Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team YuvaDisha
प्रतिनिधी | भडगाव तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे व्यवहारज्ञान व गणितीय संकल्पनांची सुस्पष्टता साधण्यासाठी ‘बाल आनंद मेळावा’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः विविध अल्पोपहारांचे स्टॉल लावून प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव घेतला. मेळाव्यात भेळ, पाणीपुरी, हरभरा उसळ, खमंग पदार्थ, पोहे, इडली, गुलाबजाम, सोनपापडी आदींसह इतर आकर्षक स्टॉल विद्यार्थ्यांनी उभारले होते. विद्यार्थ्यांनी पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल, त्याची किंमत, नफा-तोटा यांचा हिशोब स्वतः मांडला. त्यामुळे गणितीय क्रिया, अंकज्ञान तसेच बाजारपेठेचा प्राथमिक अभ्यास प्रत्यक्ष कृतीतून साध्य झाला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञानाची जाणीव निर्माण करणे, आर्थिक साक्षरता वाढवणे आणि सर्वांगीण शिक्षणाचे ध्येय साध्य करणे हा होता. प्रत्यक्ष…
प्रतिनिधी | प्रगती शिक्षण मंडळ संचलित कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर व ललिता युवराज वाणी माध्यमिक विद्यालयात नुकताच या मेळाव्यात २०११-१२ पासूनचे सुमारे १८० माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. युवराज वाणी होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणतज्ञ प्रा. सौ. ललिताताई वाणी, संचालक श्री. वंदन वाणी, माजी मुख्याध्यापिका श्रीमती शालिनीताई भंगाळे, मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी, श्री. नीलेश नाईक व सौ. ज्योती बिऱ्हाडे उपस्थित होते. तसेच शाळेतील माजी शिक्षकांनीही कार्यक्रमास हजेरी लावली. मेळाव्याची सुरुवात शालेय परिपाठाने करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शालेय जीवनाचा अनुभव देण्यासाठी त्यांना वर्गात बसवून विविध विषयांचे प्रतीकात्मक अध्यापन करण्यात आले.…
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन जळगाव, 25 फेब्रुवारी राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र यांच्यामार्फत परदेशात शिक्षणसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाकरिता पात्र ४० गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता (निवास व भोजन), शैक्षणिक आकस्मिक खर्च, विमान प्रवास खर्च, व्हिसा शुल्क तसेच आरोग्य विमा यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. शैक्षणिक आकस्मिक…
शासकीय दंत महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन जळगाव दिनांक 25 फेब्रुवारी महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ, पुणे यांच्या मार्फत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे सुरक्षा…
भडगावला पद्मश्री चैत्राम पवार यांना उद्या होणार महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार वितरण जलसंधारण व वनसंधारण क्षेत्रातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित चैत्राम पवार यांना उद्या दि. 26 रोजी भडगाव येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय ओंकार वाघ यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात येणार आहे. महाविद्यालयाच्या वार्षिकोत्सव व पारितोषिक वितरण समारंभामध्ये चैत्राम पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. याप्रसंगी ते विद्यार्थ्यांना संबोधित करतील, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन.…
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्जाचे आवाहन जळगाव दिनांक 24 फेब्रुवारी ( जिमाका वृत्तसेवा )-: जिल्ह्यातील मैट्रीकोत्तर शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देय असलेल्या विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत प्रकल्प कार्यालयाकडून आवाहन करण्यात आले आहेजळगाव जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच महाविद्यालयीन स्तरावर शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, आदिवासी विकास विभागामार्फत विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सन २०१८-१९ पासून महाराष्ट्र शासन तर्फे महाडीबीटी (MahaDBT) पोर्टल सुरू केले आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून नवीन व जुने विद्यार्थ्यांनी…
पोकरा टप्पा-२ च्या अंमलबजावणीला गती; आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश राज्यातील ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा’ (पोकरा) दुसरा टप्पा सुरू करण्याच्या प्रक्रियेला अखेर वेग आला असून, आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. या योजनेची घोषणा होऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणी रखडल्याने आमदार खडसे यांनी ९ डिसेंबर २०२५ रोजी विधान परिषद सभागृहात विशेष उल्लेख सूचना क्र. २३ द्वारे सरकारचे लक्ष वेधले होते. यावर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लेखी पत्राद्वारे माहिती देताना स्पष्ट केले आहे की, राज्यातील २१ जिल्ह्यांतील ७२०१ गावांमध्ये या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना…
प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनात लालमाती आश्रमशाळेची यशाची परंपरा कायम अनुदानित आदिवासी आश्रमशाळा डॉ हेडगेवार नगर ता. धरणगाव जिल्हा जळगाव येथे दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाचे बक्षीस वितरण यावल प्रकल्पअधिकारी अरुण पवार साहेब यांच्या शुभहस्ते झाले.या प्रसंगी त्यांनी जाहीर केले की या विज्ञान प्रदर्शनातील विजेत्या स्पर्धकांना मागील वर्षाप्रमाणे यावेळी इस्रो (ISRO) बंगळुरू दौऱ्यावर विमान प्रवासाने नेले जाईल, जेणेकरून विद्यार्थ्याना प्रेरणा मिळेल व त्यांना अवकाश संशोधन क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. *भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या मुख्य विषयाच्या अनुषंगाने झालेल्या प्रकल्पस्तरीय विज्ञान प्रदर्शनात जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांनी…
जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात ५ आधार संचांकरिता अर्ज करण्याचे आवाहन जळगाव दिनांक 24 फेब्रुवारी ( जिमाका वृत्तसेवा )-: जळगाव जिल्ह्यात आधार संच वितरणाबाबत मार्च 2025 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यानुसार त्यामध्ये 04 महसुल मंडळात (1. गारखेडा ता. जामनेर) (1. टाकरखेडा 2. नगाव बु. 3. पातोंडा ता. अमळनेर) येथे व जळगांव शहरातील जमा झालेला 01 आधार संच असे एकूण 05 आधार संच वितरणासाठी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या मान्यतेने पुनःश्च जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यातील पात्र ‘आपले सरकार’ केंद्र चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळ www.jalgaon.gov.in वरून अर्जाचा नमुना, पात्रतेचे निकष,…
राणीपूर (ता. शहादा), प्रतिनिधी : ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक समृद्ध व अनुभवाधारित व्हावे, या उद्देशाने राणीपूर येथील शासकीय आश्रमशाळेत उभारण्यात आलेल्या परसबाग उपक्रमाला यश आले असून सध्या संपूर्ण परिसर भाजीपाला व फुलझाडांनी बहरून गेला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकातील ज्ञानाबरोबरच शेती, पर्यावरण आणि आहारविषयक प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे. अधीक्षकांच्या पुढाकारातून साकारले स्वप्न आश्रमशाळेचे अधीक्षक विजय चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरापासून परसबाग उभारणीचे नियोजन करण्यात आले. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या संयुक्त श्रमदानातून शाळा परिसरातील मोकळ्या जागेत ताटवे तयार करून त्यामध्ये विविध पिकांची लागवड करण्यात आली. सुरुवातीला छोट्या प्रमाणात सुरू झालेला हा उपक्रम आज सुबक आणि नियोजनबद्ध बागेत परिवर्तित झाला…
