
नंदुरबार | दि. ३ ऑगस्ट २०२६ :
भीम आर्मी भारत एकता मिशन, नंदुरबार जिल्हा यांच्या वतीने सोमवार (दि. ३ ऑगस्ट) रोजी एमएसईबी विभागीय कार्यालय, नेहरूनगर, नंदुरबार येथे स्मार्ट मीटरमुळे वाढलेल्या वीजबिलाच्या प्रश्नासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार शहर व जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे मीटर बसविल्यानंतर सर्वसामान्य नागरिक, गरीब, दलित व आदिवासी कुटुंबांच्या वीजबिलात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. पूर्वी दरमहा ₹५०० ते ₹१,००० इतके वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांना आता ₹५,००० ते ₹१०,००० पर्यंतची बिले येत असल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
भीम आर्मीने महावितरण प्रशासनाकडे या वाढीव वीजबिलांची तातडीने चौकशी करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. तसेच स्मार्ट मीटरमुळे निर्माण झालेल्या तांत्रिक व बिलिंगच्या त्रुटी दूर करून अन्यायकारक वीजबिले रद्द अथवा दुरुस्त करावीत, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यासंदर्भात प्रशासनाने पुढील पाच दिवसांत सकारात्मक निर्णय न घेतल्यास, भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने नंदुरबार येथील एमएसईबी विभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
