Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता

October 17, 2026

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,जळगाव येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे बेमुदत धरणे आंदोलन.

October 16, 2026

पहूर येथे १७ ऑक्टोबरला आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

October 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Saturday, October 17
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»पहूर येथे १७ ऑक्टोबरला आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा
बातम्या

पहूर येथे १७ ऑक्टोबरला आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

Team YuvaDishaBy Team YuvaDishaOctober 16, 2026Updated:October 16, 2026No Comments27 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पहूर येथे १७ ऑक्टोबरला आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

आदिवासी विकासमंत्री डॉ.अशोक उईके विविध योजनांची माहिती, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आणि शिक्षकांना नियुक्तिपत्रांचे वाटप

जळगाव, दि.१6 : आदिवासी समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे आणि तडवी-भिल्ल समाजासह आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची माहिती आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जामनेर तालुक्यातील पहूर येथे भव्य आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा ‘माळी समाज मंगल कार्यालय येथे होणार आहे.

राज्याचे आदिवासी विकासमंत्री प्रा.डॉ.अशोक उईके मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी असतील. जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि पसमंदा मुस्लिम समाज अभ्यास समितीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) इद्रिस मुलतानी यांच्यासह जिल्ह्यातील खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त लीना बनसोड, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर आणि आदिवासी विकास विभागाचे नाशिक येथील अपर आयुक्त दिनकर पावरा हे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील.

मेळाव्यात आदिवासी विकास विभागासह अन्य शासकीय विभागांच्या वतीने विविध कल्याणकारी योजनांची माहिती देणारे स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहेत. शैक्षणिक, आर्थिक, गृहनिर्माण आणि स्वयंरोजगार योजनांचे निकष, आवश्यक कागदपत्रे तसेच ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेबाबत नागरिकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जाईल. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना योजनांची माहिती मिळविणे आणि लाभासाठी अर्ज करणे सुलभ होणार आहे.नाशिक विभागातील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या तीन विद्यार्थी आणि तीन विद्यार्थिनी अशा सहा गुणवंत विद्यार्थ्यांना ‘राघोजी भांगरे विद्यार्थी गुणगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे पारदर्शक पद्धतीने निवड झालेल्या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते अधिकृत सेवा नियुक्तिपत्रे वितरित करण्यात येणार आहेत.

तडवी-भिल्ल समाजासह आदिवासी समाजातील गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जामनेर, पहूर आणि परिसरातील आदिवासी समाजबांधव, महिला, युवक-युवती आणि पात्र लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योजनांची माहिती घ्यावी आणि उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता

October 17, 2026

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,जळगाव येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे बेमुदत धरणे आंदोलन.

October 16, 2026

पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ विकास विद्यालयात संपन्न

October 3, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,560

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026740

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026535

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025461
Don't Miss

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता

By Team YuvaDishaOctober 17, 20260

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता -आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके जळगाव, दि.१७…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,जळगाव येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे बेमुदत धरणे आंदोलन.

October 16, 2026

पहूर येथे १७ ऑक्टोबरला आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

October 16, 2026

पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ विकास विद्यालयात संपन्न

October 3, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.