Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Sunday, March 1
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»चालू घडामोडी»अनुदानित आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी मनसेचा तीव्र संताप,प्रकल्प अधिकाऱ्याचे दुर्लक्ष.
चालू घडामोडी

अनुदानित आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी मनसेचा तीव्र संताप,प्रकल्प अधिकाऱ्याचे दुर्लक्ष.

Team YuvaDishaBy Team YuvaDishaOctober 13, 2025No Comments40 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

यावल -येथील जिल्हास्तरीय असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यक्षेत्रातील अनेक आश्रम शाळांच्या भोंगळ कारभाराकडे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने एका अनुदानित आश्रम शाळेतील इयत्ता तिसरी मधील आदिवासी विद्यार्थ्यांचा शाळेत मृत्यू झाल्याने शिक्षण संस्थेची मान्यता रद्द करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष संजय नन्नवरे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली. आज सोमवार दि.१३ ऑक्टोबर २०२४ रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांना दि.८ ऑक्टोबर २०२५ तारखेचा संदर्भ देऊन दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अमरावती येथील उज्वल शिक्षण संस्था शाखा अंतर्गत चालवली जाणारी तालुक्यातील थोरगव्हाण मनवेल येथील कै.व्ही.तांबट अनुदानित आश्रम शाळेत घडलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या गंभीर घटनांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने संताप व्यक्त करत दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. दि. ५ ऑगस्ट २०२४ रोजी या आश्रमशाळेत शिकत असलेला फुलसिंग पहाडसिंग बारेला (इयत्ता 3री) हा विद्यार्थी मृत अवस्थेत आढळला होता.त्यानंतर पुन्हा दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी पिंकी भीमा बारेला या आदिवासी विद्यार्थिनीचा निकृष्ट आहार व आरोग्य तपासणीतील हलगर्जीपणामुळे छत्रपती संभाजीनगर येथील घोटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.दोन निरपराध विद्यार्थ्यांच्या मृत्यूकडे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्यासह प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार व मनसे जिल्हा उपाध्यक्ष संजय नन्नवरे यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,यावल यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,मुख्याध्यापक,अधीक्षक व संबंधित शिक्षक–कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून संस्थेची मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली. मनसेकडून प्रशासनाला चेतावणी देण्यात आली आहे की,जर या गंभीर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात आली नाही,तर मनसे व मनसे विद्यार्थी सेना कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलन व आमरण उपोषण करण्यात येईल. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिणामांची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील,असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदन देताना मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय नन्नवरे,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार, तसेच दिलीप कोळी,तुषार तायडे, मोहसीन खान,साबीर शेख,अकील खान,आकाश ओहरा,तेजस सपकाळे,पंकज तायडे,ज्ञानेश्वर बोरनारे,दिलीप मुरलीधर कोळी, युवराज कोळी,लक्ष्मण कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Ad 3
Ad 1
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

आमदार किशोर पाटील यांना शिवसेनेने (एकनाथ शिंदे) दिली आता मोठी जबाबदारी

November 13, 2025

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET)-2025 23 नोव्हेंबर रोजी होणार परीक्षा; अफवांवर विश्वास ठेवू नका

November 8, 2025

वंदे मातरम् च्या १५० व्या वर्षानिमित्त मूळजी जेठा महाविद्यालयात विशेष कार्यक्रम

November 7, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,531

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026724

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026530

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025454
Don't Miss

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

By Team YuvaDishaFebruary 25, 20267

प्रतिनिधी | भडगाव तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे व्यवहारज्ञान व गणितीय संकल्पनांची…

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026

शासकीय दंत महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

February 25, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.