Close Menu
Yuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Sunday, March 1
Facebook X (Twitter) Instagram
Yuva DishaYuva Disha
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
Yuva Disha
Home»बातम्या»ईव्हीएम हटविण्यासाठी व ओबीसींची जातीनिहाय जनगणना व आदि मुद्द्यांसाठी जळगावात बहुजन समाज उतरला रस्त्यावर…
बातम्या

ईव्हीएम हटविण्यासाठी व ओबीसींची जातीनिहाय जनगणना व आदि मुद्द्यांसाठी जळगावात बहुजन समाज उतरला रस्त्यावर…

Team YuvaDishaBy Team YuvaDishaOctober 17, 2025No Comments4 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील सर्व जिल्ह्यात भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांच्या आदेशानुसार चौथ्या चरणातील राष्ट्रव्यापी विशाल जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव जिल्हास्तरीय जनआक्रोश मोर्चा दि.१५ ऑक्टोबर २०२५ रोजी, दुपारी १२.०० वाजता, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्यास अभिवादन करुन नवीन बस स्थानकमार्गे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला… ——————————— भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील सर्व जिल्ह्यात भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब यांच्या आदेशानुसार चौथ्या चरणातील राष्ट्रव्यापी विशाल जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या जनआक्रोश नेतृत्व देवानंद निकम(जळगाव जिल्हा अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा,सुभाष नावडे पाटील (जळगाव जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी मोर्चा),वसंत कोलते (जिल्हा संयोजक राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा,) व कुंदन तायडे (जिल्हा संयोजक बहुजन क्रा़ती मोर्चा) यांनी या जनआक्रोश मोर्चाचे नेतृत्व केले. मा.जयश्री महाजन(निवासी उपजिल्हाधिकारी)यांना मोर्चेकरांच्या वतीने निवेदन देण्यात आले. 🟣जनआक्रोश या मुद्द्यांसाठी काढण्यात आला राष्ट्रीय मुद्दे १)सर्व निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या. २)ओबीसींसह सर्व जातींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. ३) आदिवासींवर होणा-या अन्यायाच्या विरोधात ४)महाबोधी महाविहार ब्राम्हणांच्या ताब्यातुन बौध्दांच्या ताब्यात देण्यात यावे. ५) मुस्लिम समुदायाच्या संवैधानिक अधिकारांच्या सुरक्षिततेसाठी व मुस्लिम समुदायासोबत होत असलेल्या मॉब लिचिंगच्या विरोधात ६)एस.सी./एस.टी. व ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण लागु करण्यात यावे. बहुजन हिताचे मुद्दे १) शेतीसाठी व शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग,एम.एस.पी.लागु करावी. २) जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. ३)एस.सी./एस.टी./एन.टी.व ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना नियमित व वेळेत देण्यात यावी. ४)बहुजन व सर्वच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात ५)धर्मांतरीत आदिवासी, ख्रिश्चन व मुस्लिमांसोबत होत असलेल्या भेदभावपुर्ण व्यवहाराच्या विरोधात ६)कंत्राटी पद्धतीने सरकारी व निमसरकारी क्षेत्रात होत असलेल्या भरतीच्या विरोधात ७)सर्व कर्मचारी व कामगारांना आमदार व खासदारांसारखीच जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. ८)खाजगी क्षेत्रातील कामगार,मजुर, कर्मचारी, यांच्यासाठी सन्मानजनक पेन्शन योजना लागू करण्यात यावी. ९) राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरणातील बहुजन विरोधी निती,धोरणे व तरतुदींच्या विरोधात १०)खाजगी शैक्षणिक संस्थाकडुन फी च्या नावाखाली पालकांची लुट थांबवली जावी. ११)EWS आरक्षण असंवैधानिक आहे,ते रद्द करण्यात यावे. १२)दिपनगर येथील राखेपासुन तयार होणारे प्रदुषण रोखणेबाबत १३) जळगावातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करण्यात यावे. १४)प्रिपेड डिजिटल मीटर बसविण्याच्या विरोधात… या सर्व मुद्द्यांवर हा जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या जनआक्रोश मोर्चास जिल्हाभरातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते,व अनेक संघटनांना सहभागी झाल्या होत्या… या जनआक्रोश मोर्चास सुमित्र अहिरे,नितीन गाढे,सुनिल देहडे,सुकलाल पेंढारकर,खुशाल सोनवणे,गनी शाह,शाकीर शेख,गफुर तडवी,अरुण जाधव, प्राचार्य एस.एस.राणे,एन.व्ही.भारंभे,सोपान चौधरी,डी.एच.निकुंभे,प्रा.आर.सी.सोनवणे,दिलीप तासखेडकर,राजेंद्र माळी,गोरख देशमुख,गोपाळ कोळी,धनराज बंजारा,भीका कोळी,संभाजी दांडगे,आर.जी.परदेशी,बळवंत भालेराव, प्रद्युम्न वारडे, रघुनाथ घोडेस्वार,योगेश सोनवणे,रमेश थाटे,जगदीश सपकाळे,प्रा.यशवंत मोरे,वसंत सपकाळे,विलास सपकाळे,नारायण सोनवणे,रमेश रंधे,सुनिता देहडे,राजश्री अहिरे,प्रा.मिनाक्षी वाघमारे, दिपाली पेंढारकर, उज्ज्वला तायडे,निलु इंगळे,विमल साळुंके,मंगला सपकाळे आदि शेकडो बहुजन स्त्री पुरुष या जनआक्रोश मोर्चास उपस्थित होते. *राष्ट्रीय किसान मोर्चा,बुध्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय मुलनिवासी पेंन्शनर संघ, लहुजी क्रांती मोर्चा,छत्रपती क्रांती सेना, राष्ट्रीय मुलनिवासी महिला संघ, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, मौर्य क्रांती संघ,मनियार बिरादरी अशा अनेक संघटनांनी सहभाग नोंदवला.

Ad 3
Ad 1
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team YuvaDisha
  • Website

Related Posts

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

February 25, 2026

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक भरती; ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 24, 20251,531

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी जानेवारीपासून पूर्वतयारी मोहिमेस प्रारंभ

January 20, 2026724

४० वर्षांची प्रतीक्षा संपणार? किशोर आप्पांच्या रूपाने पाचोरा–भडगावला मंत्रीपदाची संधी!

January 24, 2026530

जळगाव येथे आदिवासी विकास विभागाची विभागीय क्रीडा स्पर्धांची जय्यत तयारी ..

December 14, 2025454
Don't Miss

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे बालआनंद मेळावा

By Team YuvaDishaFebruary 25, 20267

प्रतिनिधी | भडगाव तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव बुद्रुक येथे व्यवहारज्ञान व गणितीय संकल्पनांची…

“माजी विद्यार्थी स्नेहमेळावा” उत्साहात संपन्न झाला.

February 25, 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीपरदेशात उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना; विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जांचे आवाहन

February 25, 2026

शासकीय दंत महाविद्यालयात सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

February 25, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • Home
  • बातम्या
  • चालू घडामोडी
  • नोकरी मार्गदर्शन
  • रोजगार
  • सरकारी नोकरी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.