Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

इंदाई पब्लिकेशन्स व इग्नाईट अकॅडेमी, पुणे तर्फे महा-टेस्ट सिरीज संपन्न

June 7, 2026

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

May 3, 2026

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Monday, July 20
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»नंदुरबार येथील ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात संपन्न
बातम्या

नंदुरबार येथील ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात संपन्न

Team YuvaDishaBy Team YuvaDishaJanuary 12, 2026No Comments41 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नंनंदुरबारदुरबार येथील ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात संपन्न झाली. प्रथम स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून रसायन शास्त्र विभाग प्रमुख प्रा. प्रकाश चौधरी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी राजमाता जिजाऊंनी आपल्या संस्कारांच्या देणगीतून स्वराज्याला दोन छत्रपती दिले आणि महाराष्ट्र गुलामगिरीच्या तावडीतून कशाप्रकारे मुक्त केला हे पटवून दिले तसेच स्वामी विवेकानंदांबद्दल माहिती देताना आपल्या अवघ्या 39 वर्षांच्या आयुष्यात हिंदू धर्माची पताका जगभरात फडकविण्याचे महान कार्य केले तसेच आजच्या युवा पिढीसाठी स्वामी विवेकानंद‌ यांचे संपूर्ण जीवनकार्य कशाप्रकारे एक प्रेरणास्थान आहे, हे विविध उदाहरणांतून विशद करून सांगितले. विवेकानंदांच्या ठायी असलेली कुशाग्र बुद्धिमत्ता, जिद्द,‌ चिकाटी आणि मेहनत या गुणांचा आपणही अंगीकार करावा आणि आपल्या राष्ट्राचे नाव उज्वल करावे असा मोलाचा सल्ला उपस्थितांना यावेळी दिला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एकलव्य विद्यालय व ज. ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मा.श्री सुनील चौधरी यांनी भूषविले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे इतर सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. वर्षा घासकडबी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी स्वामी विवेकानंद यांनी युवकांसाठी सांगितलेला कर्मसिद्धांत सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री अरुप गोस्वामी यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. श्रीमती सुवर्णा गिरासे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक वृंद यांनी सहकार्य केले.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

इंदाई पब्लिकेशन्स व इग्नाईट अकॅडेमी, पुणे तर्फे महा-टेस्ट सिरीज संपन्न

June 7, 2026

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

May 3, 2026

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,549

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026737

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025461
Don't Miss

इंदाई पब्लिकेशन्स व इग्नाईट अकॅडेमी, पुणे तर्फे महा-टेस्ट सिरीज संपन्न

By Team YuvaDishaJune 7, 202670

जळगाव : इंदाई पब्लिकेशन्स, जळगाव व इग्नाईट अकॅडेमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 7…

नवी मुंबईतील पोलीस हवालदार मच्छिंद्र पवार यांचा विशेष सन्मान

May 3, 2026

डॉ. प्राजक्ता देशमुख व डॉ. शारदा शिरोळे लिखित ‘कचरा व्यवस्थापन’ या पुस्तकाचे प्रकाशन

May 2, 2026

स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांनी सक्षम पिढी घडवण्यास मदत करावी… आमदार किशोर आप्पा पाटील

May 2, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.