Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team YuvaDisha
जळगाव – किशोरआप्पा पाटील बहुउद्देशीय संस्था आणि द युनिक अकॅडमी (जळगाव) यांच्या विद्यमाने रविवारी पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी भवनात रविवारी सकाळी ११ वाजता आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. आमदार किशोर पाटील यांच्या संपर्क कार्यालयात देखील नाव नोंदणीची व्यवस्था केली आहे. एकूण १०० गुणांची स्पर्धा ही सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता आणि गणिताच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. स्पर्धा सर्वांसाठी मोफत आणि खुली असली, तरी नाव नोंदणीशिवाय कोणालाच सहभागी होता येणार नाही. स्पर्धेसाठी एक तासाची वेळ देण्यात येईल. प्रथम विजेत्यास रोख ११ हजार रूपये,…
जळगाव, दिनांक 29 ऑक्टोंबर : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक 3 नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अर्चना मोरे यांनी दिली आहे. तरी नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदरहू अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळालेले नसेल अशाच वैयक्तिक हितसंबधाबाबतच्या तक्रारी घेऊन या लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
उदयनगर (ता. अमळनेर) येथे समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आजी-माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन सोमवार, दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनात सर्व माजी विद्यार्थ्यांनी लोकसहभागातून आर्थिक, श्रमदान, कौशल्या धारित मार्गदर्शन, अशा विविध स्वरूपात शाळेला मदत करण्याचा ठराव एकमुखाने केला. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच प्रकाश वाघ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “हीच ती शाळा जिथे आपण अक्षर ओळखली, शिस्त शिकलो आणि जीवनात लढत पुढे जाण्याची प्रेरणा मिळवली. या शाळेनेच आपल्याला जगण्याचे आणि आनंदाने जगवण्याचे बळ दिले.” अशा या माय माऊलीच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करूया.. ज्या शाळेने आपल्यावर ‘ज्ञानाचे कर्ज’ केले, ते किमान काही अंशी तरी परत फेडण्याची ही…
जळगाव- केसीई सोसायटी संचलित ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात 2004 या शैक्षणिक वर्षाच्या बॅचच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला भेट दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विद्यार्थ्यांनी शाळेत आल्यानंतर वीस एकवीस वर्षांपूर्वी शाळेत आपण कसे होतो, किती मस्ती करायचो, शिक्षकांच्या हातचा किती मार खायचो, या सर्व आठवणी जाग्या केल्या. सर्वात महत्त्वाचे आलेले सर्व विद्यार्थी शाळेचे वर्गातले बॅकबेंचर्स होते पण आज त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी होते. पुण्याच्या येरवडा जेलमध्ये पी.एस.आय जेलर बनलेल्या परविन तडवी या विद्यार्थिनीने शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. रूपाली ओगले मुंबईला शिक्षिका असणारी रूपाली शिंदे, साडेचारशे मुलांना डबा पुरवणारी मेस चालवणारी कविता पाटील या…
जळगाव-के. सी. ई. सोसायटीच्या पी. जी. कॉलेज ची विद्यार्थिनी नेहा पुंडलिक पाटील एप्रिल २०२५ मध्ये झालेली विद्यापिठा च्या परिक्षा मध्ये एम. एस. सी., अॅन्यालीटीकॅल केमिस्ट्री मध्ये विद्यापीठाच्या मेरीट मध्ये येऊन महाविद्यालयात सुद्धां प्रथम येण्याचा मान पटकावला. महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. के. बी. महाजन, तसेच रसायन शास्त्र विभागाचे प्राध्यापक व डॉ. व्ही. एस. झोपे यांनी या यशाबद्दल तिचे अभिनंदन केले.
जळगाव- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज ऑफ सायन्स, आर्ट्स व कॉमर्स, जळगाव च्या अंतर्गत गुणवत्ता हमी सेल तर्फे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या साठी इंडक्शन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. उद्घाटनाच्या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यलायाचे प्राचार्य डॉ. के बी महाजन, शैक्षणिक सल्लागार प्रा. व्ही. एस. झोपे, प्रा. संदीप पाटील, समन्वयक, अंतर्गत गुणवत्ता हमी सेल, व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. के. पी. नारखेडे, समन्वयक अंतर्गत गुणवत्ता हमी सेल, मू. जे. महाविद्यालय, जळगाव हे उपस्थित होते. पाहुण्याचा परिचय प्रा. संदीप पाटील यांनी करून दिला. डॉ. के. बी. महाजन यांनी इंडक्शन प्रशिक्षण कार्यक्रम चे प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. के. पी. नारखेडे, यांनी…
जळगाव, दिनांक 28 ऑक्टोंबर – भारत सरकारच्या अणुऊर्जा विभाग आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ऑक्टोबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हैदाराबाद येथून सुमारे १० उच्च उंचीवरील वैज्ञानिक बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. ही उड्डाणे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR), ईसीआयएल, हैद्राराबाद-५०००६२ येथील बलून सुविधा केंद्रातून केली जाणार आहेत. ही बलून उड्डाणे १९५९ पासून महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने होत असून, यंदाही त्याच परंपरेत प्रयोग पार पडतील. बलून हायड्रोजन वायूने भरलेली असून त्यांचा व्यास ५० ते ८५ मीटर इतका असतो. ही बलून ३० ते ४२ किलोमीटर उंचीवर वैज्ञानिक उपकरणे वाहून नेतात आणि काही तासांच्या प्रयोगानंतर…
*जळगाव दि. २४ ऑक्टोबर २०२५ (जिमाका वृत्तसेवा) :* एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल, जि. जळगाव अंतर्गत विविध शासकीय आश्रमशाळांमधील प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) व माध्यमिक शिक्षक पदे तात्पुरत्या स्वरूपात बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, नाशिक तसेच मे. महाराष्ट्र विकास ग्रुप, नाशिक या संस्थांमार्फत उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. तरी प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) D.Ed & TET-2/CTET-(Compulsory) (Manithi Medium) & TAIT Score. व माध्यमिक शिक्षक (शैक्षणिक पात्रता:-BA/BSC (Specialized Subject-English/Math/Physics/Chemistry/Biology) & B.Ed (Compulsory) & TAIT Score ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक २० ऑक्टोबर २०२५ ते दिनांक ३१…
काव्यरत्नांजली नव्हे ते तर…. जळगाव शहरातील हार्ट ऑफ द सिटी म्हणता येईल असा सर्वांचा एकमेव आवडता चौक म्हणजे महाबळ रोडवरील केआरसी “काव्यरत्नावली” चौक .गेल्या आठवड्यात समाज माध्यमावरील बातमीत या चौकाचे नाव चुकून वेगळेच दिसले. काव्य रतनांजली.कुणी काही म्हणत कुणी काही लिहितं पण कोण हे , काय आहे हे, हे शोधत बसायला वेळही नाही. बरं त्या चौकातही तशी माहिती नाही.असो. तब्बल १३८ वर्षा पूर्वी म्हणजे १८८८ साली महाराष्ट्रात प्रथमच कवितेला वाहिलेले एक मासिक त्या काळातील खान्देश जिल्ह्यात सुरू झाले. ब्रिटिशांच्या काळात फक्त कवितेसाठी असं मासिक सुरू करण्याच धाडस ज्यांनी केलं त्या थोर महापुरुषाचे नाव आहे नानासाहेब नारायण नरसिंह फडणीस. त्यांनी जळगाव…
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट स्वायत्त महाविद्यालय जळगाव यांचा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आयोजित ‘युवा रंग २०२५’ मध्ये माईम थिएटर प्रकारात प्रथम क्रमांक सुवर्ण पदकाचे मानकरी म्हणून निवड झाली. महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागातर्फे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे : हर्षा ओच्छानी, अमृता करोडपती, रोहित सोनवणे, गायत्री पवार, तेजस्विनी निकम व रोहित पाटील. या उत्तुंग यशासाठी के सी ई संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रज्ञावंत श्री .नंदकुमार बेंडाळे व उपाध्यक्ष सचिव , संचालक व सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी सर यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मोलाची ठरली.या पुरस्कारप्राप्त माईम नाट्य सादरीकरणाचे दिग्दर्शन व्यवस्थापन विभागाच्या(ABM/E) विभागाचे…
