Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team YuvaDisha
जळगाव -के.सी.ई.सोसायटी संचलित व्ही.पी.होले शिक्षणशास्त्र आणि शारिरीक शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव महाविद्यालयातर्फे गांधी रिसर्च फाउंडेशनला क्षेत्र भेट आयोजीत करण्यात आलेली होती.प्राचार्य डॉ.अशोक राणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.08/10/ 2025 रोजी गांधी जयंतीनिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशन येथे या क्षेत्रभेटीच्या समन्वयीका डॉ.पूनम जमधडे यांनी शैक्षणिक क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या शैक्षणिक क्षेत्र भेटीमध्ये बी.एड. व एम.एड च्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजीं चे विचार आणि कार्य याविषयी ऑडिओ व्हिडिओ क्लिप द्वारे माहिती प्राप्त केली. तसेच महात्मा गांधी रिसर्च फाउंडेशन मधील गांधीजींचे शैक्षणिक विचार आणि नयी तालीम सारख्या मुलोद्योगी शिक्षणावर भर देणाऱ्या कृतींचे निरीक्षण केले.यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना चौधरीसर,फालासर,कुलकर्णी सर यांनी गांधीजींच्या शैक्षणिक विचारावर मार्गदर्शन…
जळगाव दि.१२ – भारताने जगाला संगीत व कला या दोन बहुमूल्य देणगी दिल्या आहेत. युवारंग २०२५ मध्ये विद्यार्थ्यांना भारतीय संगीत व कला या क्षेत्रात चांगले कर्तृत्व दाखविण्याची संधी गेल्या २५ वर्षापासनू विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग व जी.एच.रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सवाच्या व दिव्यांग महोत्सवाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी केले. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी, अभिनेत्री केतकी माटेगावकर, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, प्रा. सुनील…
*कंडारी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी. दादा सो अँड. अनिल वसंतराव पाटील यांची बिनविरोध निवड* कंडारी, तालुका जिल्हा जळगाव येथील चेअरमन बिनविरोध निवडीची प्रक्रिया कायम येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदाची गेल्या 40 वर्षांपासून बिनविरोध निवड संचालकांद्वारे केली जात आहे. आज 12 ऑक्टोंबर रोजी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कै. वसंतराव पाटील यांचे चिरंजीव दादा सो अनिल वसंतराव पाटील यांची निवड या पदी पार पडली. कै. वसंतराव पाटील हे देखील कंडारी विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन होते. सदरची निवड प्रक्रिया अधिकारी गौतम बलसाने यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आर पी कांबळे (सहाय्यक सहकार अधिकारी) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर…
पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील बदरखे गावात गेल्या काही दिवसांपासून गावठी दारूचे खुलेआम उत्पादन आणि विक्री सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावाच्या परिसरालगत असलेल्या संभाजीनगर जिल्हा हद्दीत तांडा भागात दिवसा ढवळ्या दारूचे धंदे बिनधास्तपणे सुरू असतात. या व्यवसायामुळे गावातील युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले असून काही दिवसांपूर्वी एका युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. शाळा व मंदिर परिसरातही मद्यपींची वर्दळ वाढल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी पोलीस पाटील व महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रारी नोंदवल्या असल्या तरी केवळ आश्वासनांवरच…
भडगाव – येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य आणि अर्थशास्त्र विभागाच्या वतीने औद्योगिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. ही सहल जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव येथे नेण्यात आली. या औद्योगिक सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी जैन इरिगेशन सिस्टीम्सच्या विविध विभागांना भेट दिली. त्यामध्ये टिश्यू कल्चर रोप नर्सरी, आशिया खंडातील सर्वात मोठी टिश्यू कल्चर लॅब, तसेच फ्युचर फार्मिंग सेंटर यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीत वापरल्या जाणाऱ्या ठिबक सिंचन, तुषार सिंचन प्रणाली, तसेच विविध शेतीसंबंधी स्मार्ट अवजारे आणि तंत्रज्ञान यांची सखोल माहिती यावेळी जैन इरिगेशन सिस्टीमच्या वतीने देण्यात आली. या सहली दरम्यान…
एकलव्य विद्यालयातील हर्षल गोरखनाथ बिरारे याची धनुर्विद्या- भारतीय या खेळ प्रकारात सलग दुस-या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली. हर्षलच्या या निवडीबद्दल प.खा.भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष डाॅ. सुहास नटावदकर, मुख्याध्यापक सुनील चौधरी, माजी मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर यांनी त्याचे अभिनंदन करून सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी क्रीडाशिक्षक सुनील पाटील, धोंडीराम शिनगर, अजित लांडगे, जकू गावित, संभाजी गावित, राजेश वळवी, नितीन पाटील उपस्थित होते.
कोळगाव ता.भडगाव (वार्ताहर) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत, *गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव* येथील तथा *किसान स्पोर्ट्स अकॕडमीचे* खेळाडू *कु. तनु वाल्मीक पाटील (४९ किलो,प्रथम)* तसेच *चि.स्वराज प्रल्हाद चौधरी (ग्रीकोरोमन ६५ किलो,प्रथम)* यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी,कार्यालय, नाशिकतर्फे,बलकवडे व्यायामशाळा, भगुर जि.नाशिक येथे आयोजित विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत आपआपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूस चितपट करून यश संपादन केले आहे. याच स्पर्धेत *चि.ओम ज्ञानेश्वर बोरसे (ग्रीकोरोमन ९२ किलो, द्वितीय)* उपविजेतेपद प्राप्त केले आहे. *तनु तसेच स्वराज* यांची *खोपोली जि. रायगड* येथे आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेत यश मिळवणाऱ्या कुस्तीपटूंना *आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी* यांचे…
स्वच्छ ग्राम स्पर्धेत जरंडी अव्वल — संभाजीनगर जिल्ह्यात सलग तिसऱ्यांदा मानाचा तुरा सोयगाव / प्रतिनिधी – विजय पगारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील मौजे जरंडी ग्रामपंचायतीने पुन्हा एकदा स्वच्छतेचा आदर्श घालून दिला आहे. संत गाडगेबाबा स्वच्छ ग्राम स्पर्धा २०२४–२५ मध्ये जरंडीने तब्बल १८१ गुण मिळवून जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. या यशामुळे जरंडी ग्रामपंचायतीने सलग तिसऱ्यांदा “स्वच्छ ग्राम” पुरस्कार मिळवण्याचा मान मिळवला असून, गावाचा तोरा संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा उजळला आहे. शुक्रवारी सायंकाळी सात वाजता जाहीर झालेल्या निकालात जरंडीचा उल्लेख अव्वल ठरल्याची घोषणा होताच गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. या यशामागे सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच संजय पाटील, वंदनाताई पाटील, मधुकर…
सोयगाव तालुक्यातील जरंडी ग्राम संसद अंतर्गत ग्रामविकास व पंचायतराज विभाग जिल्हा छत्रपती संभाजीनगर, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज विभाग अभियानांतर्गत शनिवारी (ता ११)श्रमदानातून वनराई बंधारा उभारण्यात आला. गारगोटी धरणापासून उगमस्थान पावलेली खडकी नदितून वाहून जानाऱ्या पाण्याचा शेतकऱ्यांसह गावकऱ्यांना पाण्याचा लाभ घेता यावा म्हणून जरंडी ग्राम संसद अंतर्गत ग्रामविकास व पंचायतराज विभाग जिल्हा छत्रपती संभाजीनगर, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज विभाग अभियानांतर्गत शनिवारी श्रमदानातून वनराई बंधारा उभारण्यात आला असून परिसरातील शेतकऱ्यांसह गावकऱ्यांना यांचा मोठा लाभ झालेला आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या उद्देशाने हा उपक्रम राबवला गेला, ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. या बंधाऱ्यांमुळे सिंचनक्षमता वाढण्यास मदत होत आहे, विशेषतः बांधाऱ्यालगत विहीरीना पाणीटंचाईवर मात करण्यासाठी…
अनुभूती विद्या निकेतन आणि अनुभूती बाल निकेतनद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. अनुभूती उद्यमिता कार्यक्रमाच्या अंतर्गत रविवारी 12 ऑक्टोबर रोजी ‘दिवाळी मेळा 2025’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जैन इरिगेशन अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन, अतुल जैन आणि जैन कुटुंबियांची उपस्थिती असणार आहे. मेळ्यात मॉन्टेसरी आणि इयत्ता 1 चे विद्यार्थी स्वतः तयार केलेले अन्न पदार्थ, कला आणि हस्तकला उत्पादने सादर करतील. या सर्व तयारी आणि व्यवस्थापनात त्यांना पालकांची साथ लाभणार आहे. ‘दिवाळी मेळा 2025’ कार्यक्रम 12 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 4:00 ते 7:00 वाजे दरम्यान होणार आहे. या उपक्रमाचा उद्देश…
