Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता

October 17, 2026

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,जळगाव येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे बेमुदत धरणे आंदोलन.

October 16, 2026

पहूर येथे १७ ऑक्टोबरला आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

October 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Monday, October 19
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!
बातम्या

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

Team YuvaDishaBy Team YuvaDishaApril 16, 2026No Comments121 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून जिल्ह्यात १४ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ या कालावधीत ‘सामाजिक समता सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. या सप्ताहाचे मुख्य आकर्षण म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबवली जाणारी जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity) मिळवून देण्याची विशेष मोहीम. या मोहिमेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत प्रवेशित असलेल्या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेत प्रमाणपत्र देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जाती (SC), विजाभज (VJNT), इमाव (OBC), विमाप्र (SBC) आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे.

या विशेष मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा जात पडताळणी समितीने तालुका आणि महाविद्यालय निहाय कृती आराखडा तयार केला असून, विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची प्रकरणे संकलित करण्याची जबाबदारी महाविद्यालयांमधील ‘समान संधी केंद्रां’वर सोपवण्यात आली आहे. ही केंद्रे विद्यार्थ्यांचे अर्ज गोळा करून ते जिल्हा समितीकडे सुपूर्द करतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. विशेषतः CET, NEET, आणि GATE यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, तसेच डिप्लोमा आणि डी-फार्मसीच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ही मोहीम संजीवनी ठरणार आहे. ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी महाविद्यालयांमार्फत विशेष मार्गदर्शन वेबिनारचे देखील आयोजन केले जाणार आहे.

ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये काही त्रुटी असतील, त्या दूर करण्यासाठी जिल्हा जात पडताळणी कार्यालयाने १७ एप्रिल २०२६ आणि २० ते २१ एप्रिल २०२६ असे विशेष दिवस निश्चित केले आहेत. या काळात विद्यार्थी प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन आपल्या कागदपत्रांची पूर्तता करू शकतील. संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव श्रीमती एन. एस. रायते यांनी या मोहिमेबाबत अधिक माहिती देताना आवाहन केले आहे की, जिल्ह्यातील सर्व पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ही संधी दवडू नये. विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील ‘समान संधी केंद्रा’शी संपर्क साधून आपले परिपूर्ण अर्ज तातडीने सादर करावेत, जेणेकरून पुढील उच्च शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत त्यांना कोणतीही अडचण येणार नाही.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता

October 17, 2026

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,जळगाव येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे बेमुदत धरणे आंदोलन.

October 16, 2026

पहूर येथे १७ ऑक्टोबरला आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

October 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,562

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026740

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026536

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025461
Don't Miss

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता

By Team YuvaDishaOctober 17, 202617

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता -आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके जळगाव, दि.१७…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,जळगाव येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे बेमुदत धरणे आंदोलन.

October 16, 2026

पहूर येथे १७ ऑक्टोबरला आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

October 16, 2026

पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ विकास विद्यालयात संपन्न

October 3, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.