Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team YuvaDisha
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी (SSC) परीक्षेला शुक्रवारपासून उत्साहात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी पालकांची मोठी गर्दी झाली होती. परीक्षा संपल्यानंतर केंद्राबाहेर येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खुललेल्या चेहऱ्यांवरून पहिला पेपर सोपा गेल्याचे स्पष्ट झाले. पहिल्या दिवशी नाशिक विभागात एकाही गैरप्रकाराची नोंद झाली नाही. कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण मंडळाच्या वतीने सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सक्ती करण्यात आली असून बहुसंख्य केंद्रांवर ही व्यवस्था पूर्ण झाली आहे. ग्रामीण भागातील काही केंद्रांवर मात्र सीसीटीव्हीची सुविधा उपलब्ध नसल्याची माहिती आहे. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच परीक्षा केंद्रांजवळील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत. विभागनिहाय परीक्षार्थी संख्या नाशिक विभागात एकूण मोठ्या…
जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२४-२५ – पुरुष उमेदवारांची चाचणी संपन्न; उद्यापासून महिला उमेदवारांची चाचणी सुरू. जळगाव: जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील १७१ पोलीस शिपाई पदे भरण्यासाठी दि. ११/०२/२०२६ पासून शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरती प्रक्रियेतील २०/०२/२०२६ रोजीच्या पुरुष उमेदवारांच्या चाचणीचा सविस्तर अहवाल खालीलप्रमाणे आहे: आजच्या चाचणीसाठी एकूण १४१६ पुरुष उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ८१२ उमेदवार हजर झाले. हजर उमेदवारांपैकी ६० उमेदवार शारीरिक मोजमापात अपात्र ठरले, तर ४३५ उमेदवार मैदानी चाचणीत अपात्र राहिलेत. सर्व चाचण्यांनंतर एकूण ३१७ उमेदवार मैदानी चाचणीत पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे, आज पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक मोजमाप व मैदानी…
जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम 2026–27 अंतर्गत आज आदिवासी विकास विभागाचे मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मागणीनुसार आदिवासी विकास प्रकल्पाचे उपकार्यालय एरंडोल येथे सुरू करण्यास आदिवासी विकास विभागाचे मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी मान्यता दिल्यामुळे चाळीसगाव, एरंडोल, पाचोरा, भडगाव व धरणगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांना सा मोठा दिलासा मिळणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यासाठी डी जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम 2026 – 27 साठी किमान 40 कोटी रुपयांचा वाढीव निधी देण्याची ठाम मागणी केली. या मागणीवर ना. अशोक उईके यांनी सकारात्मकता दर्शविली. राज्यस्तरीय बैठकीत जिल्हाधिकारी रोहन…
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी विधवा, अपंग व वृद्धापकाळ योजना या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ अधिकाधिक गरजू व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष शोध मोहीम राबविण्यात आली. या विशेष शोध मोहिमेअंतर्गत जळगाव शहरातील मनपा संचलित संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र, जळगाव येथे वास्तव्यास असलेल्या लाभार्थ्यांचा शोध घेण्यात आला. यामध्ये एकूण तीन पात्र लाभार्थ्यांची निवड करून त्यांना संजय गांधी वृद्धापकाळ योजनेंतर्गत लाभ मंजूर करण्यात आला. आज जळगाव शहरातील संजय गांधी योजना अ वर्ग न.पा. क्षेत्र जळगाव कार्यालयात आयोजित कार्यक्रमात संबंधित लाभार्थ्यांना मंजुरी आदेशांचे वितरण करण्यात आले. हे आदेश तहसीलदार श्रीमती रुपाली काळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना…
जळगाव – महिलांमधील सुप्त नेतृत्वगुणांचा विकास व्हावा, त्यांचे सशक्तीकरण व्हावे आणि प्रशासन व संशोधन क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने केसीई सोसायटीच्या वतीने आयोजित तीन दिवसीय “महिला नेतृत्व ” कार्यशाळेचा उत्साहात समारोप झाला. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी नेतृत्व गुण उपजत असले तरी ते योग्य प्रशिक्षणाने कसे विकसित करता येतात, हे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर डॉ. विजेता सिंग यांनी ‘ग्लास सिलिंग’ या संकल्पनेवर व्याख्यान दिले. करिअरमध्ये प्रगती करताना महिलांना कोणत्या अदृश्य सामाजिक आणि मानसिक अडथळ्यांचा सामना करावा लागतो, यावर त्यांनी प्रकाश टाकला. दिवसाच्या उत्तरार्धात खासदार श्रीमती स्मिता वाघ यांनी मार्गदर्शन करताना महिलांनी ध्येय गाठण्यासाठी उत्कटता ठेवावी आणि समाजाच्या…
जळगाव – मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘चैतन्य २०२६’ अंतर्गत विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांत आनंद, उल्हास, उत्साह आणि जबरदस्त जोश दिसून आला. सांस्कृतिक उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या विविध वेशभूषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पारंपरिक, ऐतिहासिक व सामाजिक आशयांच्या विविध वेशभूषांतून आपली कल्पकता, यात असलेली अभिरुची सादर केली. दक्षिण भारतीय, राजस्थानी, काश्मिरी, महाराष्ट्रीयन, बंगाली, कर्नाटकी साडी लूक, महाराष्ट्रीयन साडी लूक तसेच आदिवासी पारंपरिक वेशभूषा अशा विविध वेशांतून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कवयित्री बहिणाबाई चौधरी, श्यामची आई, वासुदेव, राजकीय नेता, दाक्षिणात्य अभिनेत्री आदी व्यक्तिमत्त्वांचे पेहेरावाची प्रभावी छाप…
जळगाव- के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील (स्वायत्त संस्था ) पॉलीटेकनिक प्रथम वर्ष संगणक विभागतील विद्यार्थ्यांची विकास दूध फेडेरेशन ला शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते . विकास दूध फेडेरेशन चे प्रतिनिधी जागृती राजपूत यांनी विविध प्रकारच्या कार्यप्रणाली विषयी माहिती दिली तसेच विकास दूध डेअरी” मध्ये संगणकाचा वापर मुख्यत्वे डेटा व्यवस्थापन, हिशोब ठेवणे (accounting), ग्राहक आणि पुरवठादार व्यवस्थापन (CRM/SCM), इन्व्हेंटरी कंट्रोल (साठा नियंत्रण), उत्पादन प्रक्रियांचे निरीक्षण (monitoring), आणि विपणन (marketing) यांसारख्या कामांसाठी केला जातो, ज्यामुळे कामकाजात गती, अचूकता आणि पारदर्शकता येते, जसे की इतर कोणत्याही आधुनिक डेअरीमध्ये होतो. दुधाच्या तपासणीचे (Testing) निकाल संगणकात नोंदवणे,उत्पादन प्रक्रियेवर लक्ष ठेवणे (Monitoring).दुधाच्या गुणवत्तेचा…
जळगाव- स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे नेताजी सुभाष चंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी झाली. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आर. बी. ठाकरे यांनी प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षिका स्वाती बऱ्हाटे मॅडम समन्वयक प्रा. उमेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. पल्लवी फिरके यांनी सूत्रसंचालन व आभार प्रा. पूजा सायखेडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे अध्यक्ष प्रा. संदिप वानखेडे, व समितीचे सदस्य यांनी सहकार्य केले.
जळगाव : के.सी.ई. सोसायटीच्या मूळजी जेठा महाविद्यालयात (स्वायत्त) ‘चैतन्य–२०२६’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचा शुभारंभ ध्वजारोहण व मुख्य रंगमंचाच्या उद्घाटनाने मोठ्या उत्साहात झाला. सळसळत्या तरुणाईचा जल्लोष, उत्साह, आनंद ओसंडून वाहताना दिसून आला. संपूर्ण महाविद्यालय परिसर चैतन्यमय वातावरणाने भारून गेला. प्रारंभी मागील वर्षीचे स्नेहसंमेलनप्रमुख प्रा. डॉ. भूपेंद्र केसुर यांनी या वर्षीचे स्नेहसंमेलनप्रमुख प्रा. देवेंद्र इंगळे यांच्याकडे औपचारिकरीत्या सूत्रे सुपूर्द केली. त्यानंतर कार्यक्रमाच्या मुख्य उद्घाटक व के.सी.ई. सोसायटीच्या शैक्षणिक संचालक डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते के.सी.ई. सोसायटीचे ध्वजारोहण करण्यात आले. ‘महाविद्यालयाचा ध्वज’ प्राचार्य डॉ. सं. ना. भारंबे यांच्या हस्ते फडकविण्यात आला, तर ‘चैतन्य–२०२६’ चा ‘ध्वज’ स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. देवेंद्र इंगळे यांच्या हस्ते फडकविण्यात आला.…
जळगाव- के.सी.ई. सोसायटी संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, येथे २२ जानेवारी २०२६ ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान क्रीडावेध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. कार्यक्रमाचे उद्घाटन इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. बी. व्ही. पवार यांच्या हस्ते झाले, उद्घाटन प्रसंगी संचालक प्रा. बी. व्ही. पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शैक्षणिक प्रगतीसोबतच शारीरिक तंदुरुस्ती व मानसिक संतुलन राखण्यासाठी खेळांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, नेतृत्वगुण, शिस्त व आत्मविश्वास निर्माण होतो. प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासासोबत खेळांमध्येही सक्रिय सहभाग घ्यावा,” असे आव्हान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इन्स्टिट्यूट च्या क्रीडा संचालक डॉ. नीलिमा पाटील यांनी केले, सूत्र…
