जळगाव : इंदाई पब्लिकेशन्स, जळगाव व इग्नाईट अकॅडेमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 7 जून) महा-टेस्ट सिरीजचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी दि. 7 जून 2026 रोजी सकाळी 11 ते 12 या वेळेत झालेल्या या परीक्षेत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेच्या धर्तीवर आयोजित करण्यात आलेल्या या टेस्ट सिरीजमुळे विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाचे मूल्यमापन करण्याची तसेच प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांच्या ज्ञान, वेग आणि अचूकतेची चाचणी घेण्यासाठी

आयोगाच्या स्वरूपानुसार प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली होती.
यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि आत्मविश्वासाचे महत्त्व पटवून देण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा परीक्षांचे नियमित आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकाश अडकमोल, किशोर सोनवणे, वसंत राठोड, आकाश बारेला, अविनाश पाटील व इंदाई पब्लिकेशन्स, जळगाव व इग्नाईट अकॅडेमी, पुणे यांच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व सहभागी विद्यार्थी, पालक व सहकाऱ्यांचे आभार मानले.
