जळगाव – भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्हा महिला मोर्चाच्या नव्या जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, सौ. कृतीका जानोडे आफे यांची जिल्हाध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे. राज्य महिला मोर्चा अध्यक्षा मा. श्रीमती चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस मा. श्रीमती संगीता थोरात, तसेच जळगाव जिल्हा प्रभारी मा. श्री. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीत विविध पदांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून, महिला नेत्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. महत्वाच्या पदांवर खालील निवडी करण्यात आल्या आहेत: अध्यक्षा: सौ. कृतीका जानोडे आफे (जळगाव) सरचिटणीस: सौ. नूतन पाटील (भडगाव), सौ. साधना चव्हाण (पिंपळगाव हरे), सौ. दीक्षा गावकवाड (धरणगाव), सौ. रवीना नागरे (सावखेडा), सौ. वैशाली पाटील (जळगाव) उपाध्यक्ष: सौ. कविता पवार (पाचोरा), सौ. प्रतिमा ठाकरे (भडगाव), सौ. माणसी पाटील (अमळनेर), सौ. सरला पाटील (पाचोरा), सौ. पल्लवी पाटील (एरंडोल), सौ. ममता पवार (नगसेदखळ), सौ. रेखा पाटील (भडगाव), सौ. कविता मराठे (खडगावकर), सौ. संगीता पाटील (चाळीसगाव), सौ. मनीषा पगारे (चाळीसगाव), सौ. कविता चौधरी (पारोळा) कोषाध्यक्ष: सौ. सरला पाटील (कासोदा) त्याचप्रमाणे महिला मोर्चा कार्यकारिणीतील सदस्य व सोशल मीडिया प्रमुखांची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोशल मीडिया प्रमुखपदी वैशाली रवींद्र पाटील (पारोळा) यांची निवड करण्यात आली असून, जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील महिला कार्यकर्त्यांना स्थान मिळाले आहे. भाजपा महिला मोर्चाच्या या नव्या कार्यकारिणीमुळे पक्षाच्या संघटनात्मक कामात अधिक वेग येईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष कृतीका जानोडे आफे यांनी व्यक्त केला आहे.
