Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

May 3, 2026

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी… आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Friday, June 5
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»आदिवासी विकास विभागाच्या भव्य विभागस्तरीय क्रीडा महोत्सवाची यशस्वी सांगता
बातम्या

आदिवासी विकास विभागाच्या भव्य विभागस्तरीय क्रीडा महोत्सवाची यशस्वी सांगता

Team YuvaDishaBy Team YuvaDishaDecember 19, 2025No Comments24 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव 

येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आदिवासी विकास विभाग नाशिकच्या भव्य विभागस्तरीय क्रीडा महोत्सवाची दि. १८ डिसेंबर रोजी यशस्वी सांगता झाली . कोणतेही गालबोट न लागता अतिशय निकोप वातावरणात हा तीन दिवसीय विभागस्तरीय क्रीडा महोत्सव पार पडला . बक्षिस वितरण व समारोपप्रसंगी आदिवासी विकास विभाग नाशिकचे अपर आयुक्त दिनकर पावरा , सह आयुक्त, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अरुण कुमार जाधव, सहायक आयुक्त, अपर आयुक्त कार्यालय, नाशिक निलेश भा. अहिरे , विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव, वसंत वळवी , नंदुरबार प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार , धुळे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील , कळवण प्रकल्प अधिकारी नवनाथ जानगर , सहायक प्रकल्प अधिकारी अनिल महाजन (नाशिक आयुक्तालय ) , नितीन भामरे ( तळोदा प्रकल्प ) , पवन सोनवणे ( धुळे प्रकल्प ) , नाशिक अपर आयुक्त कार्यालयातील सहायक प्रकल्प अधिकारी देवेंद्र पाटील , हर्षवर्धन नाईक , निंबा कापडणीस , सुनील नेरकर , सहायक प्रकल्प अधिकारी आर.एस. साबळे ( कळवण प्रकल्प ) , अंबादास बागुल ( राजूर प्रकल्प ) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते . समारोप समारंभाचे प्रास्ताविक यावल प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले तसेच अध्यक्षीय भाषणात अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक दिनकर पावरा यांनी प्रत्येक आश्रमशाळेत क्रीडा शिक्षक देण्याची घोषणा केली तसेच प्रत्येक शाळेला क्रीडांगण उपलब्ध करून देण्यात येईल असे घोषित करण्यात आले .


या तीन दिवसीय विभागस्तरीय क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी विकास विभाग नाशिकचे अपर आयुक्त दिनकर पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली यजमान असलेल्या यावल प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार , सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे , पवन पाटील , संदीप पाटील , जावेद तडवी , मिनाक्षी सुलताने , लेखाधिकारी दिपकांत वाघ , कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र मुसळे , एल. एम. पाटील , विश्वास गायकवाड , मिलिंद पाईकराव , विविध समित्यांचे प्रमुख व सदस्य , नाशिक विभागांतर्गत येणाऱ्या विविध प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग , आश्रमशाळांचे मुख्याध्यापक , क्रीडा शिक्षक , अधिक्षक , अधिक्षिका , गृहपाल , वर्ग चार कर्मचारी या सर्व घटकांनी परिश्रम घेतले .
या विभागस्तरीय क्रीडा महोत्सवात १४ वैयक्तिक क्रीडा प्रकार व ६ सांघिक क्रीडा प्रकारांत एकूण ३०४४ आदिवासी खेळाडू विद्यार्थ्यांसह ४७२ कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला . सर्वसाधारण विजेतेपद कळवण प्रकल्पाला तर सर्वसाधारण उपविजेतेपद धुळे प्रकल्पाला प्राप्त झाले . नाशिक विभागातील सात प्रकल्पांमध्ये स्पर्धेचा यजमान असलेल्या यावल प्रकल्पाने गुणांकनानुसार तृतीय क्रमांक पटकावला . शांतपणे प्रदर्शन केल्याबद्दल राजूर प्रकल्पाला देखील फेयर प्ले ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले . सांघिक स्पर्धेत मुलामुलींच्या १४ वर्षे , १७ वर्षे , १९ वर्षे अशा तिन्ही गटात विजयी व उपविजयी संघाला एकेक ट्रॉफी अशा एकूण ६८ ट्रॉफी तर वैयक्तिक स्पर्धेसाठी प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंसाठी एकेक मेडल असे एकूण १९२ मेडल पारितोषिक म्हणून मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले . या विभागीय क्रीडा महोत्सवाच्या तीनही दिवसाचे थेट प्रक्षेपण युटूबवर प्रसारीत करण्यात आले .
१४ वर्षे वयोगटाच्या मुलांच्या खो खो स्पर्धेत यावल प्रकल्प विजयी तर नंदुरबार प्रकल्प उपविजयी , कबड्डी स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर यावल प्रकल्प उपविजयी , हॉलीबॉल स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर यावल प्रकल्प उपविजयी , हॅण्डबॉल स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर नाशिक प्रकल्प उपविजयी , १४ वर्षे वयोगटाच्या मुलींच्या खो खो स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर नंदुरबार प्रकल्प उपविजयी , कबड्डी स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर तळोदा प्रकल्प उपविजयी , हॉलीबॉल स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर तळोदा प्रकल्प उपविजयी , हॅण्डबॉल स्पर्धेत नंदुरबार प्रकल्प विजयी तर कळवण प्रकल्प उपविजयी , १७ वर्षे वयोगटाच्या मुलांच्या खो खो स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर यावल प्रकल्प उपविजयी , कबड्डी स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर यावल प्रकल्प उपविजयी , हॉलीबॉल स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर यावल प्रकल्प उपविजयी , हॅण्डबॉल स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर नाशिक प्रकल्प उपविजयी , १७ वर्षे वयोगटाच्या मुलींच्या खो खो स्पर्धेत नंदुरबार प्रकल्प विजयी तर कळवण प्रकल्प उपविजयी , कबड्डी स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर कळवण प्रकल्प उपविजयी , हॉलीबॉल स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर कळवण प्रकल्प उपविजयी , हॅण्डबॉल स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर नाशिक प्रकल्प उपविजयी , १९ वर्षे वयोगटाच्या मुलांच्या खो खो स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर यावल प्रकल्प उपविजयी , कबड्डी स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर धुळे प्रकल्प उपविजयी , हॉलीबॉल स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर नंदुरबार प्रकल्प उपविजयी , हॅण्डबॉल स्पर्धेत धुळे प्रकल्प विजयी तर नंदुरबार प्रकल्प उपविजयी , १९ वर्षे वयोगटाच्या मुलींच्या खो खो स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर नंदुरबार प्रकल्प उपविजयी , कबड्डी स्पर्धेत नाशिक प्रकल्प विजयी तर कळवण प्रकल्प उपविजयी , हॉलीबॉल स्पर्धेत कळवण प्रकल्प विजयी तर धुळे प्रकल्प उपविजयी , हॅण्डबॉल स्पर्धेत नाशिकर प्रकल्प विजयी तर धुळे प्रकल्प उपविजयी ठरले .

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

May 3, 2026

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी… आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,538

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026735

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025458
Don't Miss

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

By Team YuvaDishaMay 3, 202655

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस…

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी… आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

April 16, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.