नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान
नवी मुंबई :
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या सागरी सुरक्षा शाखेत कार्यरत असलेले पोलीस हवालदार श्री. मच्छिंद्र पवार यांना त्यांच्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
नवी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव श्री. अगरवाल तसेच नवी मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. मिलिंद भारंबे यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पवार यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले.
सागरी सुरक्षा शाखेत कार्यरत असताना त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना मा. पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले आहे. त्यांच्या या यशामुळे पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सहकाऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, श्री. मच्छिंद्र पवार यांनी आपल्या कार्यातून पोलीस दलाची प्रतिमा उंचावली असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी बदरखे गावातील नागरिक, समाज बांधव तसेच विविध स्तरातून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
