Author: Team YuvaDisha

राजकीय घडामोडी – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांसाठी मोठी बातमी आहे. राज्य निवडणूक आयोग पुढील आठवड्यात, बहुधा सोमवार किंवा मंगळवारी, नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. ही घोषणा होताच संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू होईल. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तीन टप्प्यांत पार पाडण्याचे नियोजन केले आहे. 🗓️ टप्पा १: नगरपालिका आणि नगर पंचायती (नोव्हेंबरमध्ये मतदान) निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर होतील. वेळापत्रक: निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर अवघ्या २१ दिवसांतच या निवडणुकांचे मतदान पार पडेल. मतदान: पहिल्या टप्प्याचे मतदान नोव्हेंबर महिन्यात होण्याची…

Read More

उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, मग काय आलो मुंबईहून मावशीच्या गावी अकोल्याला फिरायला. मी आलो की आम्ही सर्वजण गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावी जातोच,त्यादिवशी आम्ही सर्वजण शेगावी जाऊन दर्शन घेऊन नुकतेच अकोल्याला गावी परत आलो. दिवसभर रांगेत लागून आधीच थकलो होतो मग काय जेवलो आणि कुलरच्या गार हवेत झोपलो. मधात मी आणि आजुबाजूला दोन्ही मावसभाऊ झोपले, मावशी काका आणि मावसबहिण बाजूच्या खोलीत झोपायला गेले. रात्री २ – २:३० च्या सुमारास मी लघुशंकेसाठी उठलो, खेडेगावात नीरव शांतता पसरली होती, सर्वत्र काळोख, मी घराच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूम मध्ये जाऊन आलो, घरात येताना जेव्हा घराचे दार लावले त्या वेळेस अगदी थंड गार हवेची…

Read More

बाजाराचा दिवस होता. बाजाराचे गाव तालुक्याचे ठिकाण होते त्यामुळे तालुक्याच्या या गावात आजूबाजूच्या खेड्या-पाड्यांतून आलेल्या माणसांची दाट वर्दळ जमा झाली होती. सकाळची कामे उरकून आलेली ती वर्दळ किराणा, भाजीपाला आणि इतर आवश्यक वस्तूंची खरेदी करून परतण्याच्या घाईत होती. बाजाराच्या गावाने अवघ्या परिसरातील खेड्या-पाड्यांतील माणसांना आपल्या उदरात सामावून घेतले होते. बाजारात उत्साह तसेच वस्तूंच्या आणि पैशांच्या देवाणघेवाणीचा एक अखंड नाद वातावरणात भरून राहिला होता. संध्याकाळची वेळ झाली होती. घड्याळाने सहाचा आकडा कधी पार केला हे कळलेच नाही. सूर्य आता पूर्ण मावळला नव्हता, पण त्याची तीव्रता बरीच कमी झाली होती. बाजाराच्या वर्दळीने कमावलेला शारीरिक थकवा आता प्रत्येक चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मी…

Read More

 मुंबई : महाराष्ट्र ऑलिम्‍पिक संघटनेच्‍या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या ऑलिम्‍पिक पॅनेलचे पारडे जड असल्‍याचे स्‍पष्ट झाले आहे. येत्‍या रविवारी होणाऱ्या एमओएच्‍या निवडणुकीत २१ उमेदवार अजित पवार गटाचे असून त्‍यापैकी ३ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मुंबईत २ नोव्‍हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्‍पिक संघटनेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ऑलिम्‍पिक पॅनलची घोषणा माजी ऑलिम्‍पिकपटू आदिल सुमारीवाला यांनी केली आहे. मतदार ३१ संघटनांपैकी २५ पेक्षा अधिक संघटनांनी अजित पवार यांना पाठिंबा जाहिर केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या ऑलिम्‍पिक पॅनेलचे उमेदवार पुढीलप्रमाणे अध्यक्ष – ना. अजित पवार, वरिष्ठ उपाध्यक्ष – मा. अशोक पंडित, उपाध्यक्ष – मा.आदिल सुमारीवाला- बिनविरोध निवड उपाध्यक्ष – मा.प्रदिप गंधे, बिनविरोध…

Read More

जळगाव – केसीई सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील वरिष्ठ लघुलेखक डॉ. सुभाष रूपचंद तळेले यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी ‘जनसंवाद आणि पत्रकरिता’ या विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान केली आहे. त्यांनी प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर संशोधन कार्य पूर्ण केले. त्यांच्या संशोधन प्रबंधाचा विषय – “मराठी वृत्तपत्रांनी योगविषयक केलेली जागरूकता व त्याचा जनमानसावरील परिणाम: चिकीत्सक अध्ययन” (विशेष संदर्भ: जळगाव जिल्ह्यातील दैनिक दिव्य मराठी, लोकमत व सकाळ) असा होता. या संशोधनात जळगाव जिल्ह्यातील मराठी दैनिकांमधून योगाबाबत जनजागृती कशी घडते आणि त्याचा समाजाच्या विविध घटकांवर आरोग्यविषयक व सामाजिक वर्तनावर काय परिणाम होतो, याचा सखोल अभ्यास…

Read More

जळगाव – मू.जे.महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातील डॉ.अखिलेश शर्मा यांची महर्षि दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंती निमित्त तसेच आर्य समाज स्थापनेच्या 150 व्या गौरव वर्षानिमित्त दिल्ली येथे होणा-या सार्द्ध आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनात दि. 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 यादरम्यान वैदिक गुरुकुलीय शास्त्रीय प्रतिस्पर्धांचे संयोजक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय महासंमेलनाचे उदघाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होणार आहे, असे महासंमेलनाचे पदाधिकारी स्वामी प्रणवानंद सरस्वती, आचार्य डॉ. धनंजय व धर्मपाल आर्य यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. ही जबाबदारी मिळाल्याबद्दल त्यांचे के.सी.ई.चे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे,महाविद्यालयाचे प्राचार्य स. ना. भारंबे, उपप्राचार्य प्रा. देवेंद्र इंगळे, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रो. भूपेंद्र…

Read More

 जळगाव – किशोरआप्पा पाटील बहुउद्देशीय संस्था आणि द युनिक अकॅडमी (जळगाव) यांच्या विद्यमाने रविवारी पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी भवनात रविवारी सकाळी ११ वाजता आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. आमदार किशोर पाटील यांच्या संपर्क कार्यालयात देखील नाव नोंदणीची व्यवस्था केली आहे. एकूण १०० गुणांची स्पर्धा ही सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता आणि गणिताच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. स्पर्धा सर्वांसाठी मोफत आणि खुली असली, तरी नाव नोंदणीशिवाय कोणालाच सहभागी होता येणार नाही. स्पर्धेसाठी एक तासाची वेळ देण्यात येईल. प्रथम विजेत्यास रोख ११ हजार रूपये,…

Read More

 जळगाव, दिनांक 29 ऑक्टोंबर : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक 3 नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अर्चना मोरे यांनी दिली आहे. तरी नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदरहू अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळालेले नसेल अशाच वैयक्तिक हितसंबधाबाबतच्या तक्रारी घेऊन या लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Read More

उदयनगर (ता. अमळनेर) येथे समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आजी-माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन सोमवार, दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनात सर्व माजी विद्यार्थ्यांनी लोकसहभागातून आर्थिक, श्रमदान, कौशल्या धारित मार्गदर्शन, अशा विविध स्वरूपात शाळेला मदत करण्याचा ठराव एकमुखाने केला. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच प्रकाश वाघ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “हीच ती शाळा जिथे आपण अक्षर ओळखली, शिस्त शिकलो आणि जीवनात लढत पुढे जाण्याची प्रेरणा मिळवली. या शाळेनेच आपल्याला जगण्याचे आणि आनंदाने जगवण्याचे बळ दिले.” अशा या माय माऊलीच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करूया.. ज्या शाळेने आपल्यावर ‘ज्ञानाचे कर्ज’ केले, ते किमान काही अंशी तरी परत फेडण्याची ही…

Read More

 जळगाव- केसीई सोसायटी संचलित ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात 2004 या शैक्षणिक वर्षाच्या बॅचच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला भेट दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विद्यार्थ्यांनी शाळेत आल्यानंतर वीस एकवीस वर्षांपूर्वी शाळेत आपण कसे होतो, किती मस्ती करायचो, शिक्षकांच्या हातचा किती मार खायचो, या सर्व आठवणी जाग्या केल्या. सर्वात महत्त्वाचे आलेले सर्व विद्यार्थी शाळेचे वर्गातले बॅकबेंचर्स होते पण आज त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी होते. पुण्याच्या येरवडा जेलमध्ये पी.एस.आय जेलर बनलेल्या परविन तडवी या विद्यार्थिनीने शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. रूपाली ओगले मुंबईला शिक्षिका असणारी रूपाली शिंदे, साडेचारशे मुलांना डबा पुरवणारी मेस चालवणारी कविता पाटील या…

Read More