Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team YuvaDisha
जळगाव – भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय (MIC) आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (AICTE) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बहुप्रतिक्षित स्मार्ट इंडिया हॅकेथॉन (SIH) २०२५ मध्ये के.सी.ई.एस. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन स्वायत्त् महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. ‘स्वच्छ आणि हरित तंत्रज्ञान’ थीममध्ये ‘संकरित ऊर्जा’ प्रकल्पाची बाजी के.सी.ई.एस. च्या संगणक अभियांत्रिकी विभागाच्या ‘इको कॅम्पस’ (Eco Campus) या संघाने ‘स्वच्छ आणि हरित तंत्रज्ञान’ या महत्त्वाकांक्षी थीम अंतर्गत आपला प्रकल्प सादर केला आहे. त्यांच्या प्रकल्पाचे शीर्षक “संकरित नवीकरणीय ऊर्जा निर्मिती उपाययोजना” (Hybrid Renewable Energy Generation Solution) असे आहे. या निवड प्रक्रियेतून संघाला राष्ट्रीय स्तरावर आपली नाविन्यता सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे ‘इको कॅम्पस’ संघात…
जळगाव -खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित व्ही.पी. होले शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय (स्वायत्त) जळगाव येथे वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रा. अशोक राणे होते. सर्वप्रथम सामूहिक वंदे मातरम गीत गायन करण्यात आले, त्यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. राणे यांनी स्वातंत्र्य पूर्व काळात वंदेमातरम गीताचे योगदान तसेच वंदे मातरम गीताचा अर्थ विद्यार्थ्यांना सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी प्रा.आकाश बिवाल यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
जळगाव, दिनांक 7 नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ चे आयोजन रविवार, २३ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात येणार आहे. या परीक्षेच्या आयोजनाची कार्यवाही सुरू असून, परीक्षेसंबंधित सर्व अधिकृत माहिती वेळोवेळी परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी सांगितले आहे. तसेच, परीक्षेबाबत युट्युब चॅनेल्स, सोशल मीडियावरील विविध पोस्ट्स किंवा प्रसारमाध्यमांद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, अशी माहिती परिषदेकडून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळे www.mscepune.in आणि http://mahatet.in यांच्यावर प्रकाशित सूचनांचा आधार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अफवांवर विश्वास…
वंदे मातरम् केवळ एक गीत नसून तो असंख्य भारतीयांचा वेदमंत्र आहे. स्वातंत्र्यलढ्यात अनेक देशभक्तांना प्रेरणा देण्याचे, जाज्वल्य राष्ट्रभक्ती जागविण्याचे काम वंदे मातरम ने केले आणि आजही वंदे मातरम तितकेच प्रासंगिक आहे असे प्रतिपादन एकलव्य विद्यालयाचे शिक्षक संतोष पाटील यांनी केले. वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज एकलव्य विद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर होत्या. आपल्या संबोधनात संतोष पाटील यांनी वंदे मातरम या गीताचा इतिहास सांगितला. ते म्हणाले की कोणत्याही आंदोलनात एखादी विशिष्ट घोषणा, एखादे विशेष…
जळगाव – के. सी ई. सोसायटीच्या पी. जी. महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ ह्या राष्ट्रीय गीतास १५० वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने ७/११/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता ‘वंदे मातरम्’ या गीताचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. के. बी. महाजन यांनी वंदे मातरम् या देशभक्तीपर गीताचा इतिहास आणि महत्त्व याबद्दल उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी नमूद केले की हे गीत इतके प्रभावी आहे की ते आपल्या मध्ये राष्ट्रीय भावना निर्माण करून आत्मसन्मानाची व स्वाभिमानाची भावना जागृत करते. या कार्यक्रमा प्रसंगी प्रा. व्ही. एस. झोपे, प्रा. एस. एन. पाटील, प्रा. डॉ. एस. आर. चौधरी, श्री. यु. एस. पाटील, प्रा. रूपाली खंबायत, प्रा. शालिनी झोपे,…
जळगाव – एम. जे. कॉलेजच्या सोहम योग विभागाचा उपक्रम जळगाव -१४ नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिनानिमित्त सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, एम.जे. कॉलेज, जळगाव आणि धात्री आयुर्वेद व पंचकर्म यांच्या संयुक्त विद्यमाने “योगाद्वारे मधुमेहावर नियंत्रण” या विषयावर विशेष निःशुल्क कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा १४ ते ३१ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दररोज सायंकाळी ४ ते ५ या वेळेत सोहम् योग विभाग, आनंदयात्री योग हॉल, मनभावन संकुल, तिसरा मजला, एम.जे. कॉलेज, जळगाव येथे होणार आहे. या कार्यशाळेत मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त योगासने, प्राणायाम, मुद्रा, ध्यान तसेच आयुर्वेदिक मार्गदर्शन दिले जाणार आहे. कार्यशाळेत सहभागींसाठी शुगर तपासणी, बीपी तपासणी, कराडा स्कॅन या…
जळगाव – दि. ०७/११/२०२५ ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन अंतर्गत ‘चित्रपट माध्यमाच्या जगात’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना करिअरची विविध क्षेत्रे समजून घेण्यासाठी शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे होत्या. कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून चित्रपट दिग्दर्शक श्री. नितीन भास्कर, निर्माता श्री. प्रवीण वानखेडे आणि अभिनेत्री गीता निखरगे उपस्थित होते. तीनही पाहुण्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत चित्रपटसृष्टीतील संधी, कौशल्ये आणि वास्तव याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, चित्रपट माध्यम हे मेहनत, शिस्त, टीमवर्क आणि सर्जनशीलता यांच्या आधारावर उभे आहे. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती, लेखन, संपादन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी व्यापक करिअर संधी उपलब्ध आहेत.…
जळगाव – ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन – के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयांत ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले . राष्ट्रकवी बंकिमचंद्र चॅटर्जी ऐतिहासिक लिखित ‘वंदे मातरम’ या देशभक्तीपर गीताच्या रचनेला १५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ७ नोव्हे २०२५ शुक्रवार ला महाविद्यालयाच्या प्रांगणात सुमारे 1392 विद्यार्थ्यांनी सामूहिक गायन केले . या कार्यक्रमाचे प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी ,सर्व विभाग प्रमुख ,प्राध्यापक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते
के. सी ई. सोसायटीच्या पी. जी. महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ ह्या राष्ट्रीय गीतास १५० वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता ‘वंदे मातरम्’ या गीताचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. के. बी. महाजन यांनी वंदे मातरम् या देशभक्तीपर गीताचा इतिहास आणि महत्त्व याबद्दल उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी नमूद केले की हे गीत इतके प्रभावी आहे की ते आपल्या मध्ये राष्ट्रीय भावना निर्माण करून आत्मसन्मानाची व स्वाभिमानाची भावना जागृत करते. या कार्यक्रमा प्रसंगी प्रा. व्ही. एस. झोपे, प्रा. एस. एन. पाटील, प्रा. डॉ. एस. आर. चौधरी, श्री. यु. एस. पाटील, प्रा. रूपाली खंबायत, प्रा. शालिनी झोपे, प्रा.…
जळगाव – दि. ०७/११/२०२५ ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन अंतर्गत ‘चित्रपट माध्यमाच्या जगात’ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना करिअरची विविध क्षेत्रे समजून घेण्यासाठी शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे होत्या. कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून चित्रपट दिग्दर्शक श्री. नितीन भास्कर, निर्माता श्री. प्रवीण वानखेडे आणि अभिनेत्री गीता निखरगे उपस्थित होते. तीनही पाहुण्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत चित्रपटसृष्टीतील संधी, कौशल्ये आणि वास्तव याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, चित्रपट माध्यम हे मेहनत, शिस्त, टीमवर्क आणि सर्जनशीलता यांच्या आधारावर उभे आहे. अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती, लेखन, संपादन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी व्यापक करिअर संधी उपलब्ध आहेत.…
