Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team YuvaDisha
जळगाव – के.सी.ई.सोसायटी संचालित मूळजी जेठा महाविद्यालयाच्या तत्वज्ञान विभागातर्फे ” शंकराचार्यांचे ब्रह्मसूत्र भाष्य” या विषयावर एका दिवसाचे राष्ट्रीय चर्चासत्र यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले.यात विविध विद्यापीठांतील तत्वज्ञान विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक आणि विषय तज्ज्ञांनी सहभाग घेतला. तत्वज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ. रजनी सिन्हा यांनी मान्यवरांचे स्वागत करून चर्चासत्राच्या विषयाची ओळख करून दिली.कार्यक्रमाची सुरुवात एम.जे. महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाचे प्राध्यापक डॉ. अखिलेश शर्मा यांनी मंगलाचरण करून केली.जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (दिल्ली) येथील प्रो. डॉ. रामनाथ झा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, उपनिषदांमधील वाक्यांचे तार्किक विवेचन म्हणजे ब्रह्मसूत्र होय. ‘अविरोधाध्याय’ मध्ये ब्रह्म हे जगाचे निमित्त आणि उपादान कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आचार्य शंकरांनी आपल्या ब्रह्मसूत्र भाष्यात…
जळगाव- समाजात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव यांच्या वतीने बसस्टँड , रेल्वे स्टेशन , काव्यरत्नावली चौक, एम जे कॉलेजपरिसरात प्रभावी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या विद्यार्थिनींनी उत्साहपूर्ण आणि जिवंत अभिनयातून ‘स्वच्छतेचा संदेश’ नागरिकांपर्यंत पोहोचवला. या पथनाट्यातून स्वच्छ परिसर राखण्याचे महत्त्व, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकचा कमी वापर आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी याबाबत प्रभावी संदेश देण्यात आला. विद्यार्थिनींच्या भावपूर्ण सादरीकरणामुळे दिलेला संदेश थेट हृदयाला भिडणारा ठरला आणि उपस्थित नागरिकांनी त्याचे कौतुकाने स्वागत केले. या उपक्रमाचे संयोजन आणि मार्गदर्शन मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता कोमलदास झांबरे, पर्यवेक्षक श्री. नरेंद्र पालवे, सौ. प्रतिभा छबिलदास लोहार, तसेच श्रीमती रोहिणी राजेश…
जळगाव – शेतीमध्ये सातत्याने होणारा रासायनिक खतांचा वापर आणि बदलत्या हवामानामुळे मातीचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी ‘माती परीक्षण’ आणि ‘जैविक शेती’ ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन कृषी क्षेत्रातील मान्यवरांनी केले. मृदेचे (मातीचे) महत्त्व आणि तिचे संवर्धन याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी,मूळजी जेठा महाविद्यालयाचा ‘करियर कट्टा’ विभाग आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “आंतरराष्ट्रीय मृदा दिन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कृषी अधिकारी आणि शास्त्रज्ञांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले.शाश्वत शेती आणि मृदा संवर्धन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना तज्ज्ञांनी शाश्वत शेती या संकल्पनेवर विशेष भर दिला.…
जळगाव – के. सी. ई. सोसायटीचे व्ही. पी. होले. शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय (स्वायत्त ) जळगाव महाविद्यालयातर्फे बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात सरांनी बहिणाबाईंचे कार्य, कविता याबद्दल सखोल माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गणेश पाटील यांनी केले. तर मनोगत प्रा. डॉ. संभाजी जमधडे तसेच प्रथम वर्षाच्या विद्यार्थीनी शिवानी जाधव, कोमल नेमाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डिगंबर सुरवाडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन तेजस्विनी दुबे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वृंद व प्रथम वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते.
जळगाव – मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयातील ललित कला विभागांतर्गत बी. एफ.ए. प्रथम वर्षाचा विद्यार्थी भरत श्रवासने या विद्यार्थ्याने बहिणाबाईंच्या स्मृतिदिनाच्या औचित्याने विभागात अवघ्या तीन तासात कल्पक असे अर्धाकृती बहिणाबाईंचे शाळू मातीद्वारे शिल्प साकारले. या वेळी मूळजी जेठा महाविद्यालयाचे ललित कला विभाग प्रमुख प्रा. मिलन भामरे, प्रा. प्रसाद देसाई, प्रा.पियुष बडगुजर, प्रा. ऋषी इसाने, प्रा. दिगंबर शिरसाळे, प्रा. पुरुषोत्तम घाटोळ यांनी विद्यार्थ्यास प्रेरणा देत शिल्प निर्मितीसाठी मार्गदर्शन केले. या अर्धकृती शिल्पाचे बहिणाबाईंच्या स्मृतिदिनी पूजन प्राचार्य प्रा . डॉ. एस एन भारंबे यांच्या हस्ते करण्यात आले. भरत श्रवासने यांनी केलेल्या शिल्पा बद्दल केसीई सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर…
सांबळपूर (ओडिशा), दि. २ डिसेंबर २०२५ ओडिशा सायकलिंग असोसिएशनतर्फे आयोजित २ ते ६ डिसेंबर २०२५ दरम्यान सुरू असलेल्या ३० व्या सीनियर, ज्युनियर व सब-ज्युनियर करीत इंडिव्हिज्युअल टाइम ट्रायलमध्ये सुवर्णपदक पटकावले. सब ज्युनियर गर्ल्स – 15 किमी इंडिव्हिज्युअल टाइम ट्रायलचे निकाल 🥇 सुवर्णपदक : मनासी कीशोर महाजन (महाराष्ट्र) वेळ : 00:24:29.881 मिनिटे सरासरी वेग : 36.74 किमी/तास 🥈 रौप्यपदक : दीपिका फडतारे (कर्नाटक) वेळ : 00:25:50.505 🥉 कांस्यपदक : सैखोम फ्लॉरेन्स देवी (मणिपूर) वेळ : 00:35:16.055 मनासीने स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच दमदार वेग राखला आणि 15 किमी अंतर सर्वात कमी वेळेत पूर्ण करत महाराष्ट्रासाठी सुवर्णपदकाची कमाई केली. तिच्या या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे महाराष्ट्राच्या सायकलिंग…
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी घडामोड घडली आहे. नागपूर खंडपीठाने आज महत्त्वाचा आदेश देत संपूर्ण राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी — २१ डिसेंबर २०२५ रोजी करण्यास सांगितले आहे. यामुळे ३ डिसेंबरला अपेक्षित असलेले निकाल आता पुढे ढकलण्यात आले आहेत. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे मुख्य मुद्दे २० डिसेंबरपर्यंत सर्व ठिकाणी मतदान पूर्ण केले जावे. २१ डिसेंबरला एकाच वेळी राज्यभर मतमोजणी होईल. मतदान संपल्यानंतर अर्ध्या तासानंतर एक्झिट पोल जाहीर करता येतील. निर्णय का घेतला गेला? काही नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये प्रलंबित याचिका आणि प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे निवडणूक कार्यक्रम ढवळून निघाला होता. काही ठिकाणी मतदान वेळेत तर काही ठिकाणी उशिराने होण्याची…
विद्यार्थी विज्ञान मंथन 2025 परीक्षेचा स्टेज 2 (जिल्हा स्तरीय) चा निकाल ३० नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आला. प्रा. डॉ. प्रेमजित जाधव आणि ऍड. सौ किरण जाधव यांची कन्या शर्वरी जाधव हिची महाराष्ट्र राज्य देवगिरी प्रांत स्तरातून (१४ जिल्ह्यांमध्यून) महाराष्ट्र राज्यस्तरावर निवड झाली आहे, शर्वरी ही ओरायन सी.बी.एस.सी. इंग्लिश माध्यम शाळा जळगाव येथे इयत्ता सातवीत शिकत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका,शाळेतील शिक्षकांचे आणि पालकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश संपादन करू शकले असे मत शर्वरीने व्यक्त केले,यापुढे जाऊन आता राज्यस्तरावरून राष्ट्रीय स्तरावर जाण्याचे आपले स्वप्न आहे असे तिने सांगितले. विज्ञान भारती द्वारे विद्यार्थी विज्ञान मंथन या परीक्षेचे राष्ट्रीय स्तरावर आयोजन करण्यात येते. विज्ञानाचे…
*भडगाव (प्रतिनिधी)-* कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,विद्यालय,कोळगाव ता-भडगाव येथील इयत्ता बारावीचा विद्यार्थी व किसान स्पोर्ट्स अकॕडमीचा राष्ट्रीय खेळाडू पैलवान स्वराज प्रल्हाद चौधरी ह्याची लहान बहिण कु.साध्वी मिनाक्षी प्रल्हाद चौधरी हिने राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टींग क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियातर्फे खेलो इंडिया इनडोअर स्टेडियम,इटानगर, अरुणाचल प्रदेश येथे 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या 69 व्या राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत 17 वर्षाआतील 63 किलो वजनी गटात कु.साध्वी हिने क्लीन अँड जर्क यात 89 आणि स्नॅच मध्ये 74 किलो असे एकूण 163 किलो वजन उचलत प्रथम स्थान मिळवत…
महाराष्ट्र : राज्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य पोलिस भरती २०२४-२५ साठी उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवून ७ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात आली असल्याची माहिती विशेष बाब म्हणून एडीजी (ट्रेनिंग) यांच्या कार्यालयातून देण्यात आली. राज्यातील पोलीस दलातील विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांची गर्दी पाहता आणि तांत्रिक अडचणींचा विचार करून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. भरती पोर्टलवर शेवटच्या काही दिवसांत होणारी वाढती गर्दी आणि सर्व्हरची समस्या लक्षात घेऊन ही निर्णयप्रक्रिया करण्यात आली असल्याचे समजते. या मुदतवाढीमुळे अजूनही अर्ज न भरलेल्या उमेदवारांना आता सुटकेचा श्वास मिळाला असून, आवश्यक कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध झाला आहे. अर्ज…
