भारताचे माजी राष्ट्रपती व महान वैज्ञानिक भारतरत्न डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंतीनिमित्त के.सी.ई. सोसायटी संचलित इन्सिट्युट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च मधील ग्रंथालय विभागाच्या वतीने “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. वाचनाची सवय विकसित करणे, व पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानसमृद्धी घडवून आपले व्यक्तिमत्व समृद्ध करण्याच्या उद्देशाने दरवर्षी १५ ऑक्टोबर भारतरत्न डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरी केली जाते.. ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बी. पी. सावखेडकर, जळगाव हे लाभले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक प्रा. बी. व्ही. पवार हे होते. तसेच डीन ऑफ मॅनेजमेंट , डॉ. ममता दहाड, डीन ऑफ कॉम्पुटर अप्लिकेशन श्री. एस. एन. खान हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी डॉ. सावखेडकर यांनी विद्यार्थ्यांशी अतिशय सोप्या पद्धतीने व सहजरित्या संवाद साधला व आपल्या संवादातून त्यांनी वाचनाचे महत्व पटवून दिले. डॉ. कलाम यांच्यामध्ये असलेल्या नम्रपणा विद्यार्थांसमोर मांडला. पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना खूप कळकळीने सांगितले कि, भारत महासत्ता होण्यासाठी आजचा तरुण हा फक्त शिक्षित नसावा तो सुशिक्षित असावा तेव्हाच डॉ. कलाम यांनी पाहिलेले प्रगतिशील भारताचे स्वप्न सत्यात येईल. विद्यार्थांनी आभासी माध्यमांवरून पसरणाऱ्या गोष्टीवर विश्वास न ठेवता, खऱ्या गोष्टीची शहानिशा करा. वाचन हि काळाची गरज आहे. वाचन आपल्यातील संयम वाढवतो, वाचन स्पीड वाढवतो. पुस्तके तुम्हाला माणसे कशी वाचावीत हे शिकवितात. आजची पिढी वाचनाअभावी मागे जात आहे. तुम्हाला भविष्यात काय करायचे आहे, ते ठरविण्यासाठी ग्रंथ मदत करतात. वाचनातून आपल्या समोरच्याला आपले मत समजावून, पटवून देता येत, त्यामुळे आपले व्यक्तिमत्व अधिकाधिक समृद्ध होत जात. त्यांनी या वेळी विद्यार्थांना शामची आई, अग्निपंख, अश्या विविध पुस्तकांची नावे सांगून ती वाचण्यासाठी आव्हान केले, तसेच दर महिन्यात एक तरी अवांतर पुस्तक वाचावे असा संकल्प विद्यार्थ्यांनी करावा असे देखील आव्हान त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. बी. व्ही. पवार सर यांनी विद्यार्थांना वाचन किती महत्वाचे आहे हे समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी जरूर नियमित वाचत जावे असे आवाहन त्यांनी केले. नियमित अभ्यासाशिवाय अवांतर वाचन वाढवावे, त्यातून आपला शब्दसंग्रह वाढतो, पुस्तके हे ज्ञान देण्याचे काम करतात ते आपल्याला काळासोबत रहायला शिकवितात. तुम्ही व्यवस्थापन शास्त्राचे विध्यार्थी आहात पण आयुष्याचं व्यवस्थापन शिकायचे असेल तर पुस्तकांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वाचनाशिवाय पर्याय नाही असे कळकळीचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. दिपाली पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. वर्षा झनके , डॉ. धनश्री चौधरी, प्रा. यामिनी भाटीया आदींनी परिश्रम घेतले.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
