— खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयांत इलेक्ट्रिकल विभागातर्फे कौशल्य विकास योजना अंतर्गत” दिपन्वये २०२५”संकल्पनेतून आकाश कंदील व लायटिंग तयार करण्याचे आयोजन करण्यात आले होते . त्यात 60 पेक्षा जास्त आकाश कंदील व लायटिंग तयार करून विक्री करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांचे मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले. . या कार्यक्रमात डॉ.संजय सुगंधी यांनी सांगितले कि दिवाळी हा सण भारतीय परंपरेतील मोठा सण आणि प्रकाशाचा व आनंदाचा उत्सव .अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचं प्रतीक मनाला जातो . त्याच्या प्रकाशाने जीवनाचा अंधकार दूर व्हावा म्हणून “दिपन्वये२०२५”समृद्धीचा व आनंदाचा सोहळा . या कार्यक्रमात जवळपास 50 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे के सी ई संस्थेचे कोषाध्यक्ष श्री शशिकांत वडोदकर लाभले . कार्यक्रमाला इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख डॉ. प्रसाद कुलकर्णी यांचे सहकार्य मिळाले . कार्यक्रमाचे समन्वयक प्रा मनीष महाले होते.आकाश कंदील व लायटिंग चे परीक्षण करण्यासाठी महाविद्यालयांचे अकॅडमिक डीन प्रा .राहुलकुमार पटेल ,आय क्यु ए सी समन्वयक प्रा. कल्पेश महाजन , प्रा. रुची गुल्हाने ,प्रा. उमाकांत कोठोके प्रा. सचिन नाथ यांची उपस्थिती होती
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
