Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team YuvaDisha
जळगांव : रा.प. जळगांव मध्यवर्ती बसस्थानकाच्या इन व आऊट गेटच्या बाजूला खाद्यपदार्थ / चहा / ज्युस इत्यादी विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेले असल्याने मध्यवर्ती बसस्थानकातून बाहेरगावी जाणाऱ्या बसेस तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या बसेस बसस्थानकाच्या आत-बाहेर येण्या-जाण्यास मोठी अडचण निर्माण झालेली आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी मोठ्या प्रमाणात संतप्त झालेले होते. एसटी महामंडळातील संयुक्त कृती समितीने आज शनिवारी दुपारी 1:30 वाजता जळगाव महानगरपालिकेच्या विरोधात तीव्र निदर्शने केली. याप्रसंगी काही काळ समोरील रस्त्यावरील वाहतूक बंद होती. ‘जळगांव मनपा- हाय हाय, मनपा जळगांव- जागे व्हा जागे व्हा, अशा विविध घोषणा देऊन जळगाव मनपाच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. तत्पूर्वी जळगांव मनपाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट…
जळगाव – मृदेचे (मातीचे) महत्त्व आणि तिचे संवर्धन याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी (केसीई सोसायटी) आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे अधिकारी आणि शास्त्रज्ञ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.त्यांच्या हस्ते मृदा आणि पाणी तपासणी कोर्स पूर्ण केलेल्या रसायनशास्त्र विषयाच्या विद्यर्थ्याना सन्मानित करण्यात येईल.यावेळी श्री. कुरबान एम. तडवी (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी) ,श्री. अभिनव के. माळी (जिल्हा मृदा तपासणी आणि मृदा सर्वेक्षण अधिकारी) ,डॉ. हेमंत बाहेती ( मुख्य शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र) उपस्थित…
नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे आयोजित प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा संकुल येथे उत्साहात पार पडले. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत नंदुरबार, शहादा आणि नवापूर या तीन तालुक्यांतील तब्बल १ हजार ४६२ खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नम्र गोयल होते. प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार, तालुका क्रीडाधिकारी महेश पाटील, प्रमुख पाहुणे अनिल वसावे, दिलीप गावित आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. पवार म्हणाले की, प्रकल्पातील आदिवासी भागातील खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य मार्गदर्शन मिळाल्यास हे खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्याचे व देशाचे नाव उज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी…
बदरखे, ता. पाचोरा (जि. जळगाव) : पेमा महाराजांच्या कृपाशिर्वादाने बदरखे ग्रामस्थांच्या वतीने ३ व ४ डिसेंबर २०२५ रोजी वार्षिक यात्रेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त धार्मिक विधी, नवसपूर्ती कार्यक्रम तसेच खेळ व सांस्कृतिक उपक्रमांची विविधता अनुभवायला मिळणार आहे. यात्रेचा मुख्य आकर्षण असलेली भव्य कुस्ती स्पर्धा दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी भरणार आहे. जिल्ह्यातील तसेच बाहेरील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार असून विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील पारंपारिक कुस्ती संस्कृती जपण्यासाठी गावातील समाज मंडळे, युवक आणि ग्रामस्थांकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात यात्रेनिमित्त नवसपूर्ती विधी, पूजा-अर्चा, भजने आणि भक्तीमय कीर्तन यांचे आयोजन…
के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल विभागाची औद्योगिक अभ्यास भेट
जळगाव -केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल विभागाची इंडस्ट्रियल व्हिझिट चे आयोजन करण्यात आले होते . इलेक्ट्रिकल विभागातील जवळपास ३८ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती नाशिक इथे फॉर्चुना इंजिनिअरिंग प्रा ली .या कंपनीला भेट दिली कि त्या कंपनी मध्ये सर्व इंजिनचे पार्ट ,तसेच उत्पादन आणि ऑटोमेशन या बद्दल माहिती मिळाली . पारंपारिक कनेक्टिंग रॉड डिझाइनला फ्रॅक्चर-स्प्लिट डिझाइनमध्ये रूपांतरित करण्यासाठी पर्यायी डिझाइन सुचवण्याची क्षमता असते . कॉनरॉड्स मध्यम कार्बन स्टील आणि सी-७० स्टील फोर्जिंगपासून बनवले जातात.रॉड्सच्या निर्मितीमध्ये अॅल्युमिनियम कास्टिंग देखील वापरले जातात. कॉनरॉड्स सेरेटेड, ग्रूव्ह आणि टेनॉन जॉइंट्स किंवा बोल्ट आणि नट डिझाइनमध्ये येतात. मुख्य कौशल्य फ्रॅक्चर्ड कॉनरॉड्सच्या निर्मितीमध्ये आहे.उच्च कार्यक्षमता असलेल्या…
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे संविधान दिनाचेऔचित्य साधून अत्यंत माहितीपूर्ण कार्यक्रम सादर करण्यात आला. उप प्राचार्य श्री आर बी ठाकरे सर यांनी उद्देशिकेचे वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. संविधान म्हणजे काय, संविधानाचे महत्त्व काय, आपल्या भारत देशाचे संविधान जगातील सर्व देशाच्या संविधानांपेक्षा किती वेगळे व महत्त्वपूर्ण आहे हे समजावून सांगण्यात आले. संविधान निर्मिती करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांचे अतुलनीय कार्य अधोरेखित करण्यात आले. बाबासाहेब संविधानाच्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते. भारतीय नागरिक म्हणून आपले अधिकार, कर्तव्य व देशाप्रती प्रत्येक नागरिकाचे असलेले कर्तुत्व समजून घेण्यात आले. तसेच बारावीची विद्यार्थिनी संजना इंगळे हिने आपल्या भाषणात संविधानातील महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख करत अतिशय प्रभावीपणे…
जळगाव – क्रीडा युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव ,जिल्हा परिषद जळगाव, जळगाव जिल्हा हौशी स्क्वॉश असोसिएशन , स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय विभाग स्तरीय स्क्वॉश स्पर्धेचे आयोजन दिनांक 24 ते 26 नोव्हेंबर 2025 एकलव्य क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते उद्घाटन प्रा डॉ श्रीकृष्ण बेलोरकर सचिव जळगाव जिल्हा हौशीस्क्वॉश असोसिएशन जळगाव यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले निकाल 14 वर्षातील मुले 1-प्रथम सिद्धार्थ शर्मा जळगाव 2-द्वितीय आयुष पाटील जळगाव 3-तिसराआरुष हिवरकर जळगाव 4-चौथा पार्थ विसपुते जळगाव 5-पाचवा अर्णव दांडगे जळगाव 14 वर्षातील मुली 1-प्रथम दिश हिरे नाशिक 2-द्वितीय वरुणिका बोडके जळगाव…
jalgaon-के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयात संविधान गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांचे हस्ते कार्यक्रमाचे सुरुवातीला भारतीय संविधानाचे शिल्पकार व घटनाकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले . त्यांनी संविधान हे भारताच्या लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत विद्यार्थ्यांनी संविधानाचा अभ्यास केला पाहिजे आपले कर्तव्य ,हक्क, अधिकार या विषयीची माहिती यात मिळते असे सांगितले . तसेच उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी मुंबई इथे २६/११ ला दहशतवादी हल्ल्यातील शहिद झालेल्या वीर जवानांना व निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व सर्व उपस्थितांकडून संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात…
जळगाव- के.सी.ई.सोसायटी संचलित व्ही.पी.होले शिक्षणशास्त्र आणि शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम सपन्न. जळगाव : के.सी.ई.सो सं व्ही.पी.होले शिक्षणशास्त्र आणि शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव महाविद्यालयातर्फे महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.केतन चौधरी उपस्थित होते. प्रथम वर्ष विद्यार्थी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.संभाजी जमधडे यांनी विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यामध्ये महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली व मुलींसाठी शिक्षणाची कवाड उघडून कशाप्रकारे स्त्री शिक्षणाची मुहर्तमेढ रोवली याविषयी माहिती दिली.अध्यक्षीय भाषणात डॉ. केतन चौधरी यांनी कशाप्रकारे…
भडगाव – येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचालित कला व विज्ञान महाविद्यालय कोळगाव येथे महात्मा ज्योतीराव फुले पुण्य तिथी निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतीबा फुले व कर्मवीर तात्यासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवंरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश कोळी होते प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महा विद्यालयाचे प्राचार्य अनिल पवार व माजी विध्यार्थीनी गायत्री पाटील होते यावेळी गायत्री पाटील या माजी विद्यार्थीनीने फायदेशीर आर्थिक गुंतवणूक बद्दल सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधूना मार्गदर्शन केल्यामुळे महाविद्यालय परिवारातर्फे किसान मासिक देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा मनोज पवार यांनी तर सूत्र संचालन…
