Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता

October 17, 2026

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,जळगाव येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे बेमुदत धरणे आंदोलन.

October 16, 2026

पहूर येथे १७ ऑक्टोबरला आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

October 16, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Monday, October 19
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी; नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करुन मदत उपलब्ध करुन देण्याचे निर्देश
बातम्या

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी; नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करुन मदत उपलब्ध करुन देण्याचे निर्देश

Team YuvaDishaBy Team YuvaDishaAugust 3, 2026No Comments3 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील,
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली पाहणी;
नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करुन मदत उपलब्ध करुन देण्याचे निर्देश

जळगाव, दिनांक 3 ऑगस्ट (जिमाका) : अमळनेर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये घरे, रस्ते तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी अमळनेर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्हा व स्थानिक प्रशासनाला तातडीने मदतकार्य पूर्ण करण्याच्या तसेच सर्व नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याच्या सूचना दिल्या.

या पाहणी दरम्यान घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झालेल्या कुटुंबीयांना शासनाकडून नियमानुसार आर्थिक मदत तात्काळ देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीतून तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा, असे मंत्री श्री.महाजन यांनी सांगीतले.

पालकमंत्री व जलसंपदा मंत्री यांनी विविध नुकसानग्रस्त वस्त्यांमध्ये जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. विविध प्रकारचे नुकसान झालेल्या कुटुंबियांनी घरे, संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य तसेच अन्य मालमत्तेचे झालेल्या नुकसानीबाबत समस्या पालकमंत्री व जलसंपदा मंत्री यांच्यासमोर मांडल्या, त्यावर प्रशासनाने कोणताही विलंब न लावता मदत व पुनर्वसनाची प्रक्रिया राबवावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

यावेळी प्रशासनाला शेती, घरे, रस्ते, सार्वजनिक सुविधा व अन्य मालमत्तेच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. बाधित नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत वेळेत मिळेल, अशी ग्वाहीही मंत्री श्री.महाजन यांनी दिली.

या पाहणीवेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष परीक्षित बाविस्कर, उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, नगरपालिका मुख्याधिकारी गणेश शिंदे,अशोक पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पूरग्रस्त नागरिकांना तातडीची आर्थिक मदत व शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी निधी आणि पंचनाम्यांचे आदेश यामुळे मदतकार्याला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.
****

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता

October 17, 2026

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,जळगाव येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे बेमुदत धरणे आंदोलन.

October 16, 2026

पहूर येथे १७ ऑक्टोबरला आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

October 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,562

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026740

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026536

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025461
Don't Miss

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता

By Team YuvaDishaOctober 17, 202617

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता -आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके जळगाव, दि.१७…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,जळगाव येथे राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे बेमुदत धरणे आंदोलन.

October 16, 2026

पहूर येथे १७ ऑक्टोबरला आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा

October 16, 2026

पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ विकास विद्यालयात संपन्न

October 3, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.