Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team YuvaDisha
जळगाव, दिनांक 25 नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे उद्घाटन २६ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते तर समारोप २८ नोव्हेंबर २०२५रोजी होणार आहे. या स्पर्धांमध्ये प्रकल्पातील ३४ अनुदानित व १७ शासकीय अशा ५१ आश्रमशाळांमधून केंद्रस्तरीय निवडीनंतर एकूण १३९८ विद्यार्थी सहभागी होत आहेत. वैयक्तिक व सांघिक असे विविध क्रीडा प्रकार यात समाविष्ट आहेत. कार्यक्रमाला आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त श्रीमती लीना बनसोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल, उपआयुक्त दिनकर पावरा, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक आदी मान्यवरांची उपस्थिती…
*जिल्ह्यातील ग्रामपंचायतीना सहभागाचे आवाहन* जळगाव दि.२१(प्रतिनिधी): केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागतिक शौचालय दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष,स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) विभागामार्फत “हमारा शौचालय, हमारा भविष्य” ही विशेष मोहिम दि.19 पासून सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम मानवी हक्क दिनापर्यंत म्हणजे 10 डिसेंबर 2025 पर्यंत राबविण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. शौचालये ही केवळ सोयीची नव्हे तर आरोग्य, प्रतिष्ठा व सुरक्षिततेची हमी देणारी मूलभूत गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावातील वैयक्तिक शौचालये व सामुदायिक शौचालयांची तपासणी,…
जळगाव-क्रीडा युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक ,जिल्हा परिषद नाशिक, नाशिक कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय विभाग स्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन 12 नोव्हेंबर 2025 दरम्यान नाशिक येथे करण्यात आले होते यात खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या 19 वर्षाखालील शालेय विभागीय स्तरीय कराटे स्पर्धेमध्ये रोहित ब्राह्मणकर याने सुवर्ण पदक पटकविले शालेय राज्यस्तर कराटे स्पर्धेसाठी निवड झाली शालेय राज्यस्तर स्पर्धा बारामती 22 नोव्हेंबर 2025 दरम्यान होणार आहे मार्गदर्शन या खेळाडूंना क्रीडाशिक्षक डॉ. रणजीत पाटील , यांचे मार्गदर्शन लाभले. अभिनंदन विजेत्या खेळाडूचे संस्थाध्यक्ष प्रज्ञावंत आदरणीय श्री. नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ. एस.एन.भारंबे,उपप्राचार्य श्री. आर.बी.ठाकरे,…
जळगाव – के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्पुटर विभागातर्फे द्वितीय आणि तृतीय वर्ष विद्यार्थी यांचे करिता कोडिंग अँड डिझाईनिंग चे व्हर्चुअल लॅब द्वारे मार्गदर्शन करण्यात आले . हँड्स-ऑन सत्रात विद्यार्थ्यांनी स्वतः सर्किट तयार करणे, कोड लिहून त्याचे व्यवहार्य परिणाम पाहणे, लॉजिकचे डिबगिंग, तसेच विविध इलेक्ट्रॉनिक मॉड्युल्सचे ऑनलाइन मॉडेलिंग याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. प्रशिक्षकांनी उद्योगात वापरल्या जाणाऱ्या नवीनतम टूल्स व सॉफ्टवेअर्सची माहिती देत विद्यार्थ्यांना रिअल टाइम प्रॉब्लेम सॉलविंग कौशल्य विकसित करण्यावर भर दिला.प्रा रोहन परदेशी व प्रा गजानन पाखरे यांनी प्रशिक्षण दिले . या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांचे प्रोत्साहन व…
जळगाव – के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयांत इलेकट्रॉनिकस अँड कॉम्पुटर विभागातर्फे द्वितीय ते अंतिम वर्ष शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एम्बइडेड स्टार्ट अप वर व्याख्यानाचे आयोजन केले होते . एकरुक्सबॉट प्रा. ली कंपनीचे संस्थापक श्री हितेंद्र वाल्हे आणि श्री भाग्येश ताजणे यांनी विद्यार्थ्यांना एम्बेडेड तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व, आयओटी आधारित स्टार्टअप्सची संधी, आणि हार्डवेअर-सॉफ्टवेअर इंटिग्रेशनचे व्यवसायिक उपयोग याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. स्टार्टअप सुरू करताना येणाऱ्या प्रमुख अडचणी—जसे की प्रोटोटायपिंग खर्च, योग्य सेन्सर/मायक्रोकंट्रोलर निवड, फर्मवेअर डेव्हलपमेंट, आणि ग्राहकांच्या गरजेनुसार प्रॉडक्ट डिझाईन—यावरही प्रकाश टाकला. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांचे मार्गदर्शन लाभले . तसेच कार्यक्रमाचे समन्वयक प्रा स्नेहा…
जळगाव- के.सी.ई. सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव येथे आपल्या राष्ट्रगीत “वंदे मातरम्” च्या रचनेच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्ताने विविध विभागांमार्फत भव्य सांस्कृतिक आणि बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागविणे व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे हा होता. महाविद्यालयातील सर्व विभागांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. विभागनिहाय स्पर्धांचे आयोजन व समन्वय पुढीलप्रमाणे करण्यात आले: १. डेटा सायन्स विभाग – निबंध लेखन स्पर्धा समन्वयक: प्रा. निरंजन पाटील परिक्षक: डॉ. वीणा भोसले व डॉ. पी. डी. कुलकर्णी प्रथम क्रमांक: कांचन पाटील द्वितीय क्रमांक: मानसी निकम २. कॉम्प्युटर अभियांत्रिकी विभाग – वक्तृत्व स्पर्धा समन्वयक: प्रा. शीतल बोरोले…
जळगाव- स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी झाली. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर. बी. ठाकरे यांनी प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. उमेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. पल्लवी फिरके यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला संघटित करून त्यांच्या हक्कासाठी लढण्याची शक्ती दिली त्यांच्यामुळे आदिवासी समाजाला जागरूकता मिळाली बिरसा मुंडा यांचा स्वातंत्र्यलढ्यातही मोठा सहभाग होता.उलगुलान हा महान उठाव अबुवाराज आमचे शासन याबद्दल भगवान बिरसा मुंडा यांनी केलेले योगदान प्रा संदीप वानखेडे यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक…
जळगाव : १४ नोव्हेंबर – बालदिन २०२५ निमित्त रेडिओ मनभावन 90.8 एफएम तर्फे यंदा मुलांसाठी एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत संपूर्ण दिवस रेडिओचे संचालन, कार्यक्रमांचे नियोजन आणि सादरीकरणाची सूत्रे लहान मुलांना सोपविण्यात आली. बालदिनाच्या निमित्ताने रेडिओवरची धावपळ, ऊर्जा, उत्साह आणि निर्मिती लहानग्यांच्या आवाजातून अनुभवायला मिळाली. दिवसभराचे हे विशेष प्रसारण संभाळण्याची जबाबदारी ज्युनिअर आरजे स्वरा आणि ज्युनिअर आरजे विभूती यांनी उत्तमरित्या पार पाडली. दोन्ही आरजेनी विविध शो, मुलांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम, मनोरंजक संवाद, स्टोरी सेगमेंट्स, पझल्स, क्विझ तसेच चिल्ड्रन्स डे स्पेशल विषयांवर भरगच्च सादरीकरण केले. दोघींची बोलण्याची शैली, आत्मविश्वास आणि सहजता श्रोत्यांच्या विशेष लक्षात राहिली. ज्युनिअर आरजे…
जळगाव : बालदिनानिमित्त रेडिओ मन भावन 90.8 एफ.एम. तर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात ज्युनिअर आरजे स्वरा हिने जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रवींद्र नाईक यांची एक आगळीवेगळी आणि मनमोकळी मुलाखत घेतली. लहान मुलांनी रेडिओवरून प्रश्न विचारावेत, संवाद साधावा आणि त्यांच्या आवाजातून समाजात सकारात्मकता पोचावी, या हेतूने रेडिओ मनभावनने हा उपक्रम राबविला. या मुलाखतीदरम्यान स्टुडिओमध्ये अगदी खेळीमेळीचं, आनंदाचं आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. ज्युनिअर आरजे स्वराने आपल्या निरागस शैलीत क्रीडाविषयक प्रश्नांची सरबत्ती लावताच क्रीडा अधिकारी श्री. नाईक यांनीही अत्यंत मोकळेपणाने आणि प्रेरणादायी पद्धतीने उत्तरे दिली. मुलांमध्ये क्रीडा संस्कृती वाढावी, शारीरिक तंदुरुस्ती बळकट व्हावी आणि जळगाव जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना अधिकाधिक संधी उपलब्ध…
जळगाव -संविधान सन्मान संमेलन हे प्रत्येक घराघरात संविधानाचे महत्त्व मांडत जनमानसामध्ये जागृती निर्माण करण्यासोबतच संविधान आपल्यासाठी आहे अशा प्रकारची मनोकामना रुजविण्यासाठी प्रयत्नशील असून देशात हे संमेलन आयडॉल असेल असे मत मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांनी आढावा बैठकी प्रसंगी बोलताना व्यक्त केले बैठकीच्या सुरुवातीस डॉ. मिलिंद बागुल यांनी प्रास्ताविकेतून संमेलनाच्या नियोजनपूर्वक तयारीचा आढावा घेतला ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांनी स्मरणिका व अतिथी नियोजना संदर्भात माहिती मांडली, प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी संमेलनाचे यशस्वीतेसाठी वाड्यावस्तीपर्यंत प्रचार प्रसार कसा करता येईल यासंदर्भात नियोजन सर्वांसमोर मांडले, प्रा. किसन हिरोळे, जगदीश सपकाळे, एडवोकेट आकाश सपकाळे, गोकुळ पोहेकर, अनिल मेढे, विवेक सैंदाणे, पितांबर अहिरे, भारती रंधे,…
