Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team YuvaDisha
जळगाव – मू . जे.(स्वायत्त ) महाविद्यालय, जळगाव येथील रसायनशास्त्र विभागाद्वारे सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालय, बोरेखेडा – वंजारी खापट, ता. धरणगाव, जिल्हा जळगाव येथील इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञानविषयक संवादात्मक उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचे मार्गदर्शन रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. योगेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये अणूची रचना, आम्ले, क्षार व मीठ तसेच त्यांचे दैनंदिन जीवनातील उपयोग या विषयांवर सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. उदाहरणांमुळे विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले व चर्चेमध्ये सक्रिय सहभाग घेतला. या विज्ञान उपक्रमाचे प्रत्यक्ष मार्गदर्शन रसायनशास्त्र विभागातील डॉ. जयश्री भिरुड, डॉ. मनोज पांडे, डॉ. वसीम…
जळगाव : खान्देश कॉलेज एजुकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्वायत्त महाविद्यालयास् प्रतिष्ठित रायसोनी करंडक स्पर्धेच्या प्रथम तालीम फेरीत उल्लेखनीय यश संपादन करत तृतीय क्रमांक पटकावला आहे. व 1 ते 4 फेब्रुवारी नागपूर येथे होणाऱ्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकांकिका सादरीकरणात उत्कृष्ट अभिनय व सादरीकरण करत परीक्षकांची दाद मिळवली. या एकांकिकेचे दिग्दर्शन प्रा. यश चौधरी यांनी केले. स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा. यश चौधरी व प्रा. रेवती पाटील यांनी प्रभावी नियोजन व मार्गदर्शन केले. या यशाबद्दल के सी ई संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रज्ञावंत श्री नंदकुमार बेंडाळे ,उपाध्यक्ष ,कोषाध्यक्ष ,संचालक, सदस्य मंडळ व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी…
जळगाव -खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयाच्या भूगोल विभागातर्फे नुकतीच हैदराबाद येथे तीन दिवशीय शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी अंतराळ तंत्रज्ञान, ऐतिहासिक वारसा आणि भौगोलिक रचनांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यामध्ये प्रामुख्याने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) च्या ‘नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर’ (NRSC, Outreach Facility) या ठिकाणच्या भेटीने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोठी भर घातली. या सहलीचे मुख्य आकर्षण असलेल्या NRSC outreach facility केंद्र येथे विद्यार्थ्यांना उपग्रह तंत्रज्ञान आणि रिमोट सेन्सिंगच्या (सुदूर संवेदन) कार्यपद्धतीची सविस्तर माहिती देण्यात आली. सॅटेलाइट डेटा: उपग्रहाद्वारे पृथ्वीचे फोटो कसे घेतले जातात आणि त्या माहितीचा वापर शेती, पाणी व्यवस्थापन व नैसर्गिक आपत्तींच्या नियोजनासाठी…
नवापूर (हेमंत विक्रम पाटील): नवापूर तालुक्यात बेकायदेशीरपणे तत्सम लाकूड वाहतूक करणाऱ्यांविरोधात नवापूर पोलिसांनी धडक कारवाई करत आयशर वाहनासह सुमारे ४ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई जामतलाव गावाच्या मुख्य रस्त्यावर दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. नवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नियमित गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशयास्पद अवस्थेत एक आयशर वाहन दिसून आले. वाहन क्रमांक MH-05-K-9816 थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तत्सम लाकूड भरलेले आढळून आले. यावेळी वाहनचालकाकडे लाकूड वाहतुकीसाठी आवश्यक असलेले अधिकृत परवाने व वैध कागदपत्रांची मागणी करण्यात आली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरे देत कोणतीही समाधानकारक माहिती सादर केली नाही. पोलिसांनी तत्काळ कारवाई…
नवापूर[हेमंत विक्रम पाटील] द्यार्थ्यांनो मोबाईलपासून दूर राहा, मैदानाशी नातं जोडा” — गटशिक्षणाधिकारी रमेश देसले यांच्या विद्यार्थ्यांना मौलिक संदेश येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा महोत्सव २०२५–२६ ला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन नवापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रमेश आर. देसले यांच्या हस्ते क्रीडा साहित्य व मैदानाचे पूजन करून करण्यात आले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कमल कोकणी, उपमुख्याध्यापक ए. एन. सोनवणे, पर्यवेक्षक हरीश पाटील, पर्यवेक्षक जी. डी. सूर्यवंशी, पालक प्रतिनिधी सरला साळुंखे तसेच शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर गटशिक्षणाधिकारी रमेश देसले यांनी फलंदाजी तर पर्यवेक्षक हरीश पाटील यांनी गोलंदाजी करून क्रीडा महोत्सवाची औपचारिक सुरुवात केली.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रमेश…
जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आदिवासी विकास विभाग नाशिकच्या भव्य विभागस्तरीय क्रीडा महोत्सवाची दि. १८ डिसेंबर रोजी यशस्वी सांगता झाली . कोणतेही गालबोट न लागता अतिशय निकोप वातावरणात हा तीन दिवसीय विभागस्तरीय क्रीडा महोत्सव पार पडला . बक्षिस वितरण व समारोपप्रसंगी आदिवासी विकास विभाग नाशिकचे अपर आयुक्त दिनकर पावरा , सह आयुक्त, जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अरुण कुमार जाधव, सहायक आयुक्त, अपर आयुक्त कार्यालय, नाशिक निलेश भा. अहिरे , विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव, वसंत वळवी , नंदुरबार प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार , धुळे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील , कळवण प्रकल्प अधिकारी नवनाथ जानगर…
एकलव्य विद्यालय नंदुरबार येथे 17/12/2025, बुधवार रोजी शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये विविध वैज्ञानिक संकल्पनांचे उपयोजन व समस्या निराकरणाचे गुण वृद्धिंगत करणे हे विज्ञान प्रदर्शनाचे उद्दिष्ट असते. आयोजित विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक व माध्यमिक गटातून एकुण 85 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री सुनील केशव चौधरी यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले तसेच विद्यार्थ्यांच्या उपकरणांची पाहणी देखील केली. विद्यालयातील विज्ञान शिक्षक मिलिंद वडनगरे, योगेश पाटील ,किरण रघुवंशी व जयश्री खैरनार यांनी प्रदर्शनाचे परीक्षण केले . विज्ञान प्रदर्शन प्रसंगी सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होते. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपकरण सादर केले यात घरातील लहान समस्यांपासून ते पर्यावरण प्रदूषण,…
आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या रेसिडेन्शियल स्कूलचे गणित विषयाचे शिक्षक जयकुमार शर्मा यांची अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या फुलब्राईट टीचिंग एक्सलन्स अॅण्ड अचिव्हमेंट (Fulbright TEA) फेलोशिपसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे नंदुरबार जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा ठसा उमटला आहे. फुलब्राईट टीईए फेलोशिप कार्यक्रमाअंतर्गत जगभरातील ७५ देशांमधून १०० उत्कृष्ट शिक्षकांची निवड करण्यात येते. भारतातून निवड झालेल्या शिक्षकांमध्ये जयकुमार शर्मा यांचा समावेश असून, त्यांनी अत्यंत चुरशीच्या स्पर्धेतून ही संधी मिळवली आहे. या फेलोशिपच्या माध्यमातून ते दोन महिन्यांसाठी अमेरिकेत गणित विषयातील अध्यापन, शैक्षणिक संशोधन तसेच आधुनिक शिक्षण पद्धतींचे प्रशिक्षण घेणार आहेत. या फेलोशिपसाठी मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध…
नंदुरबार : आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या रेसिडेन्शियल स्कूलचे गणित विषयाचे शिक्षक जयकुमार शर्मा यांची अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या फुलब्राईट टीचिंग एक्सलन्स अॅण्ड अचिव्हमेंट (Fulbright TEA) फेलोशिपसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे नंदुरबार जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा ठसा उमटला आहे. फुलब्राईट टीईए फेलोशिप कार्यक्रमाअंतर्गत जगभरातील ७५ देशांमधून १०० उत्कृष्ट शिक्षकांची निवड करण्यात येते. भारतातून निवड झालेल्या शिक्षकांमध्ये जयकुमार शर्मा यांचा समावेश असून, त्यांनी अत्यंत चुरशीच्या स्पर्धेतून ही संधी मिळवली आहे. या फेलोशिपच्या माध्यमातून ते दोन महिन्यांसाठी अमेरिकेत गणित विषयातील अध्यापन, शैक्षणिक संशोधन तसेच आधुनिक शिक्षण पद्धतींचे प्रशिक्षण घेणार आहेत. या फेलोशिपसाठी मंत्रालयाच्या वतीने घेण्यात…
जळगाव – स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात सालाबादाप्रमाणे युवास्पंदन 2025 या स्नेहसंमेलनाची दिनांक 18 डिसेंबर व 19 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आलेले आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक 18 डिसेंबर रोजी झाले.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ मृणालिनी फडणवीस शैक्षणिक संचालिका केसीई सोसायटी जळगाव ,ह्या होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे शैक्षणिक व सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर होते. यावेळी उपप्राचार्य प्रा आर बी ठाकरे, महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा स्वाती बऱ्हाटे व समन्वयक प्रा उमेश पाटील, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा वर्षा पाटील व उपाध्यक्ष प्रा संदीप वानखेडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. सुरुवातीला सरस्वतीच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. उद्घाटन…
