Author: Team YuvaDisha

उत्तर महाराष्ट्रातील नगरपरिषदा व महापालिका निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) यांच्या कामगिरीबाबत पक्षांतर्गत अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. जळगाव जिल्ह्यासह अनेक ठिकाणी भाजपने स्वबळावर प्रभावी कामगिरी केल्याने शिंदे गटाच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याच पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाकडून संघटनात्मक फेरबदल आणि मंत्रिमंडळात खांदेपालट करण्याबाबत हालचालींना वेग आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण जिल्ह्यात पक्षीय पकड मजबूत होण्याच्या दृष्टीने शिंदे गटाकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाची स्थानिक पातळीवरील पकड मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी मंत्रिमंडळात बदल करून काही नव्या आमदारांना जबाबदारी…

Read More

वीजबिल भरा, नाहीतर राहाल अंधारात थकबाकीदार ग्राहकांना महावितरणचा कडक इशारा जळगाव | प्रतिनिधी शहर व ग्रामीण भागात वाढलेल्या वीजबिल थकबाकीमुळे महावितरण प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून, थकीत वीजबिल तत्काळ भरा, अन्यथा वीजपुरवठा खंडित केला जाईल, असा स्पष्ट इशारा थकबाकीदार ग्राहकांना देण्यात आला आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत सुमारे ४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. महावितरणकडून जळगाव शहरासह परिसरातील घरगुती, व्यावसायिक तसेच औद्योगिक ग्राहकांकडे कोट्यवधी रुपयांची वीजबिल थकबाकी जमा झाली आहे. वारंवार नोटिसा देऊनही अनेक ग्राहकांकडून थकीत रक्कम भरली जात नसल्याने आर्थिक शिस्त लावण्यासाठी ही कारवाई हाती घेण्यात आली आहे. विशेष मोहीम सुरू महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, थकबाकीदार ग्राहकांची…

Read More

*’गुरु तेग बहादूर साहिब’जी यांच्या ३५० व्या हौतात्म्य दिनानिमित्त नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा्* *दिल्ली, मुंबई आणि चंदीगढवरून सुटणार विशेष रेल्वे* नवी दिल्ली २१: ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० शहिदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांची आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने ‘ट्रेन ऑन डिमांड’ (TOD) अंतर्गत मुंबई, चंदीगढ आणि दिल्ली (हजरत निजामुद्दीन) येथून नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे                             …

Read More

शिधापत्रिकांचे शुद्धीकरण; १० हजार संशयास्पद लाभार्थ्यांची नावे जाणार! ‘मिशन सुधार’ अभियानात आधार क्रमांक व तांत्रिक माहितीच्या आधारे पडताळणी जळगाव | प्रतिनिधी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन सुधार’ अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील शिधापत्रिकांचे शुद्धीकरण करण्यात येत असून, यामध्ये सुमारे १० हजार संशयास्पद लाभार्थ्यांची नावे रद्द होण्याची शक्यता आहे. आधार क्रमांक, ई-केवायसी व इतर तांत्रिक माहितीच्या आधारे सखोल पडताळणी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक शिधापत्रिकांमध्ये अपात्र लाभार्थी, स्थलांतरित व्यक्ती, मृत व्यक्तींची नावे तसेच दुहेरी नोंदी आढळून आल्याने शासनाने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत शिधापत्रिकाधारकांची घरोघरी तपासणी करण्यात येत असून, संबंधित कागदपत्रे व माहितीची खातरजमा केली जात आहे. आधार क्रमांकाशी शिधापत्रिका…

Read More

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ BLO अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन जळगाव | प्रतिनिधी भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात लवकरच मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जानेवारी २०२६ पासून विविध मोहिमा सुरू करण्यात आल्या असून, त्यामध्ये Person to Person Mapping व Progeny Mapping या मोहिमांचा समावेश आहे. Person to Person Mapping अंतर्गत सध्याच्या मतदार यादीतील मतदारांची नावे सन २००२ च्या मतदार यादीतील नोंदींशी जुळविण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. तर Progeny Mapping मोहिमेत सन २००२ च्या मतदार यादीत प्रत्यक्ष नाव नसलेल्या मतदारांची नोंद…

Read More

पाचोऱ्यात सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण २५ जानेवारी रोजी पाचोरा | प्रतिनिधी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त किशोर आप्पा पाटील बहुउद्देशीय संस्था, पाचोरा व द युनिक अकॅडमी, जळगाव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा व भडगाव मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी११,०० वाजता व्यापारी भवन, पाचोरा येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात माननीय आमदार किशोर आप्पा पाटील, पाचोरा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा तसेच नगरसेवकांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ₹ ११,०००, द्वितीय…

Read More

युडीआयडी-आधार संलग्नतेसाठी 28 जानेवारीपूर्वी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन जळगाव,  20 जानेवारी,2026 जिल्हयातील विशेष सहाय्य योजनेतंर्गत संजय गांधी योजना / श्रावणबाळ योजना / इंदिरा गांधी योजनेतंर्गत शासनाने लाभार्थ्यांना ऑनलाईन सुविधे अंतर्गत अनुदान वितरीत करण्याचे निश्चित केलेले आहे. त्या अनुषंगाने सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना शासन निर्णय दि. 20 ऑगस्ट 2025 नुसार या योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी लाभाच्यर्थ्यांचे युडीआयडी कार्ड आधार कार्डाशीसंलग्न करणे अनिवार्य आहे. ज्या लाभार्थ्यांना अनुदानात वाढ झाल्यापासून 2500 रु. अर्थसहाय्य मिळत आहे अश्या दिव्यांग लाभाथ्यांचें युडीआयडी कार्ड देखील MAHADBT या पोर्टलवर संलग्न करणे अनिवार्य आहे. तरी ज्या दिव्यांग लाभार्थ्यांनी अद्याप कार्यालयात आवश्यक कागदपत्र जसे दिव्यांग प्रमाणपत्र, आधार कार्ड, युडीआयडी कार्ड, बँक…

Read More

कंडारी गावातील ग्रामपंचायत लिपिक गोपाल रिवाजकर यांची कन्या शुभांगी रिवाजकर हिची केंद्रीय राखीव पोलीस दलात ( CRPF ) यशस्वी निवड झाल्याने संपूर्ण कंडारी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आनंददायी प्रसंगी कंडारी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन ऍडव्होकेट अनिल वसंतराव पाटील यांनी शुभांगी व तिच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन फुलगुच्छ देत अभिनंदन केले. गावकऱ्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव करत या यशाचे कौतुक केले. यावेळी डॉ. शामकांत चिमणराव पाटील, सोसायटी सचिव हिरालाल भावसार, मा. उपसरपंच सुनील सुर्वे, तसेच सुधीर सुर्वे, मनीष सुर्वे, अमोल पाटील, मल्हार सुर्वे, हर्षल बाविस्कर, प्रवीन धनगर उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने मिळवलेले हे यश इतर तरुण-तरुणींना प्रेरणादायी असून, शुभांगीच्या…

Read More

जळगाव –  के. सी. ई च्या पी. जी. महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘रिदम 2026’ उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनाची सुरुवात सांस्कृतिक दिवस साजरा करून करण्यात  आली. विद्यार्थ्यांनी विविध पोशाख, बहुविध संस्कृतींची सांगड घालत उत्साहात साजरा केला. महाविद्यालयातर्फे बॅडमिंटन, मेहंदी, रांगोळी, साडीडे व  अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे  आयोजित करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे  उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. बी. महाजन  यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी मंचावर डॉ. व्ही. एस. झोपे, स्नेहसंमेलन समन्वयक  सौ. रुपाली खंबायत,  प्रा.संदीप पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी नृत्य, समूह नृत्य, नाटिका, गायन तसेच वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी पारंपारिक गीते,  लोकगीते असे विविध कलागुण सादर केले. पारितोषिक वितरण मु.जे.महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.के. पी. नारखेडे,यांच्या  प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी स्नेहसंमेलनात भाग घेणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांना तसेच शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Read More