Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team YuvaDisha
जळगाव-बीड येथे दिनांक ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या तृतीय राज्यस्तरीय लॅक्रॉस स्पर्धेचे (पुरुष व महिला) आयोजन बीड जिल्हा लॅक्रॉस असोसिएशन, बीड आणि बालभिम महाविद्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या स्पर्धेत खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव येथील मितेश चंद्रकांत सोनवणे (बीबीए – पहिला वर्ष) या विद्यार्थ्याने उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक (Gold Medal) जिंकून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. मितेशच्या या यशाबद्दल संस्थेचे संचालक प्रा. बी. व्ही. पवार शिक्षकवृंद आणि सहाध्यायींनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या , तसेच डॉ. नीलिमा पाटील (शारीरिक संचालक) यांचे मार्गदर्शन लाभले…
जळगाव – खान्देशातील शास्त्रीय संगीत साधकांसाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरलेले खान्देश म्युझिक सर्कलचे सलग सहावे संगीत संमेलन यावर्षीही उत्साहात संपन्न झाले.के.सी.ई सोसायटी संचलित कान्ह ललित कला केंद्र, जळगाव यांच्या विशेष सहकार्याने हे संमेलन दिनांक १ आणि २ नोव्हेंबर २०२५ (शनिवार आणि रविवार) रोजी आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात खान्देशातील संगीत क्षेत्रातील गायक आणि वादक अशा एकूण २५ संगीत साधकांनी एकत्र येऊन आपली कला सादर केली. सर्व कलाकारांनी उत्तम गायन, वादन केलेच पण त्या बरोबर अभ्यासात्मक, सांस्कृतिक आणि सांगीतिक विचारांची देवाणघेवाण देखील केली. संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला के.सी.ई सोसायटीचे सहसचिव ॲड.प्रवीणचंद्र जंगले, शैक्षणिक संचालक डॉ. मृणालिनी फडणवीस, कान्ह ललित कला केंद्राचे…
पोलिस भरती अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2025 महाराष्ट्र पोलिस दलात नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या हजारो तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर महाराष्ट्र पोलिस भरती २०२४-२५ साठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलिस महासंचालक या भरतीसंदर्भातील सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळांवर — 1]www.mahapolice.gov.in 2]http://policerecruitment2025.mahait.org/ — उपलब्ध करून देण्यात आली आहे. भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांना आपल्या पात्रतेनुसार ऑनलाइन अर्ज भरता येईल. यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु न झाल्याने अनेक उमेदवार प्रतीक्षेत होते. अखेर अर्ज भरण्याची सुविधा सुरू झाली असल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र पोलिस भरती २०२४-२५ अंतर्गत विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली…
राजकीय घडामोडी – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांसाठी मोठी बातमी आहे. राज्य निवडणूक आयोग पुढील आठवड्यात, बहुधा सोमवार किंवा मंगळवारी, नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. ही घोषणा होताच संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू होईल. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तीन टप्प्यांत पार पाडण्याचे नियोजन केले आहे. 🗓️ टप्पा १: नगरपालिका आणि नगर पंचायती (नोव्हेंबरमध्ये मतदान) निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर होतील. वेळापत्रक: निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर अवघ्या २१ दिवसांतच या निवडणुकांचे मतदान पार पडेल. मतदान: पहिल्या टप्प्याचे मतदान नोव्हेंबर महिन्यात होण्याची…
उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, मग काय आलो मुंबईहून मावशीच्या गावी अकोल्याला फिरायला. मी आलो की आम्ही सर्वजण गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावी जातोच,त्यादिवशी आम्ही सर्वजण शेगावी जाऊन दर्शन घेऊन नुकतेच अकोल्याला गावी परत आलो. दिवसभर रांगेत लागून आधीच थकलो होतो मग काय जेवलो आणि कुलरच्या गार हवेत झोपलो. मधात मी आणि आजुबाजूला दोन्ही मावसभाऊ झोपले, मावशी काका आणि मावसबहिण बाजूच्या खोलीत झोपायला गेले. रात्री २ – २:३० च्या सुमारास मी लघुशंकेसाठी उठलो, खेडेगावात नीरव शांतता पसरली होती, सर्वत्र काळोख, मी घराच्या मागील बाजूस असलेल्या बाथरूम मध्ये जाऊन आलो, घरात येताना जेव्हा घराचे दार लावले त्या वेळेस अगदी थंड गार हवेची…
बाजाराचा दिवस होता. बाजाराचे गाव तालुक्याचे ठिकाण होते त्यामुळे तालुक्याच्या या गावात आजूबाजूच्या खेड्या-पाड्यांतून आलेल्या माणसांची दाट वर्दळ जमा झाली होती. सकाळची कामे उरकून आलेली ती वर्दळ किराणा, भाजीपाला आणि इतर आवश्यक वस्तूंची खरेदी करून परतण्याच्या घाईत होती. बाजाराच्या गावाने अवघ्या परिसरातील खेड्या-पाड्यांतील माणसांना आपल्या उदरात सामावून घेतले होते. बाजारात उत्साह तसेच वस्तूंच्या आणि पैशांच्या देवाणघेवाणीचा एक अखंड नाद वातावरणात भरून राहिला होता. संध्याकाळची वेळ झाली होती. घड्याळाने सहाचा आकडा कधी पार केला हे कळलेच नाही. सूर्य आता पूर्ण मावळला नव्हता, पण त्याची तीव्रता बरीच कमी झाली होती. बाजाराच्या वर्दळीने कमावलेला शारीरिक थकवा आता प्रत्येक चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मी…
मुंबई : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ऑलिम्पिक पॅनेलचे पारडे जड असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या रविवारी होणाऱ्या एमओएच्या निवडणुकीत २१ उमेदवार अजित पवार गटाचे असून त्यापैकी ३ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मुंबईत २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ऑलिम्पिक पॅनलची घोषणा माजी ऑलिम्पिकपटू आदिल सुमारीवाला यांनी केली आहे. मतदार ३१ संघटनांपैकी २५ पेक्षा अधिक संघटनांनी अजित पवार यांना पाठिंबा जाहिर केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ऑलिम्पिक पॅनेलचे उमेदवार पुढीलप्रमाणे अध्यक्ष – ना. अजित पवार, वरिष्ठ उपाध्यक्ष – मा. अशोक पंडित, उपाध्यक्ष – मा.आदिल सुमारीवाला- बिनविरोध निवड उपाध्यक्ष – मा.प्रदिप गंधे, बिनविरोध…
जळगाव – केसीई सोसायटी संचलित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील वरिष्ठ लघुलेखक डॉ. सुभाष रूपचंद तळेले यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी ‘जनसंवाद आणि पत्रकरिता’ या विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान केली आहे. त्यांनी प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर संशोधन कार्य पूर्ण केले. त्यांच्या संशोधन प्रबंधाचा विषय – “मराठी वृत्तपत्रांनी योगविषयक केलेली जागरूकता व त्याचा जनमानसावरील परिणाम: चिकीत्सक अध्ययन” (विशेष संदर्भ: जळगाव जिल्ह्यातील दैनिक दिव्य मराठी, लोकमत व सकाळ) असा होता. या संशोधनात जळगाव जिल्ह्यातील मराठी दैनिकांमधून योगाबाबत जनजागृती कशी घडते आणि त्याचा समाजाच्या विविध घटकांवर आरोग्यविषयक व सामाजिक वर्तनावर काय परिणाम होतो, याचा सखोल अभ्यास…
जळगाव – मू.जे.महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातील डॉ.अखिलेश शर्मा यांची महर्षि दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंती निमित्त तसेच आर्य समाज स्थापनेच्या 150 व्या गौरव वर्षानिमित्त दिल्ली येथे होणा-या सार्द्ध आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनात दि. 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 यादरम्यान वैदिक गुरुकुलीय शास्त्रीय प्रतिस्पर्धांचे संयोजक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय महासंमेलनाचे उदघाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होणार आहे, असे महासंमेलनाचे पदाधिकारी स्वामी प्रणवानंद सरस्वती, आचार्य डॉ. धनंजय व धर्मपाल आर्य यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. ही जबाबदारी मिळाल्याबद्दल त्यांचे के.सी.ई.चे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे,महाविद्यालयाचे प्राचार्य स. ना. भारंबे, उपप्राचार्य प्रा. देवेंद्र इंगळे, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रो. भूपेंद्र…
जळगाव – किशोरआप्पा पाटील बहुउद्देशीय संस्था आणि द युनिक अकॅडमी (जळगाव) यांच्या विद्यमाने रविवारी पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी भवनात रविवारी सकाळी ११ वाजता आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. आमदार किशोर पाटील यांच्या संपर्क कार्यालयात देखील नाव नोंदणीची व्यवस्था केली आहे. एकूण १०० गुणांची स्पर्धा ही सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता आणि गणिताच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल. स्पर्धा सर्वांसाठी मोफत आणि खुली असली, तरी नाव नोंदणीशिवाय कोणालाच सहभागी होता येणार नाही. स्पर्धेसाठी एक तासाची वेळ देण्यात येईल. प्रथम विजेत्यास रोख ११ हजार रूपये,…
