Author: Team YuvaDisha

*भडगाव येथे १९ ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी* जळगाव, दि. १८ (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भडगाव येथे दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये युवा शक्ति फाउंडेशन व क्वेस क्रॉप प्रा. लि., पुणे यांसारखे नामांकित उद्योजक सहभागी होणार असून, १०वी, १२वी, आयटीआय, पदवीधर आदी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांनी…

Read More

* दि. 17 ऑगस्ट 2026 येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात पालक- शिक्षक सभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालक- शिक्षक संघाच्या सचिव प्रा. शितल चौधरी यांनी मागील वर्षाचे इतिवृत्ताचे वाचन करून प्रास्ताविक सादर केले. त्यानंतर पीएनजी ज्वेलर्स, जळगाव यांचेकडून उपस्थित पालकांना भेटवस्तू देण्यात आल्या. याप्रसंगी पीएनजी ज्वेलर्स जळगाव चे सुपरवायझर श्री.महेश हडप व त्यांचे सहकारी अनुक्रमे माया सरोदे ,पूनम कोळी व पूजा पाटील उपस्थित होते. त्यानंतर वर्गनिहाय पालक प्रतिनिधी म्हणून अनुक्रमे वंदना मनोहर चव्हाण, सुरेखा नितेश सपकाळे, समा आमीरुल हसन अन्सारी, कांचन संजय चौधरी, सोनाली नितीन महाजन, दिनेश मधुकर मोरे,…

Read More

*स्वाधार योजनेच्या नुतणीकरण अर्जासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत ; अर्ज करण्याचे आवाहन* *जळगाव, दि. १८ (जिमाका) :* भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा सन २०२५-२६ या वर्षात लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरीता ऑनलाईन अर्ज नुतणीकरण (RENEW) करण्यासाठी दिनांक ०१ ऑगस्ट २०२६ ते दिनांक १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत समाज कल्याण विभागाच्या https://hmasnew.mahait.org/ या पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी नुतणीकरण अर्ज सादर करताना मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करणे तसेच चालू शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमाची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. सन २०२५-२६ मध्ये स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी दिनांक १५ सप्टेंबर २०२६…

Read More

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन संयुक्तपणे साजरा करण्यात आले. इतिहास विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड होते. प्रमुख वक्ते म्हणून उपप्राचार्य प्रा. डॉ. एस.डी. भैसे यांनी आपले विचार मांडले. प्रा. जी. एस. अहिरराव यांची यावेळी उपस्थिती होती. दीडशे वर्षे ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात असणाऱ्या भारत भूमीला स्वतंत्र करण्यासाठी अनेक स्वातंत्र्ययोध्यांनी आपले बलिदान दिले, जीवाची पराकाष्ठा केली व भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. महात्मा गांधी, पंडित नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग यांसारख्या अनेक स्वातंत्र्यवीरांनी अहोरात्र…

Read More

प्रतिनिधी | जामनेर जामनेर बस स्थानकातून जीपीएस ट्रॅकर असलेल्या अत्याधुनिक जिजाऊ बसची चोरी झाली. सोमवारी उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे जामनेर आगाराचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एम.एच. १४ एन.ई. ४२१४ ही शटल बस रात्री साडेनऊ वाजे दरम्यान जळगाव येथून जामनेर बस स्थानकात दाखल झाली. अखेरची फेरी असल्याने चालकाने बस फलाट क्रमांक दोनवर लावून ठेवली. चावी बसलाच असल्याचे हेरून चोरट्याने रात्रभर बस स्थानकातच मुक्काम केला. पहाटे अडीच वाजे दरम्यान चोरट्याने स्थानकातून गाडी पडविल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे. ही बस टाकळी, कोदोली मार्गे शहापूरला येत असताना शहापूर जवळ समोरचे टायर फुटल्याने चोरट्याने बस सोडून पलायन केले. यामुळे मात्र…

Read More

जामनेर/ विशेष प्रतिनिधी येथील संत साहित्याचे अभ्यासक आणि आध्यात्मिक ग्रंथांचे लेखक विद्यावाचस्पती प्रा. डॉ. रामकृष्णादादा महाराज पाटील लिखित पाच पुस्तकांचा प्रकाशन समारंभ सीनियर सिटीझन संडे मॉर्निंग ग्रुप मध्ये थाटात संपन्न झाला. संत साहित्याचे अभ्यासक आणि सुमारे दीडशे होऊन अधिक आध्यात्मिक ग्रंथांचे लेखन केलेले प्रा. डॉ. रामकृष्णा महाराज पाटील यांच्या सिद्ध हस्त लेखणीतून साकार झालेल्या आणि नव्याने विविध प्रकाशन संस्थांकडून प्रकाशित झालेल्या ‘ चेतना के शाश्वत स्वर ‘(हिंदी), ‘ श्री गुरु स्तवन मंजिरी,’ ‘ विचार मंथन ‘,’ मूल्यवेध ‘, ‘भक्तीच्या वाटेवरी पंढरीची वारी ‘ या पाच पुस्तकांचा भव् स्वरूपात प्रकाशन समारंभ थाटामाटात संपन्न झाला. यावेळी सेवानिवृत्त जिल्हाधिकारी सुभाष सुतार, मेजर नागनाथ…

Read More

*जळगाव,*प्रतिनिधी)*: जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आदिवासी समाजाच्या वस्तीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले होते. या नैसर्गिक आपत्तीनंतर तातडीने पूरग्रस्तांना अत्यावश्यक मदत पोहोचविण्यात आली होती. त्याच सामाजिक बांधिलकीचा पुढचा टप्पा म्हणून आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई आणि प्रज्ञावंत फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कंपास बॉक्स तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष तथा प्रज्ञावंत फाउंडेशनचे संचालक प्रविण सपकाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी ममुराबादचे सरपंच हेमंत चौधरी, ग्रामपंचायत…

Read More

​*स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल* *जळगाव* : स्मार्ट मीटर बसवलेल्या ग्राहकांचा थकबाकीपोटी महावितरणने वीजपुरवठा खंडित केला. मात्र या ग्राहकांनी वीजबिल न भरता परस्पर जोडणी घेऊन वीजचोरी केली. शहरातील अशा​ ३ ग्राहकांवर महावितरणने थेट पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत. श्रीराम चौकातील प्रतिभा रितेश पवार या ग्राहकाचा वीजपुरवठा थकबाकीसाठी स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट (आपोआप खंडित) केलेला होता. मात्र त्यानंतरही त्यांनी थकबाकी केली नाही. महावितरणच्या पथकाने तपासणी केली असता या ग्राहकाने घरासमोर असलेल्या लघुदाब वीज वाहिनीवर आकडा टाकून वीजचोरी​ केल्याचे आढळले. या ग्राहकाने ९ हजार ७०० रुपयांची वीजचोरी केली. दुसऱ्या प्रकरणात आशाबाबा कॉलनीतील लक्ष्मी भानुदास बागडे…

Read More

कजगाव रेल्वेस्थानकावरून पार्सल सेवा सुरू कजगाव, ता. भडगाव : प्रवाशांसह व्यापारी, तसेच कृषी व व्यावसायिक क्षेत्राला अधिक सक्षम व सुलभ पार्सल वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने कजगाव (ता. भडगाव) येथील रेल्वेस्थानकावरून सर्व प्रकारच्या पार्सलची वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार कजगाव स्थानकावर आवक व जावक स्वरूपातील विविध प्रकारची पार्सल वाहतूक करता येणार आहे. यामध्ये इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC), जॉइंट पार्सल प्रॉडक्ट-रेल्वे प्रवाशांसह पार्सल सेवा, तसेच पार्सल कार्गो एक्सप्रेस ट्रेनद्वारे होणाऱ्या पार्सल वाहतुकीचाही समावेश आहे. या सुविधेमुळे कजगाव व परिसरातील व्यापारी, उद्योजक, शेतकरी, व्यावसायिक तसेच ग्राहकांना रेल्वेमार्फत माल पाठविणे व…

Read More

नाशिक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हे युवकांसाठी रोजगाराची संधी नाशिक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सतत बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नरत असते. वारंवार रोजगार मेळावे घेऊन युवकांना रोजगाराची संधी या केंद्राच्या वतीने करण्यात येत असते. त्यामुळेच सध्याच्या नोकरी मिळणे कठीण झाले असताना नाशिक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र युवकांसाठी एक आधार ठरत आहे. या केंद्राने नाशिक जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी पुन्हा एक संधी आणली आहे. नाशिक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, युवाशक्ती फाउंडेशन, नाशिक आणि गुरूकुल पॉलिटेक्नीक, नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने १० ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते…

Read More