जरंडीत ५५ दिव्यांगाना दिवाळीच्या सणाचा फराळ व आनंदाचा शिधा

जरंडी-जरंडी ग्रामपंचायतीच्या उपक्रम सोयगाव / प्रतिनिधी विजय पगारे सोयगाव तालुक्यातील जरंडी ग्रामपंचायतीने दिव्यांगाना पाच टक्के निधीतून गावातील ५५ दिव्यांगाना दिवाळी फराळ व आनंदाचा शिधा किट वाटप केली मंगळवारी अकरा वाजता ग्रामपंचायतीच्या आवारात सरपंच स्वाती पाटील,उपसरपंच संजय पाटील,मधुकर सोनवणे, मधुकर पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला दरम्यान दिव्यांगाची दिवाळी साजरी व्हावी या हेतूने हा उपक्रम ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी गावातील दिव्यांगाना आनंदाच्या शिधा मध्ये किराणा,एक किलो साखर,एक किलो गुळ, तेल,व इतर वस्तूचा समावेश आहे.यावेळी कृषिभूषण रवींद्र पाटील,दिलीप पाटील,प्रकाश पवार,बनेखा तडवी,अमृत राठोड,कैलास माताडे,दिलीप गाडेकर,,बाबू रामदास, आदींची उपस्थिती होती. लिपिक संतोष पाटील,सतीश बाविस्कर, अंबु राठोड, प्रकाश पवार,आदींनी पुढाकार घेतला. चौकट;-जरंडी ग्रामपंचायतीने ५५ दिव्यांगाना आनंदाचा शिधा किट वितरण करून त्यांची दिवाळी गोड केली आहे..
