Author: Team YuvaDisha

दि. 11 ऑक्टोबर रोजी सकाळी सावळदेबारा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील यांच्या संपर्क कार्यालयात हंबरडा मोर्चाच्या तयारीसाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीस सावळदेबारा सर्कलमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत मोर्चाच्या आयोजन, नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून गुलाबराव पाटील, तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कन्हैयालाल शेवाळे यांनी केले. बैठकीस शेखर पाटील, सखाराम खोते, रमाप्रसाद पाटील, रमेश जाधव, ताराचंद जाधव, गजानन अंभोरे आदी उपस्थित होते

Read More

जळगाव (प्रतिनिधी) दि. २० – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागातर्फे आयोजित महाराजा सयाजीराव गायकवाड व्याख्यानमाले अंतर्गत “आर्थिक सजगता आणि सद्यस्थिती” या विषयावर जळगाव जनता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती यांच्या व्याख्यानाचे आयोजन दि. १९ सप्टेंबर रोजी विद्यापीठातील मुलांचे वसतीगृहातील सभागृहात आयोजन करण्यात आले. यावेळी मंचावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य ॲड. अमोल पाटील, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, अधिसभा सदस्य भानुदास येवलेकर, रेक्टर तथा अधिसभा सदस्य प्रा. विशाल पराते आदी उपस्थित होते. यावेळी श्री. नागमोती यांनी व्याख्यान देतांना सगितले म्हणाले की, आपले जीवन अर्थपूर्ण करायचे असेल, तर पैशाचा अभाव आणि आतिरीक्त पैशांचा प्रभाव नसावा. विशेषतः तरुणाईसाठी आर्थिक सजगता फार महत्वाची आहे. ‘बँकिंग क्षेत्रात गेल्या काही वर्षांत प्रचंड बदल झाले आहेत. यूपीआय, जनधन योजना, DBT यांसारख्या योजनांमुळे सर्वसामान्यांना…

Read More

क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 14 ते 19 वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय उर्वरित व मनपा शालेय धनुर्विद्या (आर्चरी) क्रीडा स्पर्धा 2025-26 या शनिवार, दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालय, सावखेडा येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील 17 संघांतील 100 खेळाडूंनी (53 मुले व 47 मुली) सहभाग नोंदवला. त्यामध्ये उर्वरित गटात 12 संघ (22 मुले व 26 मुली) तर मनपा गटात 5 संघ (31 मुले व 21 मुली) यांचा समावेश होता.उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिव व शालेय समिती अध्यक्ष मा. श्री. विनोदजी पाटील सर , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर पाटील सर  आणि सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी मा. श्री. विशाल बोडके  व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीमातेची पूजा करून तसेच श्रीफळ वाहून आणि प्रातिनिधिक स्वरुपात धनुर्विद्येचे प्रात्यक्षिक…

Read More