Author: Team YuvaDisha

यावलमध्ये ९ ऑगस्ट रोजी ‘आमची संस्कृती, आमचा अभिमान’ कार्यक्रम जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाज बांधवांचा सांस्कृतिक सोहळा यावल | प्रतिनिधी सर्व आदिवासी समाज बांधवांच्या वतीने तसेच जागतिक आदिवासी दिनानिमित्त ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता ‘आमची संस्कृती, आमचा अभिमान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि वारसा जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. लोकेश नगर, तडवी कॉलनी, यावल, जि. जळगाव येथे हा कार्यक्रम होणार असून यावेळी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य व वाद्यांचे सादरीकरण तसेच आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन…

Read More

*शहीद जवानांच्या स्मारकांचे रविवारी भूमिपूजन* *क्रांती दिना निमित्त शहीद वीर माता-पिता, वीर पत्नींचा सन्मान; जळगावात कृतज्ञतेचा सोहळा* जळगाव, दि. ८ (जिमाका) : देशाच्या संरक्षणासाठी प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी क्रांती दिनाचे औचित्य साधून रविवारी ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृहात ‘शहीद स्मारक भूमिपूजन सोहळा’ आणि शहीद ‘वीर माता, वीर पिता, वीर पत्नी सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जिल्ह्यातील २९ शहीद जवानांच्या स्मारकांचे भूमिपूजन करण्यात येणार असून त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान केला जाणार आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी स्वतःचे वर्तमान अर्पण करणारे शहीद हे इतिहासाच्या पानांपुरते मर्यादित नसतात.…

Read More

खानदेशातील रेल्वे मालधक्का माथाडी कामगारांच्या न्यायासाठी १७ ऑगस्टपासून आमरण उपोषण कामगार आयुक्त कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विशाल सुरवाडे यांचा आंदोलनाचा इशारा जळगाव | प्रतिनिधी खानदेशातील रेल्वे मालधक्क्यांवर काम करणाऱ्या हमाल व माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विशाल सुरवाडे यांनी १७ ऑगस्ट २०२६ रोजी जळगाव येथील कामगार आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. माथाडी कामगारांच्या कष्टाच्या मोबदल्याबाबत तसेच त्यांच्या हक्कांच्या प्रश्नांबाबत संबंधित यंत्रणेकडून योग्य ती कार्यवाही होत नसल्याचा आरोप सुरवाडे यांनी केला आहे. कामगारांच्या मेहनतीचा पैसा आणि त्यांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या व्यवस्थेविरोधात हा लढा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “खानदेशातील…

Read More

*मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर* जळगाव, दि.6 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. राज्यातील या कार्यक्रमाची प्रगती विचारात घेऊन मुदतवाढ देण्याची विनंती भारत निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाच्या 4 ऑगस्ट 2026 रोजीच्या पत्रान्व्ये विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारीत कार्यक्रम जाहीर करण्यात आला करण्यात आहे. त्यानुसार सुधारीत कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यामार्फत घरोघरी भेटी ३० जून २०२६ ते १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत देणार आहेत. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण / पुनर्रचना कार्यक्रम १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत करण्यात येणार असून प्रारूप मतदार याद्यांची…

Read More

*जागतिक आदिवासी दिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी विविध योजनांचे लाभ वितरण व महिला बचत गट मेळावा, रानभाज्या मेळावा व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन* *जळगाव, दि. 5 (जिमाका):* एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी शासकीय आश्रमशाळा, विष्णापूर ,ता. चोपडा येथे या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचे थेट लाभ वितरण, मार्गदर्शन आणि बचत गटांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांर्तगत विविध शासकीय यंत्रणासुध्दा सहभागी होऊन लाभार्थ्यांना विविध दाखले व इतर कामे तसेच मागदर्शन करणार आहे. तसेच पुढील कालावधीत मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमात सन २०२५-२६ मधील ८ वैयक्तिक महिला…

Read More

मी माझ्या संपूर्ण आयुष्यात लोककलावंत अभिनेता हार्मोनियम वादक व शाहीर म्हणून जीवन जगलो ग्रामीण भागात राहून चार पुस्तकांचे प्रकाशन केले विविध कार्यक्रम तसेच शासकीय पातळीवरील कार्यक्रम करून या सगळ्यांची उतराई व्हावी म्हणून विद्यार्थ्यांमध्ये नवीन पिढी निर्माण करण्याचे कार्य आपल्या हातून घडावे या निस्वार्थ उद्देशाने मुलांना शाहिरी प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केलेले आहे,

Read More

मुंबई, दि. ५ ऑगस्ट : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे ‘देवेंद्र ते देवाभाऊ’ या बहुचर्चित पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले. अजित चव्हाण आणि कपिल हांडे लिखित हे पुस्तक विहान प्रकाशन तर्फे प्रकाशित होत असून, सुमारे ३५० पानांचे हे पुस्तक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनप्रवास, नेतृत्व आणि विकासदृष्टीचा सखोल वेध घेणारे संदर्भग्रंथ ठरणार आहे. लेखकांनी सांगितले की, गुरुपौर्णिमेच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुखपृष्ठाचे अनावरण करण्याचा मानस होता. मात्र विविध कारणांमुळे तो योग आज जुळून आला. पुस्तकाचे लेखन अत्यंत अभ्यासपूर्ण, वस्तुनिष्ठ आणि मनापासून करण्यात आले असून, प्रत्येक घटनेचा अभ्यास करून त्याचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. हे पुस्तक…

Read More

*माजी सैनिक, पत्नी व पाल्यांनी विशेष गौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन* *जळगाव, दि. 5 (जिमाका):* जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवा तसेच पाल्यांना सूचित करण्यात येते की, विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी व पाल्यांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी देश व राज्याची तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा वाढविणारे लक्षणीय कार्य केल्याबद्दल “विशेष गौरव पुरस्कार” देण्यात येणार आहे. तसेच इयत्ता १० वी बोर्डाच्या परीक्षेत ९० टक्के व इयत्ता १२ वी बोर्डाच्या परीक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या पाल्यांनाही सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या मार्फत विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यासाठी पात्र माजी सैनिक, पत्नी…

Read More

*स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व* *नवबौद्ध घटकांसाठी मार्जिन मनी योजना* *जळगाव, दिनांक 4 ऑगस्ट (जिमाका):* महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नवउद्योजकांना उद्योग व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत मार्जिन मनी देण्याची योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किमतीतील लाभार्थ्याच्या २५ टक्के हिस्स्यामधील जास्तीत जास्त १५ टक्के मार्जिन मनी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येते. लाभार्थ्याने १० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर आणि बँकेकडून स्टँडअप इंडिया योजनेंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर झाल्यानंतर उर्वरित १५ टक्के मार्जिन मनी शासनाकडून देण्यात येते. त्यामुळे अनुसूचित जाती व…

Read More

*शेतकऱ्यांना मिळणार परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव* *राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत युरोप व चीन येथे अभ्यास दौरे;* *पात्र शेतकऱ्यांना कमाल २ लाख रुपयांपर्यंत अनुदान* *जळगाव, दिनांक 4 ऑगस्ट (जिमाका):* राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढ, कृषी प्रक्रिया, निर्यात, बाजार व्यवस्थापन, यांत्रिकीकरण व सेंद्रिय शेतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी सन २०२६-२७ मध्ये राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत युरोप व चीन येथे अभ्यास दौरे आयोजित करण्यात येणार आहेत. योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातून ५ शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार असून त्यामध्ये किमान एक महिला शेतकरी तसेच एक राज्य किंवा केंद्र शासनाचा कृषी पुरस्कार प्राप्त अथवा पीक स्पर्धा विजेता शेतकरी असणे आवश्यक आहे. …

Read More