Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

इंदाई पब्लिकेशन्स व इग्नाईट अकॅडेमी, पुणे तर्फे महा-टेस्ट सिरीज संपन्न

June 7, 2026

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

May 3, 2026

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Wednesday, July 22
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»शिक्षण»अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन
शिक्षण

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

Team YuvaDishaBy Team YuvaDishaFebruary 25, 2026No Comments87 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन
जळगाव, 25 फेब्रुवारी
राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र यांच्यामार्फत परदेशात शिक्षणसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता पात्र ४० गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
या योजनेंतर्गत परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता (निवास व भोजन), शैक्षणिक आकस्मिक खर्च, विमान प्रवास खर्च, व्हिसा शुल्क तसेच आरोग्य विमा यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. शैक्षणिक आकस्मिक खर्चासाठी अमेरिका व इतर देशांसाठी (यूके वगळून) १५०० यूएस डॉलर, तर यूकेसाठी ११०० जीबीपी इतकी रक्कम मंजूर करण्यात येईल.
लाभार्थी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे. संबंधित विद्यापीठाचे क्यूएस वर्ल्ड रँकिंग २०० च्या आत असणे बंधनकारक राहील. पात्र विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास उत्पन्न मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत शिथिल करण्यात येईल तसेच क्यूएस रँकिंग मर्यादा ३०० पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. पदव्युत्तर पदवी/पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी वयोमर्यादा ३५ वर्षे, तर पीएचडीसाठी ४० वर्षे आहे. विद्यार्थ्यांनी TOEFL, IELTS किंवा समकक्ष प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. विहित नमुन्यातील अर्ज https://fs.maharashtra.gov.in⁠ या संकेतस्थळावर सादर करावेत. निवड समितीद्वारे निकष पूर्ण करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

इंदाई पब्लिकेशन्स व इग्नाईट अकॅडेमी, पुणे तर्फे महा-टेस्ट सिरीज संपन्न

June 7, 2026

हस्ती स्कूलच्या तलवारबाजीपटूंचा राज्यस्तरावर स्तुत्य प्रवेश

November 14, 2025

के. सी. ई. चे पी. जी. कॉलेज ची विद्यार्थिनी विद्यापिठा च्या मेरीट मध्ये..

October 28, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,551

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026737

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025461
Don't Miss

इंदाई पब्लिकेशन्स व इग्नाईट अकॅडेमी, पुणे तर्फे महा-टेस्ट सिरीज संपन्न

By Team YuvaDishaJune 7, 202670

जळगाव : इंदाई पब्लिकेशन्स, जळगाव व इग्नाईट अकॅडेमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 7…

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

May 3, 2026

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी… आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.