Author: Team YuvaDisha

 जळगाव (६ नोव्हेंबर २०२५) – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय पक्षांनी उमेदवार निश्चितीसाठी तयारी सुरू केली आहे. पाचोरा मतदारसंघातील पाचोरा आणि भडगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत असून, शिवसेनेकडून उमेदवार निवड प्रक्रियेला वेग आला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आमदार किशोर आप्पा पाटील हे विविध प्रभागातील इच्छुकांशी स्वतंत्ररीत्या संवाद साधणार आहेत. पाचोरा नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवालय शिवसेना कार्यालयात घेण्यात येतील. तर शनिवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून भडगाव येथील…

Read More

 महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागामार्फत भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त नंदुरबार येथील शिवाजी नाट्य मंदिरात आयोजित भगवान बिरसा मुंडा कला संगम विभागीय स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये चित्रकला स्पर्धेत कल्याणी राजेश वळवी हिने तृतीय क्रमांक मिळवला. तिने आदिवासी संस्कृतीतील गोंड कलेचा वापर करून चित्र काढले होते. तिला स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख 7500 रुपये देऊन गौरविण्यात आले. तिच्या या यशाप्रित्यर्थ विद्यालयातर्फे कल्याणीचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर यांनी तिचा सत्कार केला. याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. के, चौधरी, ज्येष्ठ शिक्षक मिलिंद वडनगरे, धर्मेंद्र मराठे, टिका पाडवी, संतोष पाटील, राजेश वळवी, गौरीशंकर धुमाळ, मेधा गायकवाड उपस्थित होते. कल्याणीची…

Read More

जळगाव – राज्य निवडणूक आयोगाने अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2025 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. घोषित कार्यक्रमानुसार —  अर्ज दाखल करण्यास सुरुवात: 10 नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख: 17 नोव्हेंबर अर्जांची छाननी: 18 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 25 नोव्हेंबर मतदान: 2 डिसेंबर मतमोजणी: 3 डिसेंबर या निवडणुका राज्यातील स्थानिक स्वराज्य व्यवस्थेला नवसंजीवनी देणार असून, राजकीय पक्षांसाठी ही एक मोठी कसोटी ठरणार आहे. अनेक नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये सत्तेचा ताबा मिळवण्यासाठी प्रमुख पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read More

 जळगाव, दि. १ नोव्हेंबर –  (जिमाका वृत्तसेवा) शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यातील सर्व शेतकरी खातेदारांचे एकत्रित डिजिटल डेटाबेस तयार करण्यासाठी “ॲग्रीस्टॅक( Agristack)” हा डिजिटल उपक्रम राबविण्यात येत आहे.सर्व शेतकरी खातेदार बांधवांना नैसर्गिक आपत्ती अनुदान तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी त्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक शेतकरी खातेदाराचा डिजिटल शेतकरी आयडी (Digital Farmer ID) तयार केला जाणार आहे. या आयडीद्वारे शेतकऱ्यांना सर्व कृषी विषयक शासकीय योजना, दुष्काळी अनुदाने, पिक विमा योजना तसेच इतर कृषी योजनांचा लाभ सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळणार आहे. या नोंदणीसाठी सेतु सुविधा केंद्रे व महा ई-सेवा केंद्रे…

Read More

 जळगाव येथे झालेल्या नाशिक विभागस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत 17 वर्षे वयोगटा अंतर्गत एकलव्य विद्यालयाची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. वैष्णवी संदिप मानकर हिने प्रथम क्रमांक प्राप्त करत सातारा येथे होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा बहुमान मिळविला. वैष्णवी ने सलग तिसऱ्या वर्षी राज्यस्तरावर जाण्याचा बहुमान मिळविला आहे. प.खा.भिल्ल सेवा मंडळांचे अध्यक्ष डाॅ सुहास नटावदकर,एकलव्य विद्यालयाच्या माजी प्राचार्या सुहासिनी नटावदकर, मुख्याध्यापक सुनील चौधरी, यांनी वैष्णवीचे अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. वैष्णवीला विद्यालयातील क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Read More

जळगाव – केसीई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या एमबीए विभागात “How to Solve Case Study” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस प्रमुख संसाधन व्यक्ती म्हणून सुप्रसिद्ध शैक्षणिक तज्ञ डॉ. शुभदा मोहन कुलकर्णी उपस्थित होत्या. कार्यशाळेच्या सुरुवातीला एमबीए पहिल्या वर्षाचा विद्यार्थी श्री. सारंग पाटील यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात विद्यार्थ्यांना केस स्टडी विश्लेषणाचे महत्त्व समजावून सांगितले आणि या उपक्रमासाठी एमबीए विभागाचे अभिनंदन केले. संसाधन व्यक्ती डॉ. शुभदा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना केस स्टडी सोडविण्याची पद्धत, विश्लेषणात्मक विचारसरणी विकसित करणे आणि व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून…

Read More

जळगाव (दि. ३१ ऑक्टोबर २०२५ ते १ नोव्हेंबर २०२५) – के.सी.ई. सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या एम.बी.ए. विभागात “हॅण्ड्स-ऑन सेशन ऑन एक्सेल विथ ए.आय.” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे मार्गदर्शन श्रीमती वर्षा पाटील (श्रीकृष्ण कॉम्प्युटर्स) यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना मायक्रोसॉफ्ट एक्सेलचे मूलभूत ज्ञान तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून डेटा विश्लेषण, रिपोर्टिंग आणि निर्णयप्रक्रिया अधिक प्रभावी कशी करता येते हे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे समजावून सांगितले. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांचे सतत प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यवस्थापन क्षेत्रात आपले कौशल्य विकसित करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे समन्वयक…

Read More

जळगाव-बीड येथे दिनांक ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या तृतीय राज्यस्तरीय लॅक्रॉस स्पर्धेचे (पुरुष व महिला) आयोजन बीड जिल्हा लॅक्रॉस असोसिएशन, बीड आणि बालभिम महाविद्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या स्पर्धेत खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव येथील मितेश चंद्रकांत सोनवणे (बीबीए – पहिला वर्ष) या विद्यार्थ्याने उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक (Gold Medal) जिंकून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. मितेशच्या या यशाबद्दल संस्थेचे संचालक प्रा. बी. व्ही. पवार शिक्षकवृंद आणि सहाध्यायींनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या , तसेच डॉ. नीलिमा पाटील (शारीरिक संचालक) यांचे मार्गदर्शन लाभले…

Read More

जळगाव – खान्देशातील शास्त्रीय संगीत साधकांसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरलेले खान्देश म्युझिक सर्कलचे सलग सहावे संगीत संमेलन यावर्षीही उत्साहात संपन्न झाले.के.सी.ई सोसायटी संचलित कान्ह ललित कला केंद्र, जळगाव यांच्या विशेष सहकार्याने हे संमेलन दिनांक १ आणि २ नोव्हेंबर २०२५ (शनिवार आणि रविवार) रोजी आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात खान्देशातील संगीत क्षेत्रातील गायक आणि वादक अशा एकूण २५ संगीत साधकांनी एकत्र येऊन आपली कला सादर केली. सर्व कलाकारांनी उत्तम गायन, वादन केलेच पण त्या बरोबर अभ्यासात्मक, सांस्कृतिक आणि सांगीतिक विचारांची देवाणघेवाण देखील केली. संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला के.सी.ई सोसायटीचे सहसचिव ॲड.प्रवीणचंद्र जंगले, शैक्षणिक संचालक डॉ. मृणालिनी फडणवीस, कान्ह ललित कला केंद्राचे…

Read More

पोलिस भरती अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2025 महाराष्ट्र पोलिस दलात नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या हजारो तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर महाराष्ट्र पोलिस भरती २०२४-२५ साठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलिस महासंचालक या भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळांवर — 1]www.mahapolice.gov.in 2]http://policerecruitment2025.mahait.org/ — उपलब्ध करून देण्यात आली आहे. भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांना आपल्या पात्रतेनुसार ऑनलाइन अर्ज भरता येईल. यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु न झाल्याने अनेक उमेदवार प्रतीक्षेत होते. अखेर अर्ज भरण्याची सुविधा सुरू झाली असल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र पोलिस भरती २०२४-२५ अंतर्गत विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली…

Read More