के. सी ई. सोसायटीच्या पी. जी. महाविद्यालयात ‘वंदे मातरम्’ ह्या राष्ट्रीय गीतास १५० वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता ‘वंदे मातरम्’ या गीताचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. के. बी. महाजन यांनी वंदे मातरम् या देशभक्तीपर गीताचा इतिहास आणि महत्त्व याबद्दल उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी नमूद केले की हे गीत इतके प्रभावी आहे की ते आपल्या मध्ये राष्ट्रीय भावना निर्माण करून आत्मसन्मानाची व स्वाभिमानाची भावना जागृत करते. या कार्यक्रमा प्रसंगी प्रा. व्ही. एस. झोपे, प्रा. एस. एन. पाटील, प्रा. डॉ. एस. आर. चौधरी, श्री. यु. एस. पाटील, प्रा. रूपाली खंबायत, प्रा. शालिनी झोपे, प्रा. जयश्री जाधव तसेच शिक्षकेतर कर्मचारी एस. एस. नारखेडे, दिगंबर खाचणे, गणेश माळी, पंकज पाटील व विद्यार्थी उपस्थित होते त्यांनी सामुहिक रित्या वंदे मातरम् हे देशभक्तीपर गीत गायले.
