूर या पाच प्रकल्प क्षेत्रांमध्ये सर्वानुमते प्रकल्पस्तरीय कार्यकारणीची निवड करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक, गृहपाल, अधीक्षक, शिक्षक तसेच आदिवासी विकास विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. बैठकीत आदिवासी विकास विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रकल्पस्तरावर भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला. या…
विभागीय हॉकी निवडीत नंदुरबारच्या सहा विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी नंदुरबार | प्रतिनिधी ‘मिशन लक्ष्यवेध’ उपक्रमांतर्गत क्रीडा निपुणता केंद्र (बालवाडी), पुणे येथे होणाऱ्या विभागीय हॉकी क्रीडा निपुणता केंद्रासाठी शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, नंदुरबार येथील सहा विद्यार्थिनींची निवड झाली आहे. दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या निवड चाचणीत या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी केली. निवड झालेल्या विद्यार्थिनींमध्ये खुशी सुकलाल पावरा (इयत्ता १० वी), विन्ता गिरीश वसावे (इयत्ता ९ वी), परिधी राजेंद्र अहिरे (इयत्ता ९ वी), प्रीती विश्वास वळवी (इयत्ता ८ वी), सुप्रिया इंदाराम गावित (इयत्ता ८ वी) आणि अर्चना राजमल खर्डे (इयत्ता ८ वी) यांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा विभागाच्या…
धक्काबुक्कीनंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथील घटना; सहा जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जळगाव | प्रतिनिधी पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथे ग्रामसभेदरम्यान ग्रामसेवकाला काही ग्रामस्थांनी जाब विचारत धक्काबुक्की केल्याने ते अस्वस्थ झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पारोळा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. प्रल्हाद पाटील (वय ५२) हे शिवरे दिगर येथील ग्रामसेवक होते. सोमवारी गावात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. जुन्या कामांच्या देयकांवरून ग्रामसेवक पाटील आणि ग्रामस्थांमध्ये वाद झाला. यावेळी सहा जणांनी पाटील यांच्याशी हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ तसेच मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले…
