Author: Team YuvaDisha

जळगाव- केसीई सोसायटी संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जळगाव (स्वायत्त) येथे इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिल आणि एमएचआरडी इनोव्हेशन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आरअँडडी स्पॉन्सर्ड/सीड ग्रँट प्रपोजल रायटिंग वर्कशॉप चे आयोजन करण्यात आले. विद्यार्थांमध्ये संशोधन वृत्ती जागृत व्हावी, तसेच संशोधनासंबंधीच्या महत्वाचा बाबी, संशोधन, नावीन्य आणि उद्योजकता यांचे शैक्षणिक क्षेत्रातील वाढते महत्त्व लक्षात यावे हाच मुख्य उद्देश या कार्यशाळेच होता. या कार्यशाळेत एपेक्स स्टार्टअप ग्रुप, जळगाव चे श्री. अजिंक्य टोटला यांना प्रमुख वक्ते म्हणून बोलविण्यात आले, विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना त्यांनी, संशोधन प्रस्ताव कसा लिहावा, त्यातील उद्दिष्ट स्पष्ट कसे करावे, समस्या निवड आणि रिसर्च गॅप ओळखण्याची प्रक्रिया, तसेच प्रस्तावाची रचना याबाबत सविस्तर माहिती…

Read More

 योग आणि आयुर्वेद मधुमेह प्रतिबंध व नियंत्रणासाठी सर्वात प्रभावी मार्ग आहे. औषध, आहार आणि दिनचर्या या तिन्हींचा संतुलित वापर केल्यास मधुमेह टाळता आणि नियंत्रित करता येतो. असे प्रतिपादन डॉ. गणेश पाटील यांनी आपल्या व्याख्यानातून केले. सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, एम. जे. कॉलेज, जळगाव यांच्या वतीने शनिवार दि. २२ रोजी “मधुमेह प्रतिबंधासाठी योग आणि आयुर्वेदाचा समन्वय” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी डॉ. गणेश पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. गणेश पाटील डॉ.हर्षदा पाटील आणि सोहम योग चे संचालक डॉ. देवानंद सोनार उपस्थीत होते. सोहम योग विभाग आणि धात्री आयुर्वेद यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह दिनानिमित्त मधुमेहग्रस्तांसाठी नि:शुल्क योग…

Read More

 केसीई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्वायत्त महाविद्यालयात अभियांत्रिकी विभागातर्फे ‘ अल गो रिदम ‘3.0’ फ्रेशर्स पार्टी उत्साहात आणि भव्यदिव्य वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमासाठी आय क्यू ए सी समन्वयक प्रा. कल्पेश महाजन, अकॅडमिक डीन प्रा. राहुलकुमार पटेल, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन प्रा. गणेश पाटील, डिप्लोमा समन्वयक प्रा. बी. जे. लाठी, तसेच इंजिनिअरिंग विभागांचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांचा सत्कार करण्यात आला. या भव्य फ्रेशर्स पार्टीचे आयोजन मुख्य समन्वयक प्रा. रेवती पाटील आणि प्रा. सचिन…

Read More

 राष्ट्रीय सेवा योजना भारत सरकार यांच्या वतीने हरियाणा येथे कुरुक्षेत्र विद्यापीठांमध्ये दिनांक 11 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीमध्ये राष्ट्रीय एकात्मता शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मूळजी जेठा महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका कु. जागृती गिरासे या विद्यार्थिने सक्रिय सहभाग नोंदविला. या शिबिरामध्ये महाराष्ट्र राज्याच्या वतीने सहा विद्यार्थी व एक संघ व्यवस्थापक यांची निवड करण्यात आली होती कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून सहा स्वयंसेवक शिबिरामध्ये सहभागी झाले होते व त्यांच्यासोबत संघ व्यवस्थापक म्हणून मूळजी जेठा महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विशाल देशमुख यांनी कार्य केले या शिबिरामध्ये भारतामधील 17 राज्यांचे प्रतिनिधित्व होते व विविध राज्यांमधून आलेल्या…

Read More

 केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांची प्रस्तावना; रामायण–महाभारत–उपनिषदांच्या शिकवणींवर आधारित पुस्तक आता भारतासह सहा देशांत उपलब्ध. जळगाव- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मेनेजमेंट एंड रिसर्च (आयएमआर)चे प्राध्यापक आणि जळगावचे लेखक पुनीत शर्मा लिखित ‘फ्रॉम डाऊट टू धर्म: फाइंडिंग स्टीलनेस अँड स्ट्रेंथ थ्रू द टीचिंग्ज ऑफ रामायण, महाभारत अँड उपनिषद’ हे पुस्तक नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘हे हाउस–पेंग्विन रँडम पब्लिकेशन्सने’ या पुस्तकाला जागतिक व्यासपीठ दिले असून, भारताबरोबरच अमेरिका, ब्रिटेन, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलमध्येही ते एकाचवेळी प्रकाशित आणि उपलब्ध झाले आहे. या पुस्तकाची प्रस्तावना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सीए पियूष गोयल यांनी लिहिली आहे. तसेच प्रख्यात…

Read More

जळगाव – के.सी.ई .सोसायटी संचलित मूळजी जेठा महाविद्यालय, (स्वायत्त) जळगाव येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या मानव्यविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. भूपेंद्र केसूर होते. सुरुवातीला संविधानाच्या प्रास्ताविकेला पुष्प अर्पण करण्यात आले, राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. जयेश पाडवी यांनी प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. यानंतर डॉ. राजीव पवार यांनी “संविधानातील मार्गदर्शक तत्वे आणि त्यांची प्रासंगिकता” यावर आपले मत व्यक्त केले. डॉ. भूपेंद्र केसूर यांनी अध्यक्षीय समारोप केला.कार्यक्रमाला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. विशाल देशमुख आणि महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित…

Read More

 जळगाव-के.सी.ई .सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सर्वप्रथम संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर उपशिक्षक योगेश भालेराव यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनानिमित्त अनमोल असे मार्गदर्शन केले. शाळेने तयार केलेल्या सेल्फी पॉईंट वर विद्यार्थ्यांनी सुंदर असे सेल्फी काढले. कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक सूर्यकांत पाटील, भावना धांडे, चारूलता भारंबे यांनी केले तर यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक कसे शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Read More

मध्य रेल्वेने मनमाड–इंदूर नवीन रेल्वे मार्ग (309.43 किमी) प्रकल्पात आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत हवाई भू-भौतिकीय सर्वेक्षणासाठी ई-टेंडर जाहीर केले आहे. या सर्वेक्षणामध्ये चुंबकीय इमेजिंग व व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे जमिनीची रचना सखोल तपासली जाणार आहे, ज्यामुळे पुढील बांधकाम प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा आहे. निविदा क्रमांक DYCE/CON/BSL/09/2025 दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून याचे अंदाजित मूल्य ₹77 लाखांहून अधिक आहे. तर बोली सुरक्षितता रक्कम ₹15.43 लाख निश्चित करण्यात आली आहे. कार्यकाळ सुमारे सहा महिने ठेवण्यात आला आहे. निविदा दस्तावेज रेल्वेच्या अधिकृत www.ireps.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. बोली सादर करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2025 सकाळी 11 वाजेपर्यंत असून…

Read More

जळगाव : जळगाव जिल्हा मजूर कामगार फेडरेशनच्या सभापती पदासाठी पुरुषोत्तम चौधरी तर उपसभापती पदासाठी सूर्यकांत वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीस सर्व संचालक मंडळाने एकमताने अनुमोदन व सहमती दर्शवली. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. पुरुषोत्तम चौधरी हे गेल्या वीस वर्षांपासून फेडरेशनमध्ये संचालक म्हणून कार्यरत असून त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून संचालकांनी एकमुखाने त्यांच्यावर सभापतीपदाची जबाबदारी सोपवली. निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक तथा अधिसी अधिकारी विशाल ठाकूर यांनी काम पाहिले. तसेच अजीत पाटील व जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जळगाव येथील वरिष्ठ लिपिक यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. नवीन…

Read More

जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी जळगांव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे दि. २५ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. दिनांक २५ नोव्हेंबर ते ९ डिसेंबरच्या दरम्यान रोज संध्याकाळी ७ वाजता एकूण १५ नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण १५ संघांचा सहभाग असून यात दि. २५ नोव्हेंबरला भुसावळ थर्मल पॉवर स्टेशन दीपनगर यांचे दानव, दि.२६ नोव्हेंबरला इंदाई फाऊंडेशन…

Read More