Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team YuvaDisha
जळगाव : १४ नोव्हेंबर – बालदिन २०२५ निमित्त रेडिओ मनभावन 90.8 एफएम तर्फे यंदा मुलांसाठी एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत संपूर्ण दिवस रेडिओचे संचालन, कार्यक्रमांचे नियोजन आणि सादरीकरणाची सूत्रे लहान मुलांना सोपविण्यात आली. बालदिनाच्या निमित्ताने रेडिओवरची धावपळ, ऊर्जा, उत्साह आणि निर्मिती लहानग्यांच्या आवाजातून अनुभवायला मिळाली. दिवसभराचे हे विशेष प्रसारण संभाळण्याची जबाबदारी ज्युनिअर आरजे स्वरा आणि ज्युनिअर आरजे विभूती यांनी उत्तमरित्या पार पाडली. दोन्ही आरजेनी विविध शो, मुलांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम, मनोरंजक संवाद, स्टोरी सेगमेंट्स, पझल्स, क्विझ तसेच चिल्ड्रन्स डे स्पेशल विषयांवर भरगच्च सादरीकरण केले. दोघींची बोलण्याची शैली, आत्मविश्वास आणि सहजता श्रोत्यांच्या विशेष लक्षात राहिली. ज्युनिअर आरजे…
जळगाव : बालदिनानिमित्त रेडिओ मन भावन 90.8 एफ.एम. तर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात ज्युनिअर आरजे स्वरा हिने जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रवींद्र नाईक यांची एक आगळीवेगळी आणि मनमोकळी मुलाखत घेतली. लहान मुलांनी रेडिओवरून प्रश्न विचारावेत, संवाद साधावा आणि त्यांच्या आवाजातून समाजात सकारात्मकता पोचावी, या हेतूने रेडिओ मनभावनने हा उपक्रम राबविला. या मुलाखतीदरम्यान स्टुडिओमध्ये अगदी खेळीमेळीचं, आनंदाचं आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. ज्युनिअर आरजे स्वराने आपल्या निरागस शैलीत क्रीडाविषयक प्रश्नांची सरबत्ती लावताच क्रीडा अधिकारी श्री. नाईक यांनीही अत्यंत मोकळेपणाने आणि प्रेरणादायी पद्धतीने उत्तरे दिली. मुलांमध्ये क्रीडा संस्कृती वाढावी, शारीरिक तंदुरुस्ती बळकट व्हावी आणि जळगाव जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना अधिकाधिक संधी उपलब्ध…
जळगाव -संविधान सन्मान संमेलन हे प्रत्येक घराघरात संविधानाचे महत्त्व मांडत जनमानसामध्ये जागृती निर्माण करण्यासोबतच संविधान आपल्यासाठी आहे अशा प्रकारची मनोकामना रुजविण्यासाठी प्रयत्नशील असून देशात हे संमेलन आयडॉल असेल असे मत मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांनी आढावा बैठकी प्रसंगी बोलताना व्यक्त केले बैठकीच्या सुरुवातीस डॉ. मिलिंद बागुल यांनी प्रास्ताविकेतून संमेलनाच्या नियोजनपूर्वक तयारीचा आढावा घेतला ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांनी स्मरणिका व अतिथी नियोजना संदर्भात माहिती मांडली, प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी संमेलनाचे यशस्वीतेसाठी वाड्यावस्तीपर्यंत प्रचार प्रसार कसा करता येईल यासंदर्भात नियोजन सर्वांसमोर मांडले, प्रा. किसन हिरोळे, जगदीश सपकाळे, एडवोकेट आकाश सपकाळे, गोकुळ पोहेकर, अनिल मेढे, विवेक सैंदाणे, पितांबर अहिरे, भारती रंधे,…
धुळे : धुळे शहरातील नाभिक समाजाची सर्वांगीण प्रगती आणि शैक्षणिक क्षेत्रातील वाढता सहभाग पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. शहरातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व व नामांकित बिल्डर ‘अरुण बंगलोज, धुळे’चे संस्थापक श्री. जितेंद्र काशिनाथ बोरसे यांच्या कन्या कुमारी शिवानी बोरसे हिने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, लोणी येथून डॉक्टर पदवी प्राप्त केली आहे. प्रवरामध्ये आयोजित भव्य ‘दीक्षांत समारंभा’त प्रवरा मेडिकल कॉलेजचे संचालक मा. राजेंद्र विखे पाटील यांच्या शुभहस्ते शिवानी बोरसे हिला अधिकृतरीत्या डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आली. विशेष खास टोपी व गाऊन परिधान करून मंचावर उभारलेल्या शिवानीने हा आपल्या आयुष्यातील ‘स्वप्नपूर्तीचा क्षण’ कुटुंबासह अनुभवला. तिच्या हातात पदवी…
आगामी पाचोरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) तर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची जोरदार हालचाल सुरू झाली आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह विविध प्रभागांतील उमेदवारांनी नियोजनबद्ध तयारीला सुरूवात केली असून पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक यांच्यात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी, शनिवार सकाळी ९ वाजता धम्मदय बौध्दविहारातून प्रस्थान करून उमेदवारांचा भव्य रॅलीसह अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या रॅलीत शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी तसेच समाजातील सर्व स्तरातील मित्र परीवार मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेतर्फे प्रभाग क्रमांक ७ “अ” मधून नगरसेवक पदासाठी सौ. वर्षा प्रविण ब्राह्मणे…
*बालरंगभूमी परिषद जळगावतर्फे दि. २८ व २९ नोव्हेंबर रोजी आयोजन* जळगाव (प्रतिनिधी) : राज्यातील बालकांपर्यंत मराठी संस्कृतीची व परंपरांची महती पोहचावी. त्यांनी लोककलांचा अभ्यास करुन ही परंपरा पुढे जोपासावी या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेतर्फे दरवर्षी ‘जल्लोष लोककलेचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा शहरात दि. २८ व २९ नोव्हेंबर रोजी बालरंगभूमी परिषद जळगाव शाखेतर्फे या महोत्सवाचे ला.ना. सार्वजनिक विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील बालकलावंतांच्या सर्वांगिण कलात्मक विकासासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या बालरंगभूमी परिषदेतर्फे महाराष्ट्राची कला व परंपरा जपतांना बालमनावर संस्कार करण्याच्या अनुषंगाने ‘जल्लोष लोककलेचा’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लोककलांचा प्रगल्भ वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात लोककलांना उर्जितावस्था…
भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशान्वये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी व जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी डॉ समिधा नटावदकर यांची भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. डॉ समिधा यांनी रेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यात अनेक लोकोपयोगी कामे सुरू केलेली आहेत. ज्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे, गरजू रुग्णांना मदत करणे, गरज असलेल्या ठिकाणी अन्नधान्य, वस्त्र वाटप यासारखे अनेक कार्यक्रम घेण्यात येतात. राजकीय क्षेत्रात युवकांमध्ये त्यांची लोकप्रियता मोठी आहे. आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचा वापर करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या स्वप्नातला बलशाली भारत घडविण्याचा, संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत…
दोंडाईचा वि. प्र.* हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती पब्लिक स्कूल व ज्यू. कॉलेज व हस्ती वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विभागस्तरीय तलवारबाजी ( फेन्सिंग ) स्पर्धेत दमदार कामगिरी करत घवघवीत यश मिळवत राज्य स्तरावर प्रवेश मिळविला. जळगाव जिल्हा क्रीडा विभागामार्फत पार पडलेल्या विभागस्तरीय तलवारबाजी स्पर्धा सेंट अलायन्स हायस्कूल यावल रोड भुसावळ येथील क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली होती.स्पर्धेचे उद्घाटन मिनल थोरात जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी राजू शिंदे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते तसेच कैलास कंखरे सचिव धुळे जिल्हा तलवारबाजी संघटना आदी मान्यवर उपस्थित होते. या ठिकाणी शालेय स्तरावरील १४, १७,१८ वर्ष वयोगटात हस्ती स्कूलचे मुले व मुली सहभागी झाले होते.…
भडगाव, दि. 13 नोव्हेंबर 2025 भडगाव पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या तीन अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणात भडगाव पोलिसांनी फक्त काही तासांत कौतुकास्पद कामगिरी करत तिन्ही मुलींचा सुरक्षित शोध लावण्यात मोठे यश मिळवले. या घटनेमुळे परिसरात निर्माण झालेली भीती व संभ्रमाची स्थिती दूर झाली आहे. प्रकरणाचा तपशील दि. 20/10/2025 रोजी दुपारी गावातील तीन अल्पवयीन मुली अचानक घरातून बेपत्ता झाल्याची माहिती पालकांकडून व स्थानिक नागरिकांकडून भडगाव पोलिसांना मिळाली. मुलींचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले होते. प्राथमिक माहितीनुसार, सदर मुली जवळच्या रेल्वे स्टेशनकडे गेल्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यानुसार भडगाव पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. रेल्वे स्टेशनवर तपास — सीसीटीव्हीतून महत्वपूर्ण धागेदोरे…
जळगाव : जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपने बऱ्याच ठिकाणी मित्र पक्षांना फार महत्व दिलेले नाही. अपवादात्मक ठिकाणी युती केली असली, तरी त्यातूनही स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. अशा स्थितीत, भाजपला थेट आव्हान देऊन सर्वात आधी स्वबळाचा नारा देणारे आमदार किशोर पाटील यांना शिवसेनेने (एकनाथ शिंदे) आता मोठी जबाबदारी सोपवली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुतीच्या माध्यमातून एकत्र लढल्यानंतर भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील संवाद आणि समन्वय चांगला दिसून येत होता. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा रणसंग्राम जवळ येताच तिन्ही पक्षांमधील मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत. विशेषतः भाजपने बऱ्याच ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढण्याची आणि…
