Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team YuvaDisha
जळगाव-एकलव्य विद्यालयाचा 14 वर्ष वयोगटाचा संघ पुन्हा एकदा यशस्वी होत विभाग स्तरावर पोहोचला आहे. तालुकास्तर तसेच जिल्हास्तरावर प्रत्येक सामन्यात विजय मिळवत अंतिम सामन्यात पानबारा संघाचा पराभव करत एकलव्य विद्यालयाच्या 14 वर्षे वयोगटाच्या व्हॉलिबॉल संघाने विभाग स्तरावर मजल मारली आहे. आपल्या उत्कृष्ट खेळाने या संघाने उपस्थित सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. या यशस्वी संघात कर्णधार अशोक पवार, प्रेम अहिरे, साहिल अहिरे, कुलदीप नाईक, सुमित पाडवी, रीतिक वसावे, पियुष वळवी, आदित्य कोकणी , साई सूर्यवंशी, शशिकांत पवार, आनंद सूर्यवंशी , वेदांत गावीत, महेश गायकवाड या खेळाडूंचा समावेश होता. यशस्वी विद्यार्थ्यांना नितीन पाटील, सुनील पाटील, धोंडीराम शिनगर, अजित लांडगे, जकू गावित, संभाजी गावित, राजेश…
जळगाव -जळगाव शहरात सोन्याच्या लालसेने मृतदेहाच्या अस्थींची चोरी होण्याचा दुसरा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या आठवड्यात मेहरूण परिसरात झालेल्या घटनेची पुनरावृत्ती सोमवारी सकाळी शिवाजीनगर स्मशानभूमीत झाली. आठवडाभरात घडलेल्या या दोन घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता आणि संताप व्यक्त होत आहे. मेहरूण येथील पहिली घटना: गायत्रीनगरातील रहिवासी असलेल्या छबाबाई काशिनाथ पाटील (७४) यांचे ५ ऑक्टोबर रोजी निधन झाले. दुसऱ्या दिवशी मेहरूण भागातील महापालिकेच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. छबाबाई यांना सोन्याचे दागिने अंगावरच ठेवून अंत्यसंस्कार करण्याची इच्छा होती, त्यानुसार त्यांच्या कुटुंबियांनी सुमारे दोन तोळे (२० ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने अंगावर ठेवून अंत्यसंस्कार केले होते. मात्र, तिसऱ्या दिवशी नातेवाईक अस्थी गोळा करण्यासाठी…
पाचोरा -तहसील कार्यालयात पंचायत समिती पाचोरा येथील गणनिहाय आरक्षणाची सोडत पार पडली. स्व. तालुक्यासाहेब आर.ओ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व सर्वसाधारण प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. 🗳️ मुख्य आरक्षणाचे तपशील: ▪️ तारखेडा खुर्द – अनुसूचित जाती (महिला) ▪️ शिंदी – अनुसूचित जमाती (सामान्य) ▪️ नागरदेवळ खुर्द – मागास प्रवर्ग (महिला) ▪️ कुंडखेड बु. – मागास प्रवर्ग (सामान्य) ▪️ लोहारा – सर्वसाधारण (महिला) ▪️ बांभोरी बु.ज.पा. – सर्वसाधारण ▪️ पिंपळगाव बु.खु. – सर्वसाधारण ▪️ कुरंगी – सर्वसाधारण (महिला) ▪️ लोहारा – सर्वसाधारण ▪️ वाळके खुर्द – सर्वसाधारण
जळगाव – खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मुळजी जेठा महाविद्यालयामध्ये दि. 10 ऑक्टोबर या जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसशास्र विभाग व नव्याने सुरू झालेला समाजकार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते . सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सनराईज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे प्र.प्राचार्य. चेतन दिवाण तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.संजय भारंबे यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. विविध कार्यक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात आला.प्रा. दिवाण सर यांनी ‘आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवांची उपलब्धता’ या विषयावर व्याख्यान केले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मानसिक आजारांविषयी माहिती दिली.पोस्टरस्पर्धा, निबंधस्पर्धा,घोषवाक्यस्पर्धा आणि काही मानसशास्रीय खेळ घेण्यात आले. या कार्यक्रमाला मानविद्याशाखेचे…
जळगाव- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज ऑफ सायन्स, आर्ट्स व कॉमर्स, जळगाव च्या अंतर्गत गुणवत्ता हमी सेल तर्फे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या साठी इंडक्शन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. उद्घाटनाच्या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यलायाचे प्राचार्य डॉ. के बी महाजन, शैक्षणिक सल्लागार प्रा. व्ही. एस. झोपे, प्रा. संदीप पाटील, समन्वयक, अंतर्गत गुणवत्ता हमी सेल, व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. के. पी. नारखेडे, समन्वयक अंतर्गत गुणवत्ता हमी सेल, मू. जे. महाविद्यालय, जळगाव हे उपस्थित होते. पाहुण्याचा परिचय प्रा. संदीप पाटील यांनी करून दिला. डॉ. के. बी. महाजन यांनी इंडक्शन प्रशिक्षण कार्यक्रम चे प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. के. पी. नारखेडे, यांनी…
जळगाव – के.सी.ई. सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालय (स्वायत्त) येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व “मूल्जियन मायक्रोबायोलाॅजीस्ट्स अँड अल्युमनी असोसिएशन, जळगाव” यांच्या संयुक्त विद्यमाने “सहवास सुक्ष्मजीवांचा, वेध भविष्याचा” या माजी विद्यार्थी मार्गदर्शन व व्याख्यान मालिके अंतर्गत माजी विद्यार्थ्यांचे तीन मार्गदर्शन सत्र पार पडले. सुक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान या विषयातील विद्यार्थ्यांना विविध नोकरी, व्यवसाय व संशोधन संधींची माहीती होऊन त्यांनी आपल्या भविष्याचा वेध घ्यावा, हा या व्याख्यान मालिकेचा उद्देश आहे. सदर मालिकेत आय.पी.सी.ए., मुंबई येथे कार्यरत माजी विद्यार्थी श्री.धनंजय लांडे याने प्रथम व्याख्यान दिले. सुक्ष्मजीवशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसमोर उपलब्ध असलेल्या “क्लिनिकल ट्रायल्स” क्षेत्रातील विविध संधींवर त्याने मार्गदर्शन केले. पारंपारिक करिअर सोडून आधुनिकीकरण अंगीकारत आपण नविन…
जळगाव – केसीई सोसायटी संचलित मू. जे. महाविद्यालयाच्या ‘रेडिओ मनभावन ९०.८ एफ.एम.’ या समाजाभिमुख रेडिओ केंद्राचे संचालक अमोल देशमुख यांची कम्युनिटी रेडिओ असोसिएशन (सीआरए) या देशातील सर्व समुदाय रेडिओ केंद्रांच्या प्रमुख संस्थेच्या कार्यकारिणी सदस्यपदी २०२५ ते २०२६ या कालावधीसाठी निवड झाली आहे. ही निवड सीआरएच्या विद्यमान पदाधिकारी मंडळाच्या शिफारशीवरून करण्यात आली आहे. देशातील समुदाय रेडिओ केंद्रांच्या हितरक्षणासाठी आणि त्यांच्या कार्याचे समन्वयन करण्यासाठी सीआरए ही संस्था कार्यरत आहे. संस्थेचे प्रमुख पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत – श्री. संदीप परमार (अध्यक्ष), श्री. जितेंद्र शर्मा (सचिव जनरल), श्री. एम. एस. एच. बेग (खजिनदार), सौ. संग्या टंडन (उपाध्यक्ष – मध्य विभाग), डॉ. एस. चंद्रशेखर (उपाध्यक्ष –…
जळगाव -के.सी.ई.सोसायटी संचलित व्ही.पी.होले शिक्षणशास्त्र आणि शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव महाविद्यालयातर्फे गांधी रिसर्च फाउंडेशनला क्षेत्र भेट आयोजीत करण्यात आलेली होती.प्राचार्य डॉ.अशोक राणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.08/10/ 2025 रोजी गांधी जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशन येथे या क्षेत्रभेटीच्या समन्वयीका डॉ.पूनम जमधडे यांनी शैक्षणिक क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या शैक्षणिक क्षेत्र भेटीमध्ये बी.एड. व एम.एड च्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजीं चे विचार आणि कार्य याविषयी ऑडिओ व्हिडिओ क्लिप द्वारे माहिती प्राप्त केली. तसेच महात्मा गांधी रिसर्च फाउंडेशन मधील गांधीजींचे शैक्षणिक विचार आणि नयी तालीम सारख्या मुलोद्योगी शिक्षणावर भर देणाऱ्या कृतींचे निरीक्षण केले.यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना चौधरीसर,फालासर,कुलकर्णी सर यांनी गांधीजींच्या शैक्षणिक विचारावर मार्गदर्शन…
जळगाव- महाराष्ट्र राज्यात समग्र शिक्षा उपक्रमाचे अंतर्गत प्रत्येक शाळेत संगणक शिक्षणासाठी प्रयोगशाळा आणि एक प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले आहे आजच्या डिजिटल युगात टिकण्यासाठी संगणकासोबत मैत्री साधणे आणि त्याचे शिक्षण घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे हाच उद्देश ठेवून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीटी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात संगणक प्रयोगशाळा तयार केलेली असून या प्रयोगशाळेत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे प्रशिक्षण दिले जाते. नुकताच इयत्ता पाचवी ते आठवी च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या संगणकाच्या विविध घटकांवर आधारित असे डेस्कटॉप कम्प्युटर ,कॉम्प्युटर फुल फॉर्म, आय पॅड, कॉम्प्युटर आउटपुट अँड इनपुट डिव्हाइसेस, इलेक्ट्रॉनिक कुलर, टेबल…
जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत जळगाव क्रीडा विभाग आयोजित आंतरमहाविद्यालयीन मैदानी (पुरुष व महिला) स्पर्धा २०२५ चे भव्य आयोजन खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय, जळगाव येथे दिनांक १२ व १३ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आले. या स्पर्धेमध्ये विभागातील एकूण २७ महाविद्यालयांतील ३८० मुले व मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रारंभी मान्यवरांचे हस्ते स्पर्धेचे ध्वजारोहण करण्यात आले मग सहभागी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी संगीताच्या तालावर पथसंचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली यानंतर विद्यापीठ खेळाडू मथुरा वसावे, नेहा बेलदार, संदीप पावरा व देवसिंग बारेला या खेळाडूंनी क्रीडा ज्योत मैदानात आणली त्या क्रीडा ज्योतीवरून क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र…
