Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Sunday, March 1
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»मनपा विरोधात एसटी कर्मचाऱ्यांचे तीव्र आंदोलन आंदोलनाचा धसका घेऊन अतिक्रमण काढले आणि काही वेळेतच परत अतिक्रमण केले
बातम्या

मनपा विरोधात एसटी कर्मचाऱ्यांचे तीव्र आंदोलन आंदोलनाचा धसका घेऊन अतिक्रमण काढले आणि काही वेळेतच परत अतिक्रमण केले

Team YuvaDishaBy Team YuvaDishaNovember 29, 2025No Comments80 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगांव :  रा.प. जळगांव मध्यवर्ती बसस्थानकाच्या इन व आऊट गेटच्या बाजूला खाद्यपदार्थ / चहा / ज्युस इत्यादी विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढलेले असल्याने मध्यवर्ती बसस्थानकातून बाहेरगावी जाणाऱ्या बसेस तसेच बाहेर गावाहून येणाऱ्या बसेस बसस्थानकाच्या आत-बाहेर येण्या-जाण्यास मोठी अडचण निर्माण झालेली आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी मोठ्या प्रमाणात संतप्त झालेले होते. एसटी महामंडळातील संयुक्त कृती समितीने आज शनिवारी दुपारी 1:30 वाजता जळगाव महानगरपालिकेच्या विरोधात तीव्र निदर्शने केली. याप्रसंगी काही काळ समोरील रस्त्यावरील वाहतूक बंद होती. ‘जळगांव मनपा- हाय हाय, मनपा जळगांव- जागे व्हा जागे व्हा, अशा विविध घोषणा देऊन जळगाव मनपाच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. तत्पूर्वी जळगांव मनपाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्याचे आदेश दिलेत. परंतु सदर अधिकारी गेल्यानंतर दुकानदारांनी परत अतिक्रमण केल्याचे दिसून आल्याने एसटी महामंडळातील कर्मचारी संतप्त झाल्याचे दिसून आले. जळगांव मनपाने सदर अतिक्रमणाबाबत केलेल्या दुर्लक्षामुळे प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचे प्रतिपादन एसटी कामगार सेनेचे श्री आर के पाटील यांनी केले. त्याचप्रमाणे पुढील काळात अशाच पद्धतीचे कामकाज सुरू राहिले तर महानगरपालिका जळगाव समोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष श्री विनोद शितोळे यांनी दिला. अनेकदा महानगरपालिकेची पत्रव्यवहार करून देखील दिलासा मिळत नसल्यामुळे अनेक कर्मचारी व प्रवासी यांचा अपघात झाला असून यास मनपा प्रशासन जबाबदार असल्याचे वक्तव्य कृती समितीचे संयोजक गोपाळ पाटील यांनी केले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्वश्री राकेश वाघ, गोपाळ पाटील, आर के पाटील, अनिल पाटील, विनोद पाटील, खुशाल मोरे यांनी विशेष प्रयत्न केलेत. याप्रसंगी एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 1
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,531

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026724

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026530

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025454
Don't Miss

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

By Team YuvaDishaFebruary 25, 20267

प्रतिनिधी | भडगाव तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे व्यवहारज्ञान व गणितीय संकल्पनांची…

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026

शासकीय दंत महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

February 25, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.