पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने महान शास्त्रज्ञ तथा भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. डी. एम. मराठे होते. त्यांनी वाचन हे माणसाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावते, असे अध्यक्षीय मनोगतात सांगितले . यावेळी ‘वाचन साधना’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात साने गुरुजी यांनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकाच्या बालकुमार दिवाळी अंकाचे विद्यार्थ्यांना मोफत वितरण करण्यात आले. थोर हिंदी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांच्या विटी दांडू, ईदगाह, कजाकी, चोरी, माझी मातृभूमी या प्रसिद्ध कथांचा या दिवाळी अंकात समावेश आहे. विद्यार्थ्यांनी मुन्शी प्रेमचंद यांच्या मुलांवर मूल्यसंस्कार करणाऱ्या कथा वाचाव्यात हा या उपक्रमामागील हेतू असल्याचे आपल्या प्रास्ताविकात मराठी विभाग प्रमुख डॉ. अतुल देशमुख यांनी विशद केले. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा वक्ते रवींद्र पाटील यांनीही आपल्या मनोगतात वाचनाने माणसाचे व्यक्तिमत्व समृद्ध बनते, असे प्रतिपादन केले. यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. गजानन चौधरी व इतिहास विभागाच्या इंदिरा लोखंडे उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा.अधिकराव पाटील यांनी केले तर प्रा. ज्योती नन्नवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या अभिनव उपक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
