
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन संयुक्तपणे साजरा करण्यात आले. इतिहास विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड होते. प्रमुख वक्ते म्हणून उपप्राचार्य प्रा. डॉ. एस.डी. भैसे यांनी आपले विचार मांडले. प्रा. जी. एस. अहिरराव यांची यावेळी उपस्थिती होती.
दीडशे वर्षे ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात असणाऱ्या भारत भूमीला स्वतंत्र करण्यासाठी अनेक स्वातंत्र्ययोध्यांनी आपले बलिदान दिले, जीवाची पराकाष्ठा केली व भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. महात्मा गांधी, पंडित नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद भगतसिंग यांसारख्या अनेक स्वातंत्र्यवीरांनी अहोरात्र कष्ट करून आपला देश स्वतंत्र केला. या पाठीमागे ९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांनी दिलेली ‘चले जाव’ ही घोषणा प्रेरणा होती. त्यामुळेच हा दिवस क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो, असे प्रतिपादन प्रा. डॉ. एस.डी. भैसे यांनी केले. प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांनी अध्यक्षीय मनोगतात जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या भिल, उमाजी नाईक या आदिवासी क्रांतिकारकांच्या कामगिरीचा आढावा घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती नन्नवरे यांनी केले. प्रास्ताविकातून आयोजनामागील भूमिका डॉ. इंदिरा लोखंडे यांनी मांडली तर प्रा रचना गजभिये यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
