Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team YuvaDisha
जळगाव -कावयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संलग्न असलेल्या के.सी.ई. इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयांत व्यवस्थापन विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली. या शिबिरात डॉ. महेंद्र पाटील यांनी आपली सेवा प्रदान करून विद्यार्थ्यांची रक्तदाब, वजन, दृष्टी, हिमोग्लोबिन, तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी केली. विद्यार्थ्यांना संतुलित आहार, व्यायाम, आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुंगंधी सर यांचे प्रेरणेने आणि व्यवस्थापन विभागप्रमुख प्रा. डिगंबर सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन व समन्वयक प्रा. सुनील विसपुते…
सोयगाव / प्रतिनिधी विजय पगारे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सोयगाव जि .छ. संभाजीनगर येथे आज विद्यार्थ्यांनी आपल्या कुशल हातांनी मातीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांची सुंदर निर्मिती करून इतिहासाला जिवंत केले. “मातीतील किल्ला” या स्पर्धेचे आयोजन केंद्र प्रमुख फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक किरणकुमार पाटील यांच्या संकल्पनेतून शाळेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शिवचरित्राबद्दल अभिमान, ऐतिहासिक जागरूकता आणि सृजनशीलतेचा विकास झाला.यास्पर्धेत शाळेत विद्यार्थी व विद्यार्थीनीनी उत्स्फूर्त सहभाग नोदविला या स्पर्धेचे उद्घाटन आणि परीक्षण मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. तातेराव माळी (सहायक गटविकास अधिकारी, पं. स. सोयगाव), श्री. महेंद्रसिंग पाटील (कनिष्ठ प्रशासन अधिकारी,…
जळगाव – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आणखी एक मोठी कारवाई करत महिला पोलिस कर्मचाऱ्याला तब्बल ₹७३,००० लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, खाजगी पेट, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद येथील श्री. शिवलाल रत्नम कोळी यांच्याकडून तक्रार आली होती की, महिला पोलिस कर्मचारी खाजगी तक्रार मागे घेण्यासाठी लाच मागत आहे. संबंधित आरोपीने तक्रारदाराकडून एकूण ₹७३,००० ची मागणी केली होती. तक्रारीची खातरजमा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांनी पथक तयार केले. नियोजनानुसार सापळा रचून महिला पोलिस कर्मचाऱ्यास लाच स्वीकारताना जळगाव येथे रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव)…
सोयगाव (प्रतिनिधी) आज दि. 14 ऑक्टोबर रोजी फर्दापूर गटातील सावळदबारा पंचायत समिती गण यांच्या वतीने सावळदबारा गावापासून गाव भेटी दौऱ्याला प्रारंभ करण्यात आला. या दौऱ्यादरम्यान विविध ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेणे, विकासकामांची पाहणी करणे तसेच सरकारी योजनांची अंमलबजावणी तपासणे यावर भर दिला जाणार आहे. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते उपस्थित होते. त्यांच्या सोबत स्थानिक पदाधिकारी, ग्रामसेवक, आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. या दौऱ्यामुळे ग्रामस्तरावर विकास कामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
जळगाव -कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने दि.०८ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत रायसोनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या युवारंग -२०२५ या रौप्य महोत्सवी युवक महोत्सवात जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयाने दिमाखात सर्व साधारण विजेते पद प्राप्त केले आहे. त्यानिमित्ताने महाविद्यालयात सर्व विद्यार्थी, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी जल्लोष साजरा करत आंनद प्रकट केला.यावेळी सर्व पारितोषिक, स्मृती चिह्ने आणि प्रमाणपत्र यांची आरास रचण्यात आली. विविध बक्षिसांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केसीई सोसायटीचे शैक्षणिक संचालक डॉ.मृणालिनी फडणवीस, प्रशासकीय अधिकारी श्री.शशिकांत वडोदकर, श्री.चारुदत्त गोखले, मानव्य शाखेचे उपप्राचार्य प्रा.देवेंद्र इंगळे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ.मनोज चोपडा, अधिष्ठाता डॉ.भूपेंद्र…
जळगाव – साहित्यविश्वातील प्रतिष्ठित आणि अभ्यासपूर्ण असा ‘शब्दांगण’ दिवाळी अंक २०२५ यावर्षी वाचकांसाठी प्रकाशित झाला असून, या अंकात साहित्य अकादमी सन्मानित ख्यातनाम साहित्यिकांशी विशेष संवाद साधण्यात आला आहे. या अंकाचे संपादन डॉ. अस्मिता गुरव आणि हर्षल पाटील यांनी केले असून, मराठी साहित्यप्रेमींसाठी हा अंक एक साहित्यिक मेजवानी ठरणार आहे. विविध साहित्य क्षेत्रातील मान्यवर लेखकांचे विचार, अनुभव आणि सर्जनशील प्रवास यांचा समावेश या अंकात करण्यात आला आहे. ‘साहित्य अकादमी सन्मानित साहित्यिकांशी संवाद’ हा विशेष उपक्रम वाचकांना त्यांच्या साहित्यकृतींच्या मुळाशी नेऊन पोहोचवणारा ठरणार आहे. आकर्षक मांडणी, विषय वैविध्य आणि दर्जेदार लेखनामुळे ‘शब्दांगण’ दिवाळी अंक यंदाही वाचकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणार आहे.…
भडगाव -विदयापीठ हे उच्च शिक्षणासाठीचे केंद्र असले तरी आपल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे शालेय विद्यार्थी, शेतकरी, महिला, कामगार अशा समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना व कार्यक्रम आखले जातात याचा सर्वसामान्य नागरिकांनी फायदा घ्यावा. विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण व विस्तार विभागातर्फे शाळा बाह्य घटकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्यासाठी विविध संस्थांनी प्रस्ताव सादर करावे तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या विद्यापीठ परिसरात सहली आयोजन करून आपले विद्यापीठ विद्यार्थ्यांना दाखवावे असे आवाहन व्यवस्थापन परिषद सदस्य अमोल नाना पाटील यांनी जागृती सार्वजनिक वाचना लयतर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित वाचन संस्कृती आणि आजीवन शिक्षण कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.अध्यक्षस्थानी वाय.…
जळगाव : साहित्यविश्वातील प्रतिष्ठित आणि अभ्यासपूर्ण असा ‘शब्दांगण’ दिवाळी अंक २०२५ यावर्षी वाचकांसाठी प्रकाशित झाला असून, या अंकात साहित्य अकादमी सन्मानित ख्यातनाम साहित्यिकांशी विशेष संवाद साधण्यात आला आहे. या अंकाचे संपादन डॉ. अस्मिता गुरव आणि हर्षल पाटील यांनी केले असून, मराठी साहित्यप्रेमींसाठी हा अंक एक साहित्यिक मेजवानी ठरणार आहे. विविध साहित्य क्षेत्रातील मान्यवर लेखकांचे विचार, अनुभव आणि सर्जनशील प्रवास यांचा समावेश या अंकात करण्यात आला आहे. ‘साहित्य अकादमी सन्मानित साहित्यिकांशी संवाद’ हा विशेष उपक्रम वाचकांना त्यांच्या साहित्यकृतींच्या मुळाशी नेऊन पोहोचवणारा ठरणार आहे. आकर्षक मांडणी, विषय वैविध्य आणि दर्जेदार लेखनामुळे ‘शब्दांगण’ दिवाळी अंक यंदाही वाचकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणार आहे.…
अधिष्ठातांसह अधिकाऱ्यांची कडक भूमिका : डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांच्याही वाहनांना बंदी जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या गेट क्रमांक १ मधून गेल्या आठवडाभरापासून डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह इतरांची खाजगी वाहने मध्ये येण्यास बंदी घातली असल्याने आता रुग्णालयाचा परिसर मोकळा श्वास घेत आहे. अनेकदा सुरक्षारक्षकांचे नागरिकांसह राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह वाद होतात. अनेकजण “भाऊं”सह “साहेबां”ना फोन लावतात. मात्र कुठलेही वाहन सोडले जात नसल्याने अधिष्ठातांनी सुरक्षारक्षकांच्या दक्षतेचे कौतुक केले आहे. रुग्णालयांमधील बेशिस्त पार्किंगची समस्या गंभीर होती. त्यामुळे रुग्णांना आणि रुग्णवाहिकांना पोहोचण्यास अनेकवेळा अडथळा निर्माण होत होता. शहरातील रुग्णालयाच्या आवारात खासगी वाहनांचे बेशिस्त पार्किंग सुरू होते. जागा दिसेल तेथे दुचाकी व चारचाकी वाहने उभी केल्या जात…
मुंबई -येथील हॉटेल ताज लँड्स एन्ड्स, बांद्रा येथे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत आयोजित “राज्य निर्यात पुरस्कार वितरण सोहळा” भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाला. या सोहळ्यात सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षांतील उत्कृष्ट निर्यात कामगिरी करणाऱ्या उद्योगांना गौरविण्यात आले. हा पुरस्कार कंपनीच्या उत्कृष्ट निर्यात कार्याची दखल घेऊन माननीय उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कंपनीच्या वतीने सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, अभेद्य जैन आणि अमोली जैन यांनी स्वीकारला. सूक्ष्म सिंचन आणि कृषी क्षेत्रातील जागतिक स्तरावरील अग्रगण्य कंपनी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रतिष्ठित “राज्य निर्यात पुरस्कार” प्रदान करण्यात आला. या निर्यात पुरस्कारात २०२३-२४ या वर्षासाठी प्लास्टिक आणि…
