
जळगाव –केसीई सोसायटी संचलित मू. जे. महाविद्यालयात १० ऑक्टोबर २०२५ जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मानसशास्त्र विभागातर्फे मानसिक आरोग्य जनजागृती साप्ताह साजरा करण्यात आला. यामध्ये दिनांक 09 ऑक्टोबर २०२५ रोजी मानसशास्त्र विभाग व करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर एक कार्यशाळा घेण्यात आली त्यामध्ये मानसशास्त्र विभागातील एफ.वाय बीए, एस.वाय बीए आणि टी. वाय. बीए च्या एकूण ५५ विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेवून त्या विषयीची ऑनलाइन परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेत. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील करिअर कट्टा विभागाच्या संचालक डॉ. शमा सराफ, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ललिता निकम, प्रा.डॉ.रामकुमार बुधवंत, डॉ. बालाजी राऊत, प्रा. अक्षय खरात यांनी मेहनत घेतली.
दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी मानसशास्त्र व समाजकार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात मानसिक आरोग्याच्या जनजागृतीसाठी पथनाट्य, घोषवाक्य सादरीकरण, पोस्टर सादरीकरण, मानसशास्त्रीय खेळ, व्याख्यान व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९.३० वाजता बीए प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तसेच एम ए प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्याच्या जनजागृतीसाठी प्रबोधनपर पथनाट्य सदर केले. त्यानंतर मानव्य शाखेच्या इमारती समोर घोषवाक्य सादरीकरण, पोस्टर सादरीकरण, सादर करण्यात आले.
दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी ११.०० वाजता प्रमुख वक्ते प्रोफेसर चेतन दिवाण (संचालक, सनराईज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांचे “आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवांची उपलब्धता” या विषयावर व्याख्यान आयोजित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय डॉ. स.ना भारंबे होते. सदर व्याख्यानात डॉ. दिवाण यांनी मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय असते, मानसिक आरोग्य ही काळाची गरज आहे व मानसिक आरोग्य विषयी आपत्ती येण्यापूर्वीच आपण कशी उपाययोजना करू शकतो. आपल्या सोबत असलेले इतर सहकार्यांना, मित्रांना आपण कशाप्रकारे मदत करू शकतो, समजून घेऊ शकतो याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक मानसिक आरोग्य किती महत्त्वाचे आहे, समस्या निर्माण कशी होते यावरही त्यांनी प्रकाश टाकला. समुपदेशक, मानसतज्ञ व सायकॅट्रिस्ट यांनी मानसिक विकाराचे निदान करताना डब्ल्यू एचओ (WHO) ने प्रमाणीत केलेली आयसीडी (ICD-10) प्रणालीचा उपयोग करावा असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात आदरणीय प्राचार्य डॉ. भारंबे यांनी मानसशास्त्रीय विभाग आणि समाजशास्त्र विभाग यांनी या कार्यक्रम घेतला त्याबद्दल विभागांचे कौतुक केले व प्रोत्साहन दिले. तसेच विद्यार्थ्यांनी मानसशास्त्राचे सखोल अध्ययन करू समाजामध्ये मानसिक आरोग्य विषयी जनजागृती केली पाहिजे तसेच स्वतःचे, कुटुंबाचे, व मित्रांचे सुद्धा मानसिक आरोग्य चांगले राहिल याची काळजी घेतली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बालाजी राऊत यांनी, सूत्रसंचालन डॉ. वर्षा भांडारकर, डॉ. डिम्पल जयस्वाल यांनी प्रमुख वक्त्यांचा परियच केला तर मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ललिता निकम यांनी आभार व्यक्त केले.
दुपारी १२.३० वाजता मानसशास्त्रीय खेळ व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मानसशास्त्रीय खेळ व वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज यामध्ये महाविद्यालयातील १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर निबंध स्पर्धेत १५ पेक्षा विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला प्रसंगी महाविद्यालाचे प्राचार्य मा. स. ना. भारंबे सर, प्रोफेसर चेतन दिवाण सर, प्रोफेसर डॉ. बी. एन. केसुर सर, डॉ. ललिता निकम, प्रा.डॉ.डिम्पल जैस्वाल, डॉ. बालाजी राऊत, डॉ. वर्षा भांडारकर व प्रा. अक्षय खरात उपस्थित होते. यासाठी बीए व एमए मानसशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतले यामध्ये श्रुती मराठे, पुनम समदानी, राणी कोळी, चैताली पाटील, वैशाली हटकर, अमित वाघदे, प्रतिक सोनवणे, चिन्मयी बाविस्कर, भूमिका बडगुजर, रिदा खान, नयना बोरसे, नरेंद्र चव्हाण, हर्षवर्धन महाजन, गोकुळ चव्हाण आणि रोहित इंगळे या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.
दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागातील बी ए द्वितीय वर्ष(मानसशास्त्र) च्या विद्यार्थ्यांनी सामाजिक सहभागीता उपक्रम अंतर्गत मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी पाळधी या गावात जाऊन विविध ठिकाणी पथनाट्य सादरीकरण केले. या पथनाट्यांमध्ये मानसिक आरोग्य, मानसिक विकृती, मोबाईल एडिशन, तसेच अभ्यासाविषयी अतिरिक्त चिंता, ताण-तणाव या विषयांवर भर देवून त्या संदर्भात जागृती निर्माण केली मानसिक आरोग्य कसे चांगले राहील याचे उत्तम प्रकारे सादरीकरण केले. यामध्ये तनुश्री पाटील, दिव्या पाटील, सृष्टी पाटील, कीर्ती पाटील, सीमा पाटील, श्रीकृष्ण मोरे, यश जयस्वाल, वीरेंद्र वाघ, सुचिता बडगुजर, कल्पेश तायडे, यामिनी बागुल, ज्योती बाविस्कर, रूमा मुंशी आणि समीक्षा पिंगळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
