Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Sunday, March 1
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»चालू घडामोडी»महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २०२६मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध
चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २०२६मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध

Team YuvaDishaBy Team YuvaDishaOctober 19, 2025Updated:October 23, 2025No Comments130 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे:महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २०२६मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा अशा विविध परीक्षांच्या अंदाजित तारखा, निकालाचा महिना याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, शासनाकडून वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आल्याचे एमपीएससीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
एमपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ५ ते ९ मे रोजी महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२५ होणार असून, त्याचा निकाल ऑगस्टमध्ये जाहीर केला जाणार आहे. १६ मे रोजी स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२५ होणार आहे. या दोन्ही परीक्षांचा निकाल ऑगस्टमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १७ मे रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ होणार आहे, तर परीक्षेचा निकाल सप्टेंबर २०२६मध्ये जाहीर करण्याचे नियोजन आहे.
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त परीक्षा २०२५अंतर्गत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा ७ जून रोजी आयोजित करण्यात येणार आहे. तर सप्टेंबरमध्ये निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा २०२६अंतर्गत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ३१ मे रोजी होऊन ऑगस्टमध्ये निकाल जाहीर केला जाणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षेचा तपशील स्वतंत्रपणे जाहीर केला जाणार आहे.
त्याशिवाय ३ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेचा निकाल ऑगस्ट २०२७मध्ये जाहीर करण्यात येणार आहे. तसेच १५ नोव्हेंबर रोजी, विद्युत अभियांत्रिकी आणि यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२६ होणार आहे, तर फेब्रुवारी २०२७मध्ये निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
१५ नोव्हेंबर रोजीच महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२६, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२६ आयोजित करून निकाल मार्च २०२७मध्ये जाहीर केला जाणार आहे.
२१ नोव्हेंबर रोजी अन्न व औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा २०२६, निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा २०२६ आयोजित करण्यात येणार आहे, तर निकाल मार्च २०२७मध्ये जाहीर केला जाणार आहे. २६ ते ३० डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२६ आयोजित करून निकाल एप्रिल २०२७मध्ये जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा १४ जून रोजी होऊन निकाल ऑक्टोबरमध्ये, मुख्य परीक्षा ५ डिसेंबर रोजी होऊन निकाल एप्रिल २०२७मध्ये जाहीर होणार आहे. तर महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा १२ जुलै रोजी होऊन निकाल नोव्हेंबरमध्ये तर मुख्य परीक्षा १३ डिसेंबर रोजी होऊन निकाल एप्रिल २०२७मध्ये जाहीर करण्यात येणार असल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले.
संबंधित वेळापत्रक अंदाजित असून, परीक्षेच्या प्रस्ताविक दिनांक, महिना यात कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो. परीक्षेची परीक्षा योजना, अभ्यासक्रम, निवडपद्धत या बाबतचा तपशील एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून तो वेळोवेळी अद्ययावत करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

Ad 3
Ad 1
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

शासकीय दंत महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

February 25, 2026

आमदार किशोर पाटील यांना शिवसेनेने (एकनाथ शिंदे) दिली आता मोठी जबाबदारी

November 13, 2025

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET)-2025 23 नोव्हेंबर रोजी होणार परीक्षा; अफवांवर विश्वास ठेवू नका

November 8, 2025
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,531

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026724

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026530

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025454
Don't Miss

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

By Team YuvaDishaFebruary 25, 20267

प्रतिनिधी | भडगाव तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे व्यवहारज्ञान व गणितीय संकल्पनांची…

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026

शासकीय दंत महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

February 25, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.