Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team YuvaDisha
यावल -येथील जिल्हास्तरीय असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यक्षेत्रातील अनेक आश्रम शाळांच्या भोंगळ कारभाराकडे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने एका अनुदानित आश्रम शाळेतील इयत्ता तिसरी मधील आदिवासी विद्यार्थ्यांचा शाळेत मृत्यू झाल्याने शिक्षण संस्थेची मान्यता रद्द करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष संजय नन्नवरे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली. आज सोमवार दि.१३ ऑक्टोबर २०२४ रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांना दि.८ ऑक्टोबर २०२५ तारखेचा संदर्भ देऊन दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अमरावती येथील उज्वल शिक्षण संस्था शाखा अंतर्गत चालवली जाणारी तालुक्यातील थोरगव्हाण मनवेल येथील कै.व्ही.तांबट…
जळगाव – भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्हा महिला मोर्चाच्या नव्या जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, सौ. कृतीका जानोडे आफे यांची जिल्हाध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली आहे. राज्य महिला मोर्चा अध्यक्षा मा. श्रीमती चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस मा. श्रीमती संगीता थोरात, तसेच जळगाव जिल्हा प्रभारी मा. श्री. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीत विविध पदांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून, महिला नेत्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. महत्वाच्या पदांवर खालील निवडी करण्यात आल्या आहेत: अध्यक्षा: सौ. कृतीका जानोडे आफे (जळगाव) सरचिटणीस: सौ. नूतन पाटील (भडगाव), सौ. साधना चव्हाण (पिंपळगाव हरे), सौ. दीक्षा गावकवाड (धरणगाव), सौ.…
जळगाव –केसीई सोसायटी संचलित मू. जे. महाविद्यालयात १० ऑक्टोबर २०२५ जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसशास्त्र विभागातर्फे मानसिक आरोग्य जनजागृती साप्ताह साजरा करण्यात आला. यामध्ये दिनांक 09 ऑक्टोबर २०२५ रोजी मानसशास्त्र विभाग व करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर एक कार्यशाळा घेण्यात आली त्यामध्ये मानसशास्त्र विभागातील एफ.वाय बीए, एस.वाय बीए आणि टी. वाय. बीए च्या एकूण ५५ विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेवून त्या विषयीची ऑनलाइन परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेत. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील करिअर कट्टा विभागाच्या संचालक डॉ. शमा सराफ, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ललिता निकम, प्रा.डॉ.रामकुमार बुधवंत, डॉ. बालाजी राऊत, प्रा. अक्षय खरात यांनी मेहनत घेतली. दिनांक १० ऑक्टोबर…
जळगाव – के.सी.ई. बी.एड. कॉलेजमध्ये बी.एड. आंतरवासीयतेच्या अनुषंगाने सहविचार सभा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली.प्रास्ताविक प्रा.नयन पाटील यांनी प्रास्ताविकात आंतरवासीयता ही शिक्षक शिक्षणातील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थी-शिक्षकांना शाळेच्या प्रत्यक्ष वातावरणात काम करण्याची संधी मिळते व त्यांच्या अध्यापन कौशल्यासह आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना विकसित होते, असे सांगण्यात आले. यानंतर पाहुण्यांचा परिचय, स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ अनिल झोपे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव. यांनी आपल्या भाश्नातीन विद्यार्थी-शिक्षकांना शाळेच्या प्रत्यक्ष वातावरणात काम करण्याची संधी मिळते व त्यांच्या अध्यापन कौशल्यासह आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना विकसित…
जळगाव-भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील सर्व जिल्ह्यात भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांच्या आदेशानुसार चौथ्या चरणातील राष्ट्रव्यापी विशाल जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव जिल्हास्तरीय जनआक्रोश मोर्चा दि.१५ ऑक्टोबर २०२५ रोजी, दुपारी १२.०० वाजता, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा,जी.एस.ग्राऊंड, जळगाव येथुन निघणार आहे व या रॅलीचे समापन मा.जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन करण्यात येईल. या जनआक्रोश नेतृत्व देवानंद निकम(जळगाव जिल्हा अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा)हे करतील. 🟣 जनआक्रोश मोर्चाचे हे आहेत राष्ट्रीय व बहुजन समाजाच्या हिताच्या या मुद्दे राष्ट्रीय मुद्दे १)सर्व निवडणुका ईव्हीएम ऐवजी…
The … Other World : ‘द… अदर वर्ल्ड’ नाटकाचे कथानक पंचतत्त्व अर्थात माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांच्या महत्त्वावर आधारलेले आहे. ‘द… अदर वर्ल्ड’ हे रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक आहे. हे नाटक पंचतत्त्वांशी माती, पाणी, अग्नी, वायू, आकाश यांच्या सोबत आपली नव्याने ओळख करून देते आणि आपल्या पर्यावरण, पृथ्वी आणि मानवतेच्या रक्षणासाठी प्रत्येकाला सज्ज होण्याचे आवाहन करते. या सृजनशील कलाकृती मध्ये सौंदर्याचा बोध पाहायला मिळतो. निसर्ग आपल्या सर्वाना कुशीत घेतो आणि सृष्टीतून माणसाला सभोवताली पाहण्याची दृष्टी देतो. नदी, नाले, ओढे, झरे, समुद्र, पक्ष्याचे विविध आवाज त्यांचा किलबिलाट, वाढत्या शहरीकरणामुळे याच्या सगळ्यावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत…
जळगाव-एकलव्य विद्यालयाचा 14 वर्ष वयोगटाचा संघ पुन्हा एकदा यशस्वी होत विभाग स्तरावर पोहोचला आहे. तालुकास्तर तसेच जिल्हास्तरावर प्रत्येक सामन्यात विजय मिळवत अंतिम सामन्यात पानबारा संघाचा पराभव करत एकलव्य विद्यालयाच्या 14 वर्षे वयोगटाच्या व्हॉलिबॉल संघाने विभाग स्तरावर मजल मारली आहे. आपल्या उत्कृष्ट खेळाने या संघाने उपस्थित सर्व प्रेक्षकांची मने जिंकली. या यशस्वी संघात कर्णधार अशोक पवार, प्रेम अहिरे, साहिल अहिरे, कुलदीप नाईक, सुमित पाडवी, रीतिक वसावे, पियुष वळवी, आदित्य कोकणी , साई सूर्यवंशी, शशिकांत पवार, आनंद सूर्यवंशी , वेदांत गावीत, महेश गायकवाड या खेळाडूंचा समावेश होता. यशस्वी विद्यार्थ्यांना नितीन पाटील, सुनील पाटील, धोंडीराम शिनगर, अजित लांडगे, जकू गावित, संभाजी गावित, राजेश…
जळगाव -जळगाव शहरात सोन्याच्या लालसेने मृतदेहाच्या अस्थींची चोरी होण्याचा दुसरा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या आठवड्यात मेहरूण परिसरात झालेल्या घटनेची पुनरावृत्ती सोमवारी सकाळी शिवाजीनगर स्मशानभूमीत झाली. आठवडाभरात घडलेल्या या दोन घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र चिंता आणि संताप व्यक्त होत आहे. मेहरूण येथील पहिली घटना: गायत्रीनगरातील रहिवासी असलेल्या छबाबाई काशिनाथ पाटील (७४) यांचे ५ ऑक्टोबर रोजी निधन झाले. दुसऱ्या दिवशी मेहरूण भागातील महापालिकेच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. छबाबाई यांना सोन्याचे दागिने अंगावरच ठेवून अंत्यसंस्कार करण्याची इच्छा होती, त्यानुसार त्यांच्या कुटुंबियांनी सुमारे दोन तोळे (२० ग्रॅम) वजनाचे सोन्याचे दागिने अंगावर ठेवून अंत्यसंस्कार केले होते. मात्र, तिसऱ्या दिवशी नातेवाईक अस्थी गोळा करण्यासाठी…
पाचोरा -तहसील कार्यालयात पंचायत समिती पाचोरा येथील गणनिहाय आरक्षणाची सोडत पार पडली. स्व. तालुक्यासाहेब आर.ओ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोडतीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला व सर्वसाधारण प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. 🗳️ मुख्य आरक्षणाचे तपशील: ▪️ तारखेडा खुर्द – अनुसूचित जाती (महिला) ▪️ शिंदी – अनुसूचित जमाती (सामान्य) ▪️ नागरदेवळ खुर्द – मागास प्रवर्ग (महिला) ▪️ कुंडखेड बु. – मागास प्रवर्ग (सामान्य) ▪️ लोहारा – सर्वसाधारण (महिला) ▪️ बांभोरी बु.ज.पा. – सर्वसाधारण ▪️ पिंपळगाव बु.खु. – सर्वसाधारण ▪️ कुरंगी – सर्वसाधारण (महिला) ▪️ लोहारा – सर्वसाधारण ▪️ वाळके खुर्द – सर्वसाधारण
जळगाव – खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मुळजी जेठा महाविद्यालयामध्ये दि. 10 ऑक्टोबर या जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसशास्र विभाग व नव्याने सुरू झालेला समाजकार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते . सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सनराईज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे प्र.प्राचार्य. चेतन दिवाण तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.संजय भारंबे यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. विविध कार्यक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात आला.प्रा. दिवाण सर यांनी ‘आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवांची उपलब्धता’ या विषयावर व्याख्यान केले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मानसिक आजारांविषयी माहिती दिली.पोस्टरस्पर्धा, निबंधस्पर्धा,घोषवाक्यस्पर्धा आणि काही मानसशास्रीय खेळ घेण्यात आले. या कार्यक्रमाला मानविद्याशाखेचे…
