— खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेन्ट स्वायत्त महाविद्यालयांत सायन्स अँड ह्यूमॅनिटीज प्रथम वर्ष विभागातर्फे शिक्षक पालक सभेचे आयोजन केले होते . महाविद्यालयात ओपन डे संकल्पना राबवून आयोजन करण्यात आले त्याचा हेतू असा कि प्रथम वर्ष नवप्रवेशित विद्यार्थ्यांनी विविध अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळाला आहेत . तसेच नवप्रवेशित विद्यार्थ्यांची नुकतीच प्रथम घटक चाचणी घेण्यात आली सभेमध्ये उपस्थित पालकांशी वर्गशिक्षकांनी संवाद साधत त्यात विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणाचे विषयानुसार पालकांना पेपर देण्यात आले . विद्यार्थ्यांची प्रगती त्या संकल्पनेतून मिळाली . पालकांना विद्यार्थ्यांची उपस्थिती , कोणत्या विषयात पुढे आणि मागे आहेत तसेच शिक्षकांची अध्ययन अध्यापन पद्धत याचे मूल्यमापन व माहिती या संकल्पनेतून मिळाली . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुगंधी यांचे मार्गदर्शन व प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा के बी पाटील यांचे संकल्पनेतून या शिक्षक पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते .पालक शिक्षक सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणी विद्यार्थी आणी पालक यांचे अडचणींचे निरसन करण्यात आले.पालकांनी यातून समाधान व्यक्त केले. शिक्षक पालक सभेला प्रथम वर्ष वर्गशिक्षक व प्राध्यापक यांची उपस्थिती होती .
