Author: Team YuvaDisha

भडगाव – येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वाणिज्य आणि अर्थशास्त्र विभागाच्या वतीने औद्योगिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. ही सहल जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव येथे नेण्यात आली. या औद्योगिक सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी जैन इरिगेशन सिस्टीम्सच्या विविध विभागांना भेट दिली. त्यामध्ये टिश्यू कल्चर रोप नर्सरी, आशिया खंडातील सर्वात मोठी टिश्यू कल्चर लॅब, तसेच फ्युचर फार्मिंग सेंटर यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीत वापरल्या जाणाऱ्या ठिबक सिंचन, तुषार सिंचन प्रणाली, तसेच विविध शेतीसंबंधी स्मार्ट अवजारे आणि तंत्रज्ञान यांची सखोल माहिती यावेळी जैन इरिगेशन सिस्टीमच्या वतीने देण्यात आली. या सहली दरम्यान…

Read More

एकलव्य विद्यालयातील हर्षल गोरखनाथ बिरारे याची धनुर्विद्या- भारतीय या खेळ प्रकारात सलग दुस-या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली. हर्षलच्या या निवडीबद्दल प.खा.भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष डाॅ. सुहास नटावदकर, मुख्याध्यापक सुनील चौधरी, माजी मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर यांनी त्याचे अभिनंदन करून सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी क्रीडाशिक्षक सुनील पाटील, धोंडीराम शिनगर, अजित लांडगे, जकू गावित, संभाजी गावित, राजेश वळवी, नितीन पाटील उपस्थित होते.

Read More

कोळगाव ता.भडगाव (वार्ताहर) – कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत, *गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव* येथील तथा *किसान स्पोर्ट्स अकॕडमीचे* खेळाडू *कु. तनु वाल्मीक पाटील (४९ किलो,प्रथम)* तसेच *चि.स्वराज प्रल्हाद चौधरी (ग्रीकोरोमन ६५ किलो,प्रथम)* यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी,कार्यालय, नाशिकतर्फे,बलकवडे व्यायामशाळा, भगुर जि.नाशिक येथे आयोजित विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत आपआपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूस चितपट करून यश संपादन केले आहे. याच स्पर्धेत *चि.ओम ज्ञानेश्वर बोरसे (ग्रीकोरोमन ९२ किलो, द्वितीय)* उपविजेतेपद प्राप्त केले आहे. *तनु तसेच स्वराज* यांची *खोपोली जि. रायगड* येथे आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेत यश मिळवणाऱ्या कुस्तीपटूंना *आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे,राष्ट्रीय खो-खो पंच प्रा.प्रेमचंद चौधरी* यांचे…

Read More

स्वच्छ ग्राम स्पर्धेत जरंडी अव्वल — संभाजीनगर जिल्ह्यात सलग तिसऱ्यांदा मानाचा तुरा सोयगाव / प्रतिनिधी – विजय पगारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील मौजे जरंडी ग्रामपंचायतीने पुन्हा एकदा स्वच्छतेचा आदर्श घालून दिला आहे. संत गाडगेबाबा स्वच्छ ग्राम स्पर्धा २०२४–२५ मध्ये जरंडीने तब्बल १८१ गुण मिळवून जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. या यशामुळे जरंडी ग्रामपंचायतीने सलग तिसऱ्यांदा “स्वच्छ ग्राम” पुरस्कार मिळवण्याचा मान मिळवला असून, गावाचा तोरा संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा उजळला आहे. शुक्रवारी सायंकाळी सात वाजता जाहीर झालेल्या निकालात जरंडीचा उल्लेख अव्वल ठरल्याची घोषणा होताच गावात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. या यशामागे सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच संजय पाटील, वंदनाताई पाटील, मधुकर…

Read More

सोयगाव तालुक्यातील जरंडी ग्राम संसद अंतर्गत ग्रामविकास व पंचायतराज विभाग जिल्हा छत्रपती संभाजीनगर, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज विभाग अभियानांतर्गत शनिवारी (ता ११)श्रमदानातून वनराई बंधारा उभारण्यात आला. गारगोटी धरणापासून उगमस्थान पावलेली खडकी नदितून वाहून जानाऱ्या पाण्याचा शेतकऱ्यांसह गावकऱ्यांना पाण्याचा लाभ घेता यावा म्हणून जरंडी ग्राम संसद अंतर्गत ग्रामविकास व पंचायतराज विभाग जिल्हा छत्रपती संभाजीनगर, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज विभाग अभियानांतर्गत शनिवारी श्रमदानातून वनराई बंधारा उभारण्यात आला असून परिसरातील शेतकऱ्यांसह गावकऱ्यांना यांचा मोठा लाभ झालेला आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या उद्देशाने हा उपक्रम राबवला गेला, ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. या बंधाऱ्यांमुळे सिंचनक्षमता वाढण्यास मदत होत आहे, विशेषतः बांधाऱ्यालगत विहीरीना पाणीटंचाईवर मात करण्यासाठी…

Read More

अनुभूती विद्या निकेतन आणि अनुभूती बाल निकेतनद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. अनुभूती उद्यमिता कार्यक्रमाच्या अंतर्गत रविवारी 12 ऑक्टोबर रोजी ‘दिवाळी मेळा 2025’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जैन इरिगेशन अध्यक्ष अशोक जैन, उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकिय संचालक अजित जैन, अतुल जैन आणि जैन कुटुंबियांची उपस्थिती असणार आहे. मेळ्यात मॉन्टेसरी आणि इयत्ता 1 चे विद्यार्थी स्वतः तयार केलेले अन्न पदार्थ, कला आणि हस्तकला उत्पादने सादर करतील. या सर्व तयारी आणि व्यवस्थापनात त्यांना पालकांची साथ लाभणार आहे. ‘दिवाळी मेळा 2025’ कार्यक्रम 12 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 4:00 ते 7:00 वाजे दरम्यान होणार आहे. या उपक्रमाचा उद्देश…

Read More

दि. 11 ऑक्टोबर रोजी सकाळी सावळदेबारा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील यांच्या संपर्क कार्यालयात हंबरडा मोर्चाच्या तयारीसाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीस सावळदेबारा सर्कलमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत मोर्चाच्या आयोजन, नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून गुलाबराव पाटील, तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कन्हैयालाल शेवाळे यांनी केले. बैठकीस शेखर पाटील, सखाराम खोते, रमाप्रसाद पाटील, रमेश जाधव, ताराचंद जाधव, गजानन अंभोरे आदी उपस्थित होते

Read More

जळगाव (प्रतिनिधी) दि. २० – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागातर्फे आयोजित महाराजा सयाजीराव गायकवाड व्याख्यानमाले अंतर्गत “आर्थिक सजगता आणि सद्यस्थिती” या विषयावर जळगाव जनता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती यांच्या व्याख्यानाचे आयोजन दि. १९ सप्टेंबर रोजी विद्यापीठातील मुलांचे वसतीगृहातील सभागृहात आयोजन करण्यात आले. यावेळी मंचावर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य ॲड. अमोल पाटील, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, अधिसभा सदस्य भानुदास येवलेकर, रेक्टर तथा अधिसभा सदस्य प्रा. विशाल पराते आदी उपस्थित होते. यावेळी श्री. नागमोती यांनी व्याख्यान देतांना सगितले म्हणाले की, आपले जीवन अर्थपूर्ण करायचे असेल, तर पैशाचा अभाव आणि आतिरीक्त पैशांचा प्रभाव नसावा. विशेषतः तरुणाईसाठी आर्थिक सजगता फार महत्वाची आहे. ‘बँकिंग क्षेत्रात गेल्या काही वर्षांत प्रचंड बदल झाले आहेत. यूपीआय, जनधन योजना, DBT यांसारख्या योजनांमुळे सर्वसामान्यांना…

Read More

क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 14 ते 19 वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय उर्वरित व मनपा शालेय धनुर्विद्या (आर्चरी) क्रीडा स्पर्धा 2025-26 या शनिवार, दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालय, सावखेडा येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील 17 संघांतील 100 खेळाडूंनी (53 मुले व 47 मुली) सहभाग नोंदवला. त्यामध्ये उर्वरित गटात 12 संघ (22 मुले व 26 मुली) तर मनपा गटात 5 संघ (31 मुले व 21 मुली) यांचा समावेश होता.उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिव व शालेय समिती अध्यक्ष मा. श्री. विनोदजी पाटील सर , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर पाटील सर  आणि सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी मा. श्री. विशाल बोडके  व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीमातेची पूजा करून तसेच श्रीफळ वाहून आणि प्रातिनिधिक स्वरुपात धनुर्विद्येचे प्रात्यक्षिक…

Read More