Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

April 16, 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

April 14, 2026

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Saturday, April 18
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»महिलांनी नेतृत्व क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे यावे; केसीई सोसायटीच्या कार्यशाळेचा यशस्वी समारोप
बातम्या

महिलांनी नेतृत्व क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे यावे; केसीई सोसायटीच्या कार्यशाळेचा यशस्वी समारोप

Team YuvaDishaBy Team YuvaDishaJanuary 24, 2026No Comments10 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जळगाव – महिलांमधील सुप्त नेतृत्वगुणांचा विकास व्हावा, त्यांचे सशक्तीकरण व्हावे आणि प्रशासन व संशोधन क्षेत्रात त्यांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने केसीई सोसायटीच्या वतीने आयोजित तीन दिवसीय “महिला नेतृत्व ” कार्यशाळेचा उत्साहात समारोप झाला. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी नेतृत्व गुण उपजत असले तरी ते योग्य प्रशिक्षणाने कसे विकसित करता येतात, हे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर डॉ. विजेता सिंग यांनी ‘ग्लास सिलिंग’ या संकल्पनेवर व्याख्यान दिले. करिअरमध्ये प्रगती करताना महिलांना कोणत्या अदृश्य सामाजिक आणि मानसिक अडथळ्यांचा सामना करावा लागतो, यावर त्यांनी प्रकाश टाकला. दिवसाच्या उत्तरार्धात खासदार श्रीमती स्मिता वाघ यांनी मार्गदर्शन करताना महिलांनी ध्येय गाठण्यासाठी उत्कटता ठेवावी आणि समाजाच्या जडणघडणीत आपली भूमिका ओळखावी, असे आवाहन केले.दुसऱ्या दिवशी डॉ. संपदा नसेरी यांनी ‘महिला आणि संशोधन’ या विषयावर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय विकासासाठी महिलांनी संशोधन क्षेत्रात मोठ्या संख्येने येणे काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. दुसऱ्या सत्रात निर्मला चौधरी यांनी आपल्या जीवनातील संघर्षाचा प्रवास उलगडला. करिअर घडवताना पती आणि मुलाच्या पाठिंब्यामुळे कठीण प्रसंगांवर मात करून यश कसे मिळवले, हा त्यांचा अनुभव उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.तिसऱ्या दिवशी डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी शासन व प्रशासन क्षेत्रात महिलांचे सशक्तीकरण कसे घडवता येईल, यावर विशेष सत्र घेतले.त्यानंतर डॉ. ज्योती भोळे यांनी ‘महिला सशक्तीकरण आणि प्रशासन’ या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. प्रशासकीय कामकाजात महिलांच्या अचूक निर्णयक्षमतेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. समारोप प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री. नंदकुमार बेंडाळे उपस्थित होते. महिलांमध्ये उपजतच नेतृत्व गुण असतात, फक्त त्यांनी अधिक आत्मविश्वासाने पुढे येण्याची गरज आहे.या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन संयोजक केसीई सोसायटी शैक्षणिक संचालक डॉ. मृणालिनी फडणवीस आणि समन्वयक भावना मानेकर यांनी केले.

Ad 3
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

April 16, 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

April 14, 2026

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,535

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026733

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026534

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025456
Don't Miss

जळगाव जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात; मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम!

By Team YuvaDishaApril 16, 2026110

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अत्याचार पीडित कुटुंबातील वारसांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

April 14, 2026

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात मानाचा तुरा

March 28, 2026

आदिवासी उमेदवारांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण; २५ मार्च रोजी मुलाखत

March 23, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.