
सोयगाव तालुक्यातील जरंडी ग्राम संसद अंतर्गत ग्रामविकास व पंचायतराज विभाग जिल्हा छत्रपती संभाजीनगर, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज विभाग अभियानांतर्गत शनिवारी (ता ११)श्रमदानातून वनराई बंधारा उभारण्यात आला.
गारगोटी धरणापासून उगमस्थान पावलेली खडकी नदितून वाहून जानाऱ्या पाण्याचा शेतकऱ्यांसह गावकऱ्यांना पाण्याचा लाभ घेता यावा म्हणून जरंडी ग्राम संसद अंतर्गत ग्रामविकास व पंचायतराज विभाग जिल्हा छत्रपती संभाजीनगर, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज विभाग अभियानांतर्गत शनिवारी श्रमदानातून वनराई बंधारा उभारण्यात आला असून परिसरातील शेतकऱ्यांसह गावकऱ्यांना यांचा मोठा लाभ झालेला आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या उद्देशाने हा उपक्रम राबवला गेला, ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. या बंधाऱ्यांमुळे सिंचनक्षमता वाढण्यास मदत होत आहे, विशेषतः बांधाऱ्यालगत विहीरीना पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हे एक प्रभावी उपाय ठरला आहे, तर वनराई बंधाऱ्यांमुळे सिंचनाखालील क्षेत्र वाढले आणि पाणीटंचाईवर मात करता येणे हा फायदा सुध्दा होतोय, कृषी, यांच्या सहकार्याने ‘वनराई बंधारा’ ही मोहीम राबवली जात आहे. अनेक गावांमधील नागरिकांनी श्रमदान करून हे बंधारे यशस्वी केले आहेत. ग्रामविकास व पंचायतराज विभाग जिल्हा छत्रपती संभाजीनगर, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज विभाग अभियानांतर्गत ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरूळे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णू राठोड,सतीश बावस्कर ,समाधान तुकाराम तायडे, सिद्धार्थ दांडगे आदी ग्रामस्थ मंडळींच्या श्रमदानातून बनराई बंधारा उभारण्यात आला आहे.
विजय पगारे – सोयगाव / प्रतिनिधी
