शैक्षणिक संस्था स्थापन केल्या जातात पण त्या पूर्णत्वास नेणे ही देखील एक मोठी जबाबदारी असते, आणि तीच जबाबदारी यशस्वीरित्या पार पडण्याचं काम एरंडोल येथील प्रसिद्ध दाम्प

त्य श्री.प्रसादजी काबरे आणि पियुषा काबरे यांनी केले. प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम स्कूल, एरंडोल या संस्थेचे अध्यक्ष म्हणून श्री.प्रसादजी काबरे यांनी CBSE Board चे शिक्षण आपल्या संस्थेत केंद्राच्या मान्यतेने विद्यार्थांना मिळावे यासाठी अहोरात्र प्रयत्न केले.आणि त्यांच्याच प्रयत्नांना बळ देण्याचं काम शाळेच्या उपाध्यक्षा सौ. पियुषा प्रसाद काबरे यांनी केले. या दोघांच्याही पाठीमागे सतत खंबीरपणे उभे असतं. ते त्यांचे कुटुंब आणि शाळेतील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी… या यशामागे सर्वांचेच हातभार होते. काल आलेल्या मान्यता प्रस्तावामुळे काबरे परिवारात,शाळेत आणि मित्रपरिवात आनंदाचे वातावरण आहे. जळगांव जिल्ह्यातील एक नामांकित शिक्षण संस्था म्हणून कमी वेळात शाळेने खूप प्रगती केली आहे. शाळेच्या विकासासाठी आणि पुढील वाटचालीसाठी सर्वांकडून शुभेच्छा वर्षाव होत आहे…
