Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जळगाव येथे तृतीयपंथीयांसाठी शासकीय योजनांचे एकदिवशीय मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 3, 2026

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 3, 2026

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

September 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Thursday, September 3
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!
बातम्या

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

Team YuvaDishaBy Team YuvaDishaJanuary 24, 2026No Comments534 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

उत्तर महाराष्ट्रातील नगरपरिषदा व महापालिका निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) यांच्या कामगिरीबाबत पक्षांतर्गत अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. जळगाव जिल्ह्यासह अनेक ठिकाणी भाजपने स्वबळावर प्रभावी कामगिरी केल्याने शिंदे गटाच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाकडून संघटनात्मक फेरबदल आणि मंत्रिमंडळात खांदेपालट करण्याबाबत हालचालींना वेग आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण जिल्ह्यात पक्षीय पकड मजबूत होण्याच्या दृष्टीने शिंदे गटाकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाची स्थानिक पातळीवरील पकड मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी मंत्रिमंडळात बदल करून काही नव्या आमदारांना जबाबदारी देण्याचा पर्याय नेतृत्वाकडून तपासला जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील नावांची चर्चा या संभाव्य खांदेपालटीत जळगाव जिल्ह्यातील काही आमदारांची नावे जोरकसपणे पुढे येत आहेत. त्यात विशेषतः पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. अलीकडील काळात त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली असून, विविध स्थानिक प्रश्नांवर त्यांनी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे दिसून येते. त्यामुळे त्यांना मंत्रीपदाची संधी मिळू शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. जवळपास चाळीस वर्षानंतर के. एम. बापू यांच्या नंतर पाचोरा भडगाव मतदार संघास मंत्रिपदाचा मान मिळणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, केवळ मंत्रीपदच नव्हे तर जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबतही फेरविचार होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेता, जिल्ह्याला अधिक वेळ देणारा आणि संघटनात्मक बांधणी करू शकणारा चेहरा पुढे आणण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जाऊ शकतो.एकंदरीत, शिंदे गटासाठी जळगाव जिल्हा आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे येत्या काळात मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदल झाला, तर जळगावमधून हॅट्रिक केलेले आणि संघटनात्मक दृष्टीने प्रबळ भूमिका ठेऊन असलेले आमदार किशोर आप्पा यांना केव्हा संधी मिळते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्वाचा अंतिम निर्णय काय होतो, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

जळगाव येथे तृतीयपंथीयांसाठी शासकीय योजनांचे एकदिवशीय मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 3, 2026

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 3, 2026

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

September 3, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,557

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026737

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025461
Don't Miss

जळगाव येथे तृतीयपंथीयांसाठी शासकीय योजनांचे एकदिवशीय मार्गदर्शन शिबिर संपन्न

By Team YuvaDishaSeptember 3, 20266

“तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ देणे बाबत प्रशासनाचे…

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 3, 2026

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

September 3, 2026

आदिवासी आश्रमशाळांतील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद; बहुतांश मागण्या मान्य कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्याचे आश्वासन; उपोषण मागे घेण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

August 30, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.