Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team YuvaDisha
राष्ट्रीय सेवा योजना भारत सरकार यांच्या वतीने हरियाणा येथे कुरुक्षेत्र विद्यापीठांमध्ये दिनांक 11 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीमध्ये राष्ट्रीय एकात्मता शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मूळजी जेठा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका कु. जागृती गिरासे या विद्यार्थिने सक्रिय सहभाग नोंदविला. या शिबिरामध्ये महाराष्ट्र राज्याच्या वतीने सहा विद्यार्थी व एक संघ व्यवस्थापक यांची निवड करण्यात आली होती कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून सहा स्वयंसेवक शिबिरामध्ये सहभागी झाले होते व त्यांच्यासोबत संघ व्यवस्थापक म्हणून मूळजी जेठा महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विशाल देशमुख यांनी कार्य केले या शिबिरामध्ये भारतामधील 17 राज्यांचे प्रतिनिधित्व होते व विविध राज्यांमधून आलेल्या…
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांची प्रस्तावना; रामायण–महाभारत–उपनिषदांच्या शिकवणींवर आधारित पुस्तक आता भारतासह सहा देशांत उपलब्ध. जळगाव- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट एंड रिसर्च (आयएमआर)चे प्राध्यापक आणि जळगावचे लेखक पुनीत शर्मा लिखित ‘फ्रॉम डाऊट टू धर्म: फाइंडिंग स्टीलनेस अँड स्ट्रेंथ थ्रू द टीचिंग्ज ऑफ रामायण, महाभारत अँड उपनिषद’ हे पुस्तक नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘हे हाउस–पेंग्विन रँडम पब्लिकेशन्सने’ या पुस्तकाला जागतिक व्यासपीठ दिले असून, भारताबरोबरच अमेरिका, ब्रिटेन, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलमध्येही ते एकाचवेळी प्रकाशित आणि उपलब्ध झाले आहे. या पुस्तकाची प्रस्तावना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सीए पियूष गोयल यांनी लिहिली आहे. तसेच प्रख्यात…
जळगाव – के.सी.ई .सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालय, (स्वायत्त) जळगाव येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या मानव्यविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भूपेंद्र केसूर होते. सुरुवातीला संविधानाच्या प्रास्ताविकेला पुष्प अर्पण करण्यात आले, राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. जयेश पाडवी यांनी प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. यानंतर डॉ. राजीव पवार यांनी “संविधानातील मार्गदर्शक तत्वे आणि त्यांची प्रासंगिकता” यावर आपले मत व्यक्त केले. डॉ. भूपेंद्र केसूर यांनी अध्यक्षीय समारोप केला.कार्यक्रमाला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. विशाल देशमुख आणि महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित…
जळगाव-के.सी.ई .सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सर्वप्रथम संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर उपशिक्षक योगेश भालेराव यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनानिमित्त अनमोल असे मार्गदर्शन केले. शाळेने तयार केलेल्या सेल्फी पॉईंट वर विद्यार्थ्यांनी सुंदर असे सेल्फी काढले. कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक सूर्यकांत पाटील, भावना धांडे, चारूलता भारंबे यांनी केले तर यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक कसे शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
मध्य रेल्वेने मनमाड–इंदूर नवीन रेल्वे मार्ग (309.43 किमी) प्रकल्पात आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत हवाई भू-भौतिकीय सर्वेक्षणासाठी ई-टेंडर जाहीर केले आहे. या सर्वेक्षणामध्ये चुंबकीय इमेजिंग व व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे जमिनीची रचना सखोल तपासली जाणार आहे, ज्यामुळे पुढील बांधकाम प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा आहे. निविदा क्रमांक DYCE/CON/BSL/09/2025 दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून याचे अंदाजित मूल्य ₹77 लाखांहून अधिक आहे. तर बोली सुरक्षितता रक्कम ₹15.43 लाख निश्चित करण्यात आली आहे. कार्यकाळ सुमारे सहा महिने ठेवण्यात आला आहे. निविदा दस्तावेज रेल्वेच्या अधिकृत www.ireps.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. बोली सादर करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2025 सकाळी 11 वाजेपर्यंत असून…
जळगाव : जळगाव जिल्हा मजूर कामगार फेडरेशनच्या सभापती पदासाठी पुरुषोत्तम चौधरी तर उपसभापती पदासाठी सूर्यकांत वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीस सर्व संचालक मंडळाने एकमताने अनुमोदन व सहमती दर्शवली. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. पुरुषोत्तम चौधरी हे गेल्या वीस वर्षांपासून फेडरेशनमध्ये संचालक म्हणून कार्यरत असून त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून संचालकांनी एकमुखाने त्यांच्यावर सभापतीपदाची जबाबदारी सोपवली. निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक तथा अधिसी अधिकारी विशाल ठाकूर यांनी काम पाहिले. तसेच अजीत पाटील व जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जळगाव येथील वरिष्ठ लिपिक यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. नवीन…
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी जळगांव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे दि. २५ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. दिनांक २५ नोव्हेंबर ते ९ डिसेंबरच्या दरम्यान रोज संध्याकाळी ७ वाजता एकूण १५ नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण १५ संघांचा सहभाग असून यात दि. २५ नोव्हेंबरला भुसावळ थर्मल पॉवर स्टेशन दीपनगर यांचे दानव, दि.२६ नोव्हेंबरला इंदाई फाऊंडेशन…
सावळदबारा– यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव कोलते यांनी दिले सोयगाव तहसीलदार यांना निवेदन सावळदबारा प्रतिनिधी. सावळदबारा–देऊळगाव गुजरी या महत्त्वाच्या मार्गावर मोठमोठे खड्डे झाल्यामुळे नागरिक व वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने अपघातांची शक्यता वाढली आहेत. हा १० किलोमीटर या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या मार्गाचा वापर सावळदबारा, देव्हारी, नांदातांडा, घाणेगाव, मोलखेडा, टिटवी, पळसखेडा, महालब्धा, पिंपळवाडी, मूर्ती अशा अनेक गावांतील नागरिक दररोज कामानिमित्त ये- जा करतात. सावळदबारा येथे श्री चक्रधर स्वामी मंदिर असल्याने विविध राज्यांतून येणारे भाविक मोठ्या प्रमाणात याच मार्गाने प्रवास करतात. तसेच सावळदबारामध्ये ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक,…
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निवेदन सादर करण्यात आली जळगाव शहर मनपा निवडणूक 2026 मध्ये होऊन घातली असून मनपा प्रशासन गेल्या तीन महिन्यात पासून निवडणूक तयारी जोमाने करीत आहे. परंतु खेदाने म्हणावे लागत आहे की मोठ्या प्रमाणात प्रारुप प्रभाग रचना असो आरक्षण सोडत असो वा आता प्रमुख मतदार याद्या प्रकाशित करणे असो या सर्व प्रक्रियेत मनपा प्रशासनाचा गलथान कारभार दिसून येत आहे. दोन महिन्यांपूर्वी प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्या त्या प्रभाग रचनेवर अनेक नागरिकांनी व निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवल्या परंतु मनपा प्रशासनाने हरकती बाबत काहीही कारवाई केली नाही इतर मागासवर्ग आरक्षण काढण्याबाबत ही मनपा प्रशासन अपयशी ठरल्याने…
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व बोपखेल पुणे येथे झालेल्या पहिल्या 16 वर्षाखालील मुले व मुलींच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्याच्या संघाने अष्टपैलू कामगिरी केली त्यामध्ये मानस नितीन चौधरी व हर्षदा माळी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले व भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने व हरियाणा राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने आयोजित दिनांक 27 ते 30 नोव्हेंबर 2025 रोजी हरियाणा सोनीपत येथे होणाऱ्या 35 व्या सब ज्युनिअर नॅशनल कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील कु. मानस नितीन चौधरी (जळगाव), कु. हर्षदा सुभाष माळी (पहूर पाळधी) दोन खेळाडूंची निवड झालेली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे, चोपडा येथील आ.चंद्रकांत सोनवणे, नगरसेवक…
